किस्से

[Interesting facts] जाणून घेऊया सातारच्या छत्रपती उदयनराजेंना !! उदयनराजेंचा आज वाढदिवस

‘मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची वाघाचीही हिम्मत होनार नाही.

सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणार्‍या गाजलेल्या पत्रकारांची तर नाहीच नाही!

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. इंग्रजीत म्हणायचं तर ‘रॉयल ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात सिंहाची बेफिकिरी क्षणाक्षणाला जाणवते. धारदार नाक आणि काळीज चिरणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात. लोक त्यांना थोडे दबकूनच असतात अन थोडं अंतरही ठेवतात. पण अचानक उदयनराजेंचा मूड बदलतो, अन खांद्यावर आपुलकीची थाप पडते अन सगळीकडे हास्याची कारंजी उडतात. लोकांना धक्का द्यायला उदयनराजेंना खूप आवडतं.

उदयनराजेंबद्दल सातार्‍यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात आख्यायिका प्रसिद्ध आहेत. सातार्‍यात तर या आख्यायिका चहाच्या कपाबरोबर मोठया चवीने चघळल्या जातात. पत्रकार परिषद असो वा राजकीय मेळावा; उदयनराजे नेहमीच मद्यधुंद अवस्थेत असतात, किंवा त्यांच्या जलमंदिर वाडय़ावर त्यांना आड जाणार्‍यांना ते चाबकाने फोडून काढतात, या त्यातल्याच काही आख्यायिका. कदाचित त्या खोटया असतील… अन  कदाचित खर्‍याही असतील. पण त्यामुळे उदयनराजेंच्या इतर गुणांकडे दुर्लक्ष करायचं काही कारण नाही.

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार बनलेल्या उदयनराजे भोसले यांचा सातार्‍यातला दबदबा वाढला आहे. याचा अर्थ त्यांचा दबदबा नव्हता असा कुणीही घेऊ नये. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘थेट’ तेरावे वंशज असलेल्या उदयनराजेंविषयी अवघ्या महाराष्ट्राच्या मनात एक वेगळीच आदराची जागा आहे. लोक त्यांना आदराने ‘महाराज साहेब’ म्हणतात, काही लोक तर त्यांना अजूनही (अर्धवट) मुजरा करतात मग उदयनराजेंचं त्यांच्याकडे लक्ष असो वा नसो.

‘महाराज साहेबां’मधल्या सामान्य अन तितक्याच असामान्य माणसाला सगळ सातारा ओळखत. उदयनराजे म्हणजे एकदम रांगडा गडी! फर्स्ट इम्प्रेशनच एक नंबर, त्यात तुमच्या नशिबाने महाराज साहेबांचा मूड असेल तर दुग्धशर्करा योगच म्हणायचा!

‘माझ्या आईवडिलांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. अगदी पहिलीपासूनच त्यांनी मला शिक्षणासाठी हॉस्टेलवर ठेवलं. त्यामुळे राजघराण्याच्या वारशाचं ओझं मला लहानपणी कधी जाणवलंच नाही. मी इतरांपेक्षा वेगळा आहे असंसुद्धा कधी वाटलं नाही. जो मला चॉकलेट द्यायचा, माझ्याशी आपुलकीने वागायचा तो माझा मित्र व्हायचा! राजेशाहीपासून मी खूपच लांब होतो,’ उदयनराजे सांगतात.

 

शालेय शिक्षण डून स्कूलमधून पूर्ण केल्यानंतर उदयनराजेंनी पुण्यात इंजिनीअरिंग केलं. तिथेही भरपूर दंगा-मस्ती केली. त्यावेळी आपण कधीतरी राजकारणात पडू असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांचं स्वप्न होतं ते ‘फॉर्मुला वन रेस’मध्ये भाग घ्यायचं….!!! खरं तर त्यांना त्यात करीअरच करायचं होतं. या स्वप्नाविषयी बोलताना ते अक्षरशः हरखून जातात. “मला वेगाचं प्रचंड वेड आहे. त्यामुळेच असेल पण, राजकारणात पडण्यापूर्वी मी रेसिंगमध्येच करीअर करायचा विचार खूप गंभीरपणे केला होता. पण ते काही जमून आलं नाही.”

फॉर्मुला वन’मध्ये सहभागी होता आलं नाही म्हणून त्यांची वेगवान ड्रायव्हिंगची आवड कमी झाली अस थोडीच होणार आहे …!!! पुणे-सातारा मेगाहायवेच्या रूपाने त्यांना नवा ट्रॅक सापडला. साताराते पुणे हे ११० किमीचं अंतर उदयनराजेंनी एकदा फक्त ३५ मिनिटांत पार केल्याची आख्यायिका सातार्‍यात चहाच्या टपरीवर हमखास ऐकायला मिळते. फेरारी किंवा बुगाटीसारखी एखादी चांगली रेसिंग कार घेण्याची बर्‍याच दिवसांपासून इच्छा आहे, असं मनमोकळेपणाने सांगतात सोबतच ‘हॉर्स रायडिंगही मी चांगलं करतो, पण आता पूर्वीसारखा मोकळा वेळ मिळत नाही,’ अशी खंत ते व्यक्त करतात.

हॉर्स रायडिंग, कार ड्रायव्हिंग, फेरारी,बुगाटी अशा महागड्या आवडी असलेले उदयनराजे म्हणजे एकदम हाय-फाय माणूस, असं विचार एखाद्याच्या मनात चमकुनही जायील  पण जमिनीवरची स्थिती त्याच्या अगदी विपरीत आहे. फॉर्मल कपड्यांचा त्यांना तिटकारा, मग राजेशाही वेशभूषेची शेकडो कोस लांबच. सभांच्या वेळी अगदी नाइलाज म्हणून ते सदरा लेंगा घालतात. अन त्याला ते काय म्हणतात माहितीये ?‘पांढरी गोणी’ …!!! ‘जीन्स, अन त्यावर एखादा कॅज्युअल शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल’ हाच महाराज साहेबांचा ड्रेसकोड!

महाराज सकाळी सहा-साडेसहाला उठतात, व्यायामाची सवय आजही त्यांनी कधी चुकवली नाही ‘पूर्वी मी कराटेसुध्दा शिकलो होतो. अधूनमधून बॉक्सिंगही खेळतो. आजही मी एका मुठीत तीन विटा तोडतो,’ हे सांगताना उदयनराजेंची छाती फुगून येते. व्यायामानंतर महाराज साधारणपणे साडेआठ पर्यंत ऑफिसमध्ये पोहोचतात. मग लोकांच्या गाठीभेटी, तक्रारी, काम त्यांची तिथ वाटच पाहत असतात. काम करण्याची राजेंची एक विशेष पद्धत आहे, राजाला शोभेल अशीच…!! आलेल्या माणसाने आपली समस्या काय आहे आणि ती सोडवण्यासाठी काय करावं लागेल इतकंच महाराज साहेबांना सांगायचं. ‘तुझ काम होईल,’ म्हणून राजे जेव्हा सांगतात, तेव्हा तो गरजवंत निवांत मनाने घरी जातो. पद्धत चांगली की वाईट, यावर कदाचित मतभेद होऊ शकतात, पण ‘राजे कधी कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात.

 

कोल्हापुरात असतील तर महाराज साहेब दुपारी जेवायला वाडय़ावर जातात. ‘मी शाकाहारात एक कारलं सोडूल तर सगळ्या भाज्या खातो. नॉनव्हेजचं म्हणाल तर क्वचित मटण खातो पण मला ते फारसं आवडत नाही.’

उद्यनराजेंचा मुलगा वीरप्रतापसिंहराजे पुण्यात असतो तर उदयनराजेंच्या आई राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंह महाराज भोसले सातार्‍याच्या जलमंदिर वाडय़ात राहतात. केलंयविशेष म्हणजे, राजमाता कल्पनाराजे आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे हे सुध्दा बहुतेकदा एकमेकांशी अस्खलित इंग्रजीतच संवाद साधताना दिसतात! उदयनराजे लोकांमध्ये मिसळतात, तर कल्पनाराजे त्यांच्या नेमक्या विरुद्ध, लोक आजही त्यांना घाबरतात. घराणेशाहीतल्या कलहामुळे मधली वर्ष कल्पनाराजेंना बरंच सोसावं लागलं. निवडणुकीच्या राजकारणातही त्यांनी उतरून पाहिलं होत पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही.

खुद्द उदयनराजेंच्या विरोधातही अभयसिंहराजे आणि त्यांचा मुलगा शिवेंद्रराजे (म्हणजे उदयनराजेंचे चुलतबंधू) यांनी निवडणुकीचं राजकारण केलेल राजकारण जगजाहीर आहे. १९९६ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उदयनराजेंनी निवडणूक लढवली, पण त्यांच्या वाटय़ाला पराभव आला, तेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि १९९८ च्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उदयनराजे निवडून आले, आणि त्या वेळी युतीच्या सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आलं. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजेंच्या विरोधात उदयनराजेंना पुन्हा पराभूत व्हावं लागलं. तर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, पण कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही, हे कळल्यावर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं.

आज उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार बनले आहेत, आणि जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पूर्ण पकड आहे. राष्ट्रवादीच्याच शिवेंद्रराजे यांनीही त्यांच्याशी पॅच-अप

खासदार म्हणून उदयनराजे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभेत त्यांचं पहिलं भाषण इंग्रजीत केलं, याचं सातारकरांना भयंकर कौतुक, म्हणे भारावलेल्या सातारकरांनी उदयनराजेंचा लोकसभेत भाषण करतानाचा फोटो संपूर्ण जिल्ह्यात होर्डिगवर लावला होता. सोबतच, स्थानिक लोकल चॅनल्सने त्याची व्हिडिओ टेप वारंवार दाखवली होती. आपले राजे इंग्रजाला लाजवील अस इंग्रजीत बोलतात यावरच सातार्‍यातली प्रजा जाम खूष आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button