Uncategorizedभुताच्या गोष्टी

वाड्यातले भूत …!! गावाकडच्या भुताच्या गोष्टी | महाराष्ट्रातील भुताच्या गोष्टी

हे भूत-बित काही नसतं रे..सगळ्या अंधश्रद्धा आहेत…बंड्या जरा रागातच बोलला…समोरचा बाळ्या लगेच म्हणाला “गप की मर्दा त्या वाड्यात भूत हाय तुला माहीत नाही काय??दर आमावस्या ला जोरात वरडण्याचा आवाज येतोय वाड्यातन”
बंड्या लगेच बोलला “मला नाही पटत मर्दा..अस कुठ असतय व्हय??चल उद्या आमावस्या आहे मी जातो वाड्यात काय पैज बोल??

बाळ्या आता जरा तावातावाने बोलला”चल लाव हजार रुपये..पण वाड्यात जाऊन यायचं ते पण रात्री 12 नंतर” दोघांची पैज ठरली…बंड्या लई कारस्थानी माणूस हे बाळ्याला माहीत होतं..म्हणून व्हिडिओ कॉल ऑन करून तिथं जायचं ठरलं…!! शेवटी आमवश्या आली..12 वाजले..वाडा तसा जास्त दूर नव्हता..किर्रर्रर अंधार…बंड्याने घरातला जुना कंदील घेतला आणि चालू लागला…सगळीकडे काळोख…कंदिलाच्या मंद उजेडात बंड्या गाणी लावून निवांत चालला होता…कुत्री भूकत होती वाडा जवळ आला…बंड्याने वाड्याचे गेट उघडले…बाळ्या व्हिडिओ कॉल वर सगळं बघत होता कधी चिडवत होता…त्या किर्रर्रर अंधारात बाळ्या सोबतील होता मोबाईल वर त्यांची चेष्टा मस्करी चालली होती तेवढ्यात अचानक बंड्याला कसला तरी धक्का लागला मोबाईल खाली पडला…तिकडे बाळ्या घाबरून घट्ट झाला होता….”काय झालं र बंड्या कोण हाय” आधीच घाबरलेला बंड्या कंदील घेऊन इकडे तिकडे बघू लागला…त्याला बाजूला एक माकड दिसलं आणि त्याच्या जीवात जीव आला “कोण नाही रे माकड उडी मारून गेलं..” बंड्याच धाडस वाढलं होतं…आता बंड्या आत जाऊ लागला…अचानक समोरचा झोपळा हलू लागला …वाऱ्याने हलत असेल असा अंदाज बांधून…बंड्या आत शिरला…

अचानक बाळ्या ला बंड्याच्या मागे कुणीतरी भयानक लालभडक डोळ्यांचा माणूस उभा दिसला…”आर बंड्या माग कोण तर हाय तुझ्या” बंड्या मागे बघतोच तोपर्यंत त्याला सुद्धा ती भयानक काळी आकृती दिसली त्याने बंड्याचा हात पकडला आणि फेकून दिले दूरवर बंड्या आता बेशुद्ध झाला

तिकडे बाळ्याला काही सुचेना तो पळत पळत गल्लीतल्या आक्काबाई जवळ आला..आक्काबाई गावची एक नंबर मांत्रिक…बाळ्याने तिला सगळी हकीकत सांगितली…आक्काबाई तडक म्हणाली”आर बाळ्या चल लवकर त्यो वाड्यातला हैवान पोराचा जीव घेईल” बाळ्या आणि आक्काबाई वाड्यात पोचले…त्या भयाण आकृतीने बंड्याला घट्ट पकडले होते…आक्काबाई तीक्ष्ण नजरेने त्या भूताकडे बघू लागली “आर ए हैवाणा सोड त्या पोराला नाहीतर”

भूत एक गंभिर आवाजात बोललं “ए म्हातारे निघ ह्याला आता मी घेऊन जाणार” आक्काबाई प्रचंड राग आला होता…तिकडे बंड्या बेशुद्ध अवस्थेत होता ..भूत त्याला मागून लाथा मारत होते. आता आक्काबाई ने हातात पाणी घेतलं आणि बंड्याच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि कर्णकर्कश आवाजात एक मंत्र म्हंटला

आरं…..एssss..बंड्या…मेल्या..मुडद्या…आठ वाजले अजून झोपलास….कामावर कोण तुझा आजोबा जाणार काय…भाड्या उठ लवकर…

ह्या शब्दाबरोबर आणि एकदा पाण्याचा शिडकावा झाला आणि त्याच्या समोर त्याची आई उभी होती…त्याला आता जाग आली..घरात आई तिचा राग आणि घड्याळ बघून तो उठून लगेच बाथरूम मध्ये शिरला….वेळ झाला..कामावर मालक आता बोंब मारणार …हे भुताच स्वप्न लईच महागात पडलं

…….शशांक सुर्वे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button