Breaking News
Home / Interesting / चक्क !! निजामाचा महाल परस्पर विकला आधुनिक नटवरलालांनी

चक्क !! निजामाचा महाल परस्पर विकला आधुनिक नटवरलालांनी

हैदराबादचा निझाम अन त्याच्या संपत्तीचे किस्से कुणाला माहिती नाहीत. निझामाच्या संपत्तीचे अनेक किस्से लोक आजही चवीने चघळताना आढळतात. निझाम आजकाल चर्चेत आहे, कारण त्याच्या संपत्तीचा एक मोठा खटला भारत सरकारने जिंकला आहे. पण निझाम अन त्याची संपत्ती यांचा एक अजून एक प्रकार आज समोर आला आहे.

या निजामाचा जवळपास 300 कोटी किमतीचा महाल चक्क दोन नटवरलालांनी विकला आहे.

नेमका काय आहे प्रकार ?

King Kothi Nizam

निहारिका इन्फ्रा. नावाची एक कंपनी आहे, या कंपनीने 100 वर्ष जुना असा निजामाचा नाझरी-बाग महाल ज्याला किंग कोठी म्हणून सुद्धा ओळखले जाते असा विकत घेतलेला होता. जून महिन्यात जेव्हा या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हैदराबादच्या रजिस्टर कार्यालयाला भेट दिली तेव्हा त्यांना आढळून आले कि या महालाची मालकी त्यांच्याकडे नाही आहे. आयरिस हॉस्पीटालिटी नावाच्या कंपनीकडे या महालाची मालकी गेलेली आहे.

अधिक चौकशीनंतर लक्षात आले कि कंपनीचे दोन कर्मचारी, सुरेश कुमार आणी सी.रविंद्र यांनी फेब्रुवारी मध्ये नोकरी सोडलेली आहे. या दोघांनी बनावट कागदपत्रे रजिस्टर कार्यालयला दाखवून हा महाल परस्पर आयरिस हॉस्पीटलिटीला विकला.

किंग कोठी

निजामाचा महाल

किंग कोठी हा तब्बल २.५ लाख स्क़ेयर फुट इतका मोठा महाल आहे, शेवटचा निझाम मिस ओस्मान अली हा फाळणीपूर्वी इथेच राहायचा असे सांगितले जाते. या इमारतीचे पुढेचे गेट “परदा दरवाजा” नावाने ओळखले जाते.

किंग कोठीच्या तीन इमारती आहेत, त्यातील मुख्य इमारतीच्या जागी आता एक दवाखाना आहे, दुसरीला नाझरी बाग म्हटले जाते तर तिसऱ्या इमारती मध्ये निझामाच्या वैयक्तिक मालमत्ता संदर्भातील कार्यालय आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

आई शप्पथ… सापडला पृथ्वीचा ‘दुसरा चंद्र’; हा पाहा फोटो

पृथ्वीला उपग्रह किती ? असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर अगदी शेंबडे पोरगही उत्तर देईल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + nine =