Home / Uncategorized / आरक्षण मिळाल !! पण हे SEBC म्हणजे काय रे भाऊ ??

आरक्षण मिळाल !! पण हे SEBC म्हणजे काय रे भाऊ ??

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याची घोधना केली. अन मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्ग (एसइबीसी) या प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारच्या बैठकीत झाल्याच त्यांनी सांगितलं.

SEBC म्हणजे नेमके काय ?

मुख्यमंत्र्यांनीघोषणा तर केली पण एसइबीसी म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. महाराष्ट्राच्याआरक्षणात SBC म्हणून एक प्रवर्ग अस्तित्वात आहे, अनेक जणांचा गैरसमज झाला कि याप्रवर्गाच्या अंतर्गत आरक्षण मिळणार आहे. पण SEBC हा संपूर्ण वेगळा प्रवर्ग आहे. SEBC म्हणजे सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास (SEBC)

भारताच्या राज्यघटनेनुसारसामाजिक व आर्थिक मागासलेलेपणाच्या आधारावर एखाद्या समुदायास आरक्षण अथवा संधी प्राप्तकरून देण्याची तरतूद आहे. राज्य्घात्नेच्या १६ मध्ये Socially and Educationally Backword Class या प्रवर्गाचा उल्लेख आहे. कलम १६(१) सांगते कि “Thereshall be equality of opportunity for all citizens in matters relating toemployment or appointment to any office under the State.” अन १६(४) नुसार शासन आर्थिक अन सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यावर्गांना आरक्षण देऊ शकते.

राज्यघटना तयार करताना संविधान समितीचे अध्यक्ष टी. टी. कृष्णामाचारी यांनी डॉ. आंबेडकर यांना मागासवर्ग या शब्दाची नेमकी व्याप्ती काय याबद्दल विचारले होते. तेव्हा डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘अनुसूचित जाती अन जमातींशिवाय विविध राज्यात असे अनेक घटक आहेत की ते या प्रवर्गात बसू शकत नाहीत तरीही हे प्रवर्ग/जाती/समुदाय हे त्यांच्याइतकेच मागासलेले आहेत. अन अशा समुदायांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्यघाटनेने राज्य सरकारला दिले आहेत. याच आधारावर आता मराठा समाजाला SEBC प्रवर्गाअंतर्गत आरक्षण मिळालं आहे. दरम्यान, मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळे हा समाज राज्यघटनेच्या कलम 15.4 आणि 16.4 मधील तरतुदीनुसार आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र ठरणार आहे.

Check Also

जेव्हा जॅकी श्रॉफ अनिल कपूरच्या 17 वेळा कानाखाली मारतो

अनिल कपूर आणि जेकी श्रोफने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम लखण, त्रिमूर्ति, युद्ध, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *