Uncategorizedभुताच्या गोष्टी

“शेवटचा प्याला” | गावाकडच्या भुताच्या गोष्टी भाग -३

सुरेशला नुकतीच एक मिटिंग संपवून त्याला खूप लांबचा प्रवास करायचा होता…रात्र झाली होती हायवेवर एक बार त्याला दिसत होता…त्या बार जवळ त्याने गाडी थांबवली आणि तिथे तो दारू पित बसला होता…त्याने वाटेत पिण्यासाठी काही बाटल्या घेतल्या आणि दारू पिल्यावर आपलं आवडीचं गाणं “मैं शराबी हूं” लावून तो गाडी चालवू लागला….बार च्या जरा पुढे गेल्यावर त्याला त्याला त्या हायवे वर एक महिला आणि तिची दोन मुले दिसू लागली….ती बाई एकदम नटूनथटून जात होती…सुरेश च लक्ष तिच्याकडे होतं… त्याचवेळी तिनं सुरेशला लिफ्ट साठी हाथ दाखवून इशारा केला


सुरेश मनोमन खुश झाला…इतकी सुंदर बाई रात्रीच्या वेळी…त्याच्या मनात वेगळाच प्लॅन सुरू झाला …
गाडी थांबताच त्या बाईने आपल्या मुलांना मागच्या सीट वर बसवलं आणि आपण मात्र सुरेश जवळ पुढच्या सीट वर येऊन बसली…सुरेश तिच्याकडे बघतच राहिला…


थोडं पुढं गेल्यावर सुरेश म्हणाला….”बोला मॅडम कुठे सोडू तुम्हाला?” त्या बाईने बोलायला सुरुवात केली “माझी गाडी खराब झालीय …असो माझं नाव अंजली ..ही माझी दोन मुले….अंजली मुलांच्या कडे बघून म्हणाली …”मुलांनो hi करा अंकल ला” मुले सुद्धा एक सुरात बोलली ” hi अंकल”.सुरेश हसला अंजली चे रूप बघून त्यांचे धाडस वाढले…
तो अंजलीला म्हणला ” बर आता मुलांच्या आई बद्दल जरा सांगा..राहता कुठे..??
अंजली थोड्या गंभीर आवाजात बोलली ” मी इथेच राहते..ह्या रस्त्यावर
सुरेश जरा तोंड वाकडं करून म्हणाला..काय??ह्या रस्त्यावर???दिसायला तर चांगल्या घरातल्या दिसता

अंजली एकदम स्तब्ध पणे बोलू लागली तिच्या बोलण्यातील नाजूकतेने आता गंभीर स्वरूप घेतलं “हो मी इथेच राहते ह्या रस्त्यावर…4 वर्षांपासून…मी माझी मुले आणि नवरा एक लग्न उरकून घरी चाललो होतो..तितक्यात एका बेवड्या ट्रक ड्राइव्हर ने दारूच्या नशेत गाडी चालवून आम्हाला धडक दिली ..माझा नवरा वाचला पण आम्ही तिघे…तू पण त्यातलाच आहेस…दारुडा…तुला सोडणार नाही..तुला मरावं लागेल

सुरेशला आता काही सुचेना त्याला प्रचंड राग आला..”ए xxx साली भीती कुणाला दाखवते…उतर.. उतर खाली

अंजली पुढे बोट दाखवू लागली.”तो खांब दिसतोय तिथं चिरडलो गेलो होतो आम्ही

जसा जसा तो खांब जवळ येऊ लागला तस ती मागची मुलं रडू लागली….अंजलीच्या डोक्यातून अचानकपणे रक्त वाहू लागल..तिचा हात वाकडा होऊ लागला..एखाद्या डोक्याचा चेंदामेंदा व्हावा तसं डोकं तीच होऊ लागलं..तिचं रक्त सुरेश च्या पायाला लागत होतं..त्याने मागे बघितलं तर मुलं सुद्धा अस्थाव्यस्त पडली होती…रक्ताच्या थारोळ्यानी त्याची व्हाईट सीट लाल भडक झाली होती…गाडीत तिघांच्या प्रचंड किंचाळ्या ऐकु येत होत्या…सुरेश ला आता सहन होत नव्हतं…त्याने घाबरून गाडी साईड ला घेण्याचा प्रयत्न केला पण समोरून येणाऱ्या ट्रक ची त्याला धडक बसली आणि प्रचंड मोठा अपघात झाला…तो उडून बाहेर पडला …डोक्याला मार लागल्या मुळे रक्त येत होतं तो तडफडू लागला


समोर त्याला अंजली आणि तिची मुलं दिसतं होती..ती मुलं नाचत हासत म्हणत होती..”अंकल खुळा,अंकल खुळा…मम्मीने अंकल ला फसवलं फसवलं
आणि अंजली…आपल्या केसांवरून हात फिरवून गाणं गुणगुणत होती “मैं शराबी हूं”
त्यांचे हसते चेहरे बघून सुरेशने प्राण सोडले

———- शशांक सुर्वे——–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button