किस्से

कसाबविरुद्ध साक्ष दिली म्हणून गावाने टाकले वाळीत – Survival Stories Of 26/11

२६/११ च्या हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाली. राग…, संताप…, दुखः…, वेदना…, कितीतरी भावना मनात दाटून येतात. महाराष्ट्राच्या अन भारताच्या काळजावर घातला गेलेला हा कसाबरुपी हात आज आपण तोडून टाकलाय.

२६/११ च्या अनेक गोष्टी आपण दुखः अथवा संताप व्यक्त करीत वाचतो यातून वाचलेल्या लोकांना सहानभूती मिळते त्यांच्या आठवणींतून त्या भयानक अनुभवाची भयंकर प्रचीती येते. पण एका कुटुंबाला मात्र विचित्र असा अनुभव आला …. ज्या गावात ते राहायचे त्यांनी सहानभूतीचे २ शब्द बोलायचे तर दूर पण त्यांना वाळीत टाकले.


दहशतवादी अजमल कसाब याच्या विरुद्ध साक्ष दिली या कारणामुळे राजस्थानच्या एका कुटुंबाला चक्क वाळीत टाकलं गेलं. त्यांचं जीणं त्यांना इतक नकोसं झालं. कि या कुटुंबाला आपले गाव साडून मुंबईत स्थालांतरित व्हावं लागलं.

मुळचे राजस्थानचे रोटवान कुटुंबा २६/११ च्या दिवशी सीएसएमटी स्थानकावर होतं या कुटुंबातली मुलगी देविका तेव्हा फक्त अवघ्या ९ वर्षाची होती. या इवल्याश्या मुलीने कसाबविरुद्ध साक्ष दिली, इतक्या लहा वयात केलेलं हे धाडस वाखाणन्याजोगे होते, पण कौताकाची पाठीवर थाप मिळायची तर सोडाच पण मायेचा हातही तिच्या डोक्यावरून फिरला नाही. गावकऱ्यांनी तिला अन तिच्या कुटुंबाला चक्क वाळीत टाकल… बहिष्कृत केले. देविकाच्या साक्षीमुळे गावची सुरक्षा धोक्यात आलीय, अन आता कधीही पाकिस्तानमधून दहशतवादी येतील आणि गावाला उध्वस्थ करतील, असले काहीतरी मूर्खपणाचे विचार गावकऱ्यांच्या डोक्यात बसले होते.

आणि त्यांनी रोटवान कुटुंबाला वाळीत टाकलं. त्यांच्याशी कुणीहि व्यवहार करेना कि नटवरलालना कुणी कामही देयीना नाईलाजास्तव त्यांना गाशा गुंडाळून मुंबईत याव लागलं.

काही वर्षांपूर्वी नटवरलाल यांच्या आईचं निधन झालं पण नटवरलाल यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आई गेल्याचं साध कळवलंही नाही येत्या ४ डिसेंबरला त्यांच्या नातेवायीकांत लग्न आहे. पण त्यांना निमंत्रण देण्याचीच काय तर साध कालाव्ण्याचीही तसदी कुणी घेतलेली नाही इतकच नाही तर हल्लानंतर त्यांना स्थानिक नेत्यांनी खूप आश्वासनं दिली होती. पण त्याचंही पुढे काहीच झालं नाही.

देशाविरुद्धच्या लढ्यात समाजानं यांच्या पाठीशी उभं रहायला हवं, पण इथे चित्र जरा वेगळेच दिसतेय.

अशाच बातम्यांसाठी व्हायरल महाराष्ट्र च्या पेज ला like करा, अन या पोस्टला share करा

बातमी स्रोत- ibn लोकमत, Indian Express

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button