Breaking News
Home / Interesting / बुधवार पेठ ! 32 वर्षांनी भेटल्या बहिणी ! एक असते विदेशात तर दुसरी करते वैश्या व्यवसाय | Budhwar Peth

बुधवार पेठ ! 32 वर्षांनी भेटल्या बहिणी ! एक असते विदेशात तर दुसरी करते वैश्या व्यवसाय | Budhwar Peth

बचपन के बिछडे जवानी मे मिले…एक होतो पोलीस तर दुसरा चोर !! अशा घटना फक्त चित्रपटातच होतात अस काही नाही. चित्रपटालाही लाजवेल अशी गोष्ट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात अगदी काल-परवाच घडली आहे. अन तब्बल ३२ वर्षानंतर एक बहिण दुसऱ्या लहानपणी बीछडलेल्या बहिणीला भेटायला ७ समुद्र पार करून आली.

व्हायरल महाराष्ट्राच्या व्हायरल गोष्टींमध्ये तुमच स्वागत आहे, अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी नेहमी वाचत राहा व्हायरल महाराष्ट्रला

आपण अचानक भेट होणं हा आपण योगायोग समजतो. मात्र पुण्यातल्या बुधवार पेठेत तब्बल 32 वर्षानंतर एका महिलेला आपली लहानपणी दुरावलेली बहीण मिळाली आहे. सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने हा योग जुळून आला. या महिलेने सुरवातिला आपल्या जन्मदात्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण आई अगोदरच मरण पावली होती अन तिच्या या आई शोधमोहिमेत तब्बल ३२ वर्षानंतर बहीण मात्र मिळाली.

नेहा नावाची महिला स्वीडनमध्ये स्थायिक झालेली आहे. या नेहाचा जन्म मात्र भारतातला !! नेहाला 32 वर्षांपूर्वी स्वीडनमध्ये दत्तक देण्यात आलं होतं. नेहाची आई ही मूळची उस्मानाबादची, पण गरिबीमुळ पुण्यात ती वेश्या व्यवसायात ओढली गेली.

अशातच पुण्यातल्या ससून रुग्णालयात नेहाचा जन्म झाला पण नेहा मात्र गरीबीच जीन जगणार नवती त्यावेळी एका स्वीडीश दाम्पत्य मुलीला दत्तक घेण्यासाठी पुण्यात आल अन नेहाच मात्र नशीबच उजळल. स्वीडनच्या या कुटुंबीयांणी नेहाला दत्तक घेतल.

काही कळायच्या आधीपासून नेहा स्वीडनलाच राहतेय, लहानगी नेहा जेव्हा स्वीडनला गेली होती तेव्हा तिला बोलताही येत नवत अन चालताही!! आपण भारतीय आईची मुलगी आहोत हे तिला कळलंही नसत पण दत्तकविधीची काही कागदपत्र तिच्या कुटुंबाकडे होती. अन आवरा-आवर करताना ही कागदपत्र नेहाच्या नवऱ्याच्या हातात पडली. यांना पाहताच नेहाच्या नवऱ्याने एका NGO ला संपर्क साधला अन सुरु झाली नेहाची शोधमोहीम. पणाने आपल्या मुळांचा शोधघेण्यासारखं होत हे ! पण अचानक नेहाला तिची बहिण सापडली.

नेहा लग्नानंतर नेहा होलनग्राम झाली पण तिला माहितीच नावात तिच्यानंतर इकडे भारतात तिच्या आईला अजून एक कन्यारत्न प्राप्त झालं… पण नेहाची बहिण तिच्याइतकी नशीबवान नवती… अन आईच्या पदरी असलेल दारिद्र्य तिला वारश्यान मिळाल अन वैश्याव्यवसाय सुद्धा. नेहाची सापडलेली छोटी बहिण आजही बुधवार पेठेमध्ये असते. आता त्यांची DNA चाचणी होणार आहे अन त्याद्वारे मनात किंचितही शंका राहू नये अस दोघींना वाटत.

मला माझी बहीण मिळाली याचा आनंद आहे. असं कोणाच्या बाबतीत होऊ नये,  असं नेहाची बहीण सांगते. नियतीचा खेळ वेगळा असतो. जन्म झाल्यानंतर आई कोण, वडील कोण, हे माहीत नसतं. मात्र जेव्हा माहीत होतं तेव्हा सर्व शोध सुरू होतो आणि कधी न पाहिलेल्या बहिणी गळ्यात पडून भेटतात.

कसा वाटला लेख कमेंटकरून नक्की सांगा अन अशाच प्रकारच्या लेखांसाठी आम्हाला नेहमी भेट देत चला.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

जाणून घ्या अशा प्रकारे बनली अर्पिता सलमान खान यांची बहीण !

सगळ्यांना माहीतच आहे की खान परिवारामध्ये ‘अर्पिता खान’ ला एखाद्या ‘राजकुमारी’ सारखे ठेवले जाते. अर्पिता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 2 =