Uncategorized

या माणसाने “लाल वादळ” मुंबईवर नेलंय … !! शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा “कॉम्रेड”

अगदी काल-परवा त्रिपुरामध्ये लेनिनची मूर्ती पाडली गेली, अन देशातल्या मिडीयाने “डावे संपले” असा टाहो फोडला, सत्तेच्या राजकारणात डावे हरले होते. केरळ सोडलं तर डाव्या विचारांना देशात कुठे थारा नाही अशे नकाशे उजवीकडच राजकारण करणाऱ्या भाजपने वाटलेही… पण ज्या वेळेस डाव्यांचा त्रिपुरातील किल्ला उध्वस्त होत होता… साम्यवादाच प्रतिक म्हणून लेनिनची मूर्ती पाडली जात होती… त्या वेळी एक माणूस याच साम्यवादाच्या विचाराला घेऊन नाशिकहून मुंबईकडे निघाला होता सोबत होते ३०,००० शेतकरी… या मानसाच नाव डॉ. अशोक ढवळे.

तुम्ही या मानसाच नाव कधीतरी ऐकलय का ?? या माणसाबद्दल आजची मिडिया बोलणार नाही, कारण हाडूक टाकल्याशिवाय बातमी द्यायचीच नाही हा त्यांचा नियम… अर्थात हे ३५,००० शेतकरी मुंबईकडे येतायेत याची बातमी या मिडीयाने कधी दिली ?? तुम्हीच आठवून पहा… जेव्हा शेतकरी मुंबईच्या तोंडावर येऊन पोचले तेव्हाच ना …!! (असो विषयांतर नको…)

तर डॉ.अशोक ढवळे कोण ?

जो लाल झेंडा घेऊन शेतकरी निघालेत ना… जर तो झेंडा काळजीपूर्वक पहिला तर त्याच्यावर AIKS अस लिहलेल दिसेल. आता हे AIKS म्हणजे काय, तर AIKS म्हणजे अखिल भारतीय किसान सभा(All Indian Kisan Sabha), हि संघटना शेतकऱ्यांच्या हिताविषयी बोलणारी देशातली सर्वात मोठी संघटना आहे. अन या सबंध देशातल्या संघटनेचे प्रमुख(सेक्रेटरी) आहेत डॉ. अशोक ढवळे.

या संघटनेचे देशात सभासद किती आहेत माहितीये ?? तब्बल दीड कोटी शेतकरी या संघटनेचे सभासद आहेत. तुम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील माहिती असतीलच ..!!(साताऱ्यात प्रतिसरकार स्थापन करणारे) तर क्रांतिसिंह नाना पाटलांनी १९५५ मध्ये या सभेच नेतृत्व केल, त्यानंतर ३१ वर्षांनी गोदावरी परुळेकरांनी १९८६ साली नेतृत्व केले, अन आश्चर्याची गोष्ट हि कि २०१७ मध्ये पुन्हा ३१ वर्षानंतर एक मराठी माणूस या संघटनेचा मुख्य नेता झाला …. डॉ. अशोक ढवळे. अशोक ढवळे हे CPM चे एक मोठे नेतेदेखील आहेत, त्यांनी आधी CPI च्या विद्यार्थी संघटनांमध्येसुद्धा काम केलय.

समाजवादाबद्दल म्हणा किंवा साम्यवादाबद्दल आज इतके गैरसमज पसरवून ठेवलेत कि सर्वसामान्य माणूस स्वतःला साम्यवादी म्हनुवून घेत नाही(माझ्या संकुचित बुद्धीला असच वाटत). साम्यवादी म्हणजे नक्षलवादी, भारतविरोधी घोषणा देणारे अशी साम्यवादाची मार्केटिंग मिडीयाने केली. पण देशातून हजारो कोटी चोरून नेणारे कोण ?? लाखो शेतकऱ्यांना मिळून ३४००० कोटी देताना तुम्ही हात आखडता घेता, तसा उद्योगपतींना देताना हात आखडता घेता का?? त्यांची हजारो कोटींची कर्ज write-off करता, का ??

साम्यवाद म्हणजे काय ??

थोडक्यात सांगायचे झाल्यास साम्यवाद म्हणजे शेतकऱ्यांना, कष्टकर्यांना न्याय देणारी विचारधारा म्हणजे साम्यवाद… शोषकांचे निर्मुलन म्हणजे समाजवाद, … संपत्तीचे सम-समान वितरण म्हणजे समाजवाद.

काय आहे सभेच्या मागण्या ??

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने सांगितले होते कि आम्ही शेतकऱ्यांचे ३४,००० कोटींचे कर्ज माफ करणार, पण प्रत्यक्षात आतापर्यंत अवघे १३,७०० कोटींचे कर्जच माफ झाले आहे. सोबतच Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers (Recognition of Forest Rights) हा कायदा शासनाने २००६ मध्ये पारित केला होता पण आज ११ वर्षानंतरही आदिवास्यांना ते पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन मिळाली नाही. स्वामिनाथन आयोगच तर सरकार नावही घ्यायला तयार नाही.

मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय ?? गेले ७ दिवस शेतकरी नाशिकवरून चालत निघाले आहेत.. 180 किलोमीटर हे अंतर आपल्या कारच्या AC मध्ये बसूनही खूप वाटत ना ? हे लोक चालत निघाले आहेत. किसान सभेने प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या खर्चासाठी सोबत १००० रुपये घेण्याची विनंती केली होती, पण बहुतांश शेतकऱ्यांकडे… आदिवास्यांकडे तितके पैसे सुद्धा नवते त्यावेळी सोबत किमान ५०० रुपये तरी घ्या अस सांगितले गेले, पण लोकांकडे तेवढे पैसे सुद्धा नवते (लिहताना कल्पना करवत नाहीये … कि माझ्या बळीराजाची काय हालत झालीये).

या मोर्चात कुणाला पैसे देऊन आणलेले नाही, शेतकऱ्यांनी स्वतःचे जेवण बनवण्यासाठी स्वतः सामान सोबत घेतलाय(कम्युनिस्ट मोर्चांची हि विशेषता आहे), खुपसारे शेतकरी अक्षरशः अनवाणी बिना चपलेचे नाशिकवरून मुंबईला चालत आलेत, उन्हाळा किती तापलय पाहायचं असल ना दुपारी अनवाणी फक्त २००-३०० फुट अनवाणी फिरा…!! गेल्या ७ रात्री माझा बळीराजा उघड्यावर झोपतोय. अन जसा कष्टकऱ्यांचा मोर्चा मुंबईत पोचतो तेव्हा सगळे पक्ष आपला पाठींबा जरीर करता (इतके दिवस काय झोपले होते का…!!) या लोकांनी हे याद राखा … तुम्ही संपत्तीच असमान वितरण करून एका शोषित समाजाची निर्मिती केली आहे… अन अजूनही ती करत आहात…अन हा समाज एक न एक दिवस तुमच्या मुळावर घाव घातल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button