Breaking News
Home / देश अन राजकारण / पन्हाळा गडावर रोमँटिक गाणं शूट करण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना अमोल कोल्हेंचं उत्तर

पन्हाळा गडावर रोमँटिक गाणं शूट करण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना अमोल कोल्हेंचं उत्तर

महाराष्ट्रातील श्रेणी २ मधील गड किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल, रिसॉर्ट तसंच लग्नसमारंभ, मनोरंजन तत्सम कार्यक्रमासाठी देण्यावर राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात या निर्णयाबाबत विरोधाच्या अनेक लाटा उठल्या होत्या.

पण काही वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी पन्हाळा किल्ल्यावर एक रोमेंटिक गाणे चित्रित केले होते. सोशल मिडीयाची स्मरणशक्ती अफाट असल्याने याबद्दल पोस्ट पुन्हा व्हायरल व्हायला लागल्या आहेत. सोशल मिडीयावरून कोल्हे यांना ट्रोल केले जात आहे लग्नसमारंभ मनोरंजन याबद्दलची त्यांच्या भूमिकेवर याद्वारे प्रश्न उपस्थीत केले जाट होते.

amol kolhe trolled, troll amol kolhe,

अमोल कोल्हे यांचा काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता ‘मराठा टायगर्स’. या चित्रपटातीमधले एक गाणे चक्क पन्हाळा गडावर शूट करण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा यावर आक्षेप घेण्यात आला होता. पण सध्या अमोल कोल्हेच अशा प्रकारचा आक्षेप शासन निर्णयावर घेत आल्याने नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले आहे. टीकाकारांनी सोशल मिडीयावरून त्यांना विचारले कि तुम्हाला जर गड किल्ल्यांची इतकी काळजी आहे तर तिथे रोमँटिक गाण्याचं शुटिंग तुम्ही का केलंत ?

या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले कि या गाण्याचा अन शासनाच्या गड किल्ल्याविषयीच्या निर्णयाचा काहीही संबंध नाही.  मात्र यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. पन्हाळा गडावर रोमॅण्टिक गाणं शूट करण्यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. अमोल कोल्हे यांनी या टीकाकारांना उत्तर दिलं असून त्या गाण्याचा गडकिल्ल्याच्या निर्णयाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. अन मत व्यक्त करण्याआधी विषय समजून घेणे महत्वाचे आहे.

उगाच उथळपणे टीका करणाऱ्या कमेंट करू नयेत असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला. उगाच वाद निर्माण करण्यासाठी संबंध जोडला जात आहे. जर शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर राज्यातले शिवप्रेमी रस्त्यावर उतरतील असा इशारासुद्धा त्यांनी भंडारा येथून शासनाला दिला. शिवस्वराज्य यात्रेच्या निम्मित्ताने ते भंडारा येथे होते.

[वृत्त स्रोत- लोकसत्ता]
Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Kalpita Patil Jalgaon

सर्वात तरुण सरपंचाला मिळणार विधानसभेचं तिकीट ?

कुणी कितीही महिला सबलीकरण म्हणत असले तरी सर्वसामान्यपणे राजकारण हा पुरुषांचा आखाडा समजला जातो. महिला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + thirteen =