Breaking News
Home / Uncategorized / या हिरोइन्सनी करियरसाठी लपवले होते आपले लग्न.. ही तर अवघ्या १७व्या वर्षी चढली बोहल्यावर !

या हिरोइन्सनी करियरसाठी लपवले होते आपले लग्न.. ही तर अवघ्या १७व्या वर्षी चढली बोहल्यावर !

बॉलिवूड स्टार्स चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहणे पसंत करतात आणि बरेच सितारे आपला जिव्हाळ्याचा क्षण चाहत्यांसह सामायिक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. परंतु असे पण काही सितारे आहेत की, ज्यांना आपल्या कारकीर्दीसाठी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायला आवडत नाही.

सिनेमा जगतातील अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्या चित्रपटांबद्दल सर्व माहिती आहे, पण वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणालाही माहिती नाही. असे ही काही कलाकार आहेत ज्यांचे लग्न झालेले असून त्यांना मुलेही आहेत.

अदिती राव हैदरी- अभिनेत्री आदिती राव हैदरी यांनी वयाच्या 21 व्या वर्षी सत्यदीप मिश्राशी लग्न केले होते आणि त्या नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर आदिती राव हैदरी यांनी आपले विवाहित जीवन लपवून ठेवले. पण काही काळानंतर या दोघांचा घटस्फोट झाला आणि आता सत्यदीप मिश्रा नीता गुप्ताची मुलगी मसाबासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

सुरवीन चावला- टीव्ही आणि हिंदी सिनेमाची हॉट अभिनेत्री सुरवीन चावला यांनी बिझनेसमॅन बॉयफ्रेंड अक्षय ठक्कर यांच्याशी 2015 मध्ये विवाह केला होता. पण करिअरसाठी सुरवीन यांनी आपले लग्न लपवून ठेवले. सध्या सुरवीनला एक सुंदर मुलगी आहे.

राधिका आपटे- हॉट अभिनेत्रींच्या यादीत असलेल्या राधिका आपटे कडे पाहून कोणी म्हणणारही नाही की यांचे लग्न झालेले आहे. कारण, अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे कधीच आवडत नाही. राधिकाने 2012 मध्ये परदेशी संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले आणि आता ती आपल्या पतीसमवेत लंडनमध्ये राहते.

माही गिल- बॉलिवूड आणि पंजाबी अभिनेत्री माही गिल यांचे वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी लग्न झाले होते. माही यांनी स्वत: एका मुलाखतीत हा खुलासा केला. पण त्यावेळी माही व तिचा नवरा मॅच्युअर नव्हते. यामुळे काही काळानंतर दोघेही विभक्त झाले. माही सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असून तिला एक मुलगीही आहे. याबद्दल अभिनेत्रीने वर्ष 2019 मध्ये सांगितले होते.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

लॉकडाउन मध्ये मिकी और मिनी माउस बनले रणवीर सिंह व दीपिका पादुकोण, फोटो झाला वायरल

दुनियाभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. अन या विषाणूने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे समंध भारतीयांना घरातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + seventeen =