Home / Uncategorized / इथे आहेत हिममानवाचे(यतीचे) अवशेष !

इथे आहेत हिममानवाचे(यतीचे) अवशेष !

यती किंवा हिममानव…!! जगाला पडलेल्या अतर्क कोड्यांपैकी एक..!! अगदीच काल-परवा भारतीय सैन्याने काही महाकाय पावलांच्या ठस्यांचे फोटो त्यांच्या official account वरून share केले अन पुन्हा एकदा याविषयी चर्चेला उधान आलेल आहे. सैन्याला मकालू बेस कॅम्पजवळ हे ठसे आढळून आले. अर्थात याबद्दल सैन्याला troll सुद्धा केले गेले कारण सैन्याने पोस्ट केलेल्या फोतोंमध्ये फक्त एकाच पावलाचे ठसे दिसतायेत. चला जाणून घेऊया हे यती प्रकरण

मनोरंजनाच्या जगात तुमच स्वागत आहे… अशाच प्रकारच्या  लेखांसाठी वाचत रहा व्हायरल महाराष्ट्र.

यती किंवा हिममानव

यतीची अन त्याच्या अस्तित्वाची चर्चा ही काही नवीन नाहीये, अन फक्त हिमालयातच यती दिसलाय असही नाहीये… आशिया असो, आफ्रिका असो वा अमेरिका किंवा युरोप जगाच्या जवळपास प्रत्येक खंडात यती दिसल्याचा दावा केला गेलाय…!!

यतीचा पहिला अनुभव

१८३२ ला एका पर्वतरोहीला असाच अनुभव हिमालयात हिंडत असताना आला, त्याने बंगाल आशियाटिक सोसायटीला सांगितलं कि “त्याच्या गाईडला दोन पायांवर चालत असलेला एक विशालकाय आठ-नौ फुटांचा माणूस दिसला, ज्याच्या अंगावर अत्यंत घनदाट केस होते”… अन मग इथेच हिममानवाच यती अस नामकरण झाल.

ज्यांनी यती किंवा हिममानवाला पाहिलंय असे लोक सांगतात कि हा यती जवळपास 200 किलो वजनाचा अन ७ ते ९ फुट उंचीचा आहे. अन पाहण्याचे बहुतेक incident रात्रीचे आहेत तेव्हा तो बहुतेक रात्री शिकार करत असावा. लडाखच्या बौद्ध लोकांनी अनेकदा येतीला पहिल्याचा दावा केलेला आहे. लोक असही सांगतात कि यतीच्या हातात नेहमी एक भल्यामोठ्या दगडाचे हत्यार असते.

यतीचे अवशेषसुद्धा आहेत

अजून एक मजेदार गोष्ट, नेपाळमध्ये उत्तरेकडे एक मठ आहे तिथे एक विशालकाय बोट ठेवलेलं आहे. अनेकांन वाटत कि हे बोट दुसऱ्या कुणाचं नसून येतीच आहे. २०११ मध्ये या बोटाच DNA परीक्षण केले गेले तेव्हा अस दिसून आल कि माणसाच्या DNA शी याच साधर्म्य आहे.. (ref- द सन) शेकडो वर्षांपासून यतीचा उल्लेख नेपाळ, तिबेट अन हिमालयातल्या लोककथा व लोकगीतांमध्ये आढळतो. लापचा लोक हिमालयीन मानवाला देव म्हणून पूजतात तर प्राचीन बॉन धर्मातही यतीसदृश्य माणसांचा उल्लेख आहे.

नेपाळच्या एका monestery मध्ये येतीच्या मेंदूच्या वरची कवटी आणी मध्ये हाथ आहे.. याबद्दलची गोष्ट पांग्बाचे गावात सांगितली जाते हे … शतकांपूर्वी नेपाळचा एक monk साधनेसाठी एका गुहेमध्ये जातो त्या गुहेत एक यती राहत असतो, तेव्हा तो monk दुसरीकडे जाऊन साधना करतो पण काही दशकानंतर जेव्हा तो पुन्हा त्या गुहेत जातो तेव्हा त्याला तो यती मृत-अवस्थेत सापडतो. तो monk यतीची कवटी व हाथ घेऊन monestery मध्ये परत येतो.

आधुनिक जगाला माहिती होऊपर्यंत शेकडो वर्षापासून आजही ती कवटी अन हाथ अगदी सुरक्षित तिथे आहे. आता हा यती एकतर खूप हुशारतरी असला पाहिजे ज्याने आधुनिक जगात स्वताला लपवून ठेवले आहे किंवा अत्यंत लाजाळू तरी असेल जो अगदी कधीतरीच त्याच्या अधिवासातून बाहेर निघतो. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा…

Check Also

जेव्हा जॅकी श्रॉफ अनिल कपूरच्या 17 वेळा कानाखाली मारतो

अनिल कपूर आणि जेकी श्रोफने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम लखण, त्रिमूर्ति, युद्ध, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *