Uncategorized

मुअम्मर अल गद्दाफी : 70,000 महिलांसोबत संबंध

२०१२ मध्ये एक इंग्रजी सिनेमा आला होता, “द डीक्टेटर(The Dectetor)” नावाचा…!!! रीपेब्लिक ऑफ वाडिया नावाच्या देशाचा हुकुमशहा अल्लादिन या व्यक्तिरेखेभोवती फिरणारा हा मनोरंजक चित्रपट जगात खूप गाजला होता. पाकिस्तान, ताजिकिस्तान, उजबेकिस्तान यासारख्या देशात मात्र या चित्रपटावर बंदी घालण्यात आली अन तेथे याला दाखवला गेल नाही. या चित्रपटाचा नायक असतो वाडियाचा हुकुमशहा अल्लादिन. या अल्लादिनचे हजारो महिलांसोबत संबंध असतात. अन जिच्यासोबत त्याचे संबंध आले त्या प्रत्येक महिलेचा फोटो त्याने एका भिंतीवर चीटकवलेला असतो.

decteror movie gaddafi

निव्वळ कल्पनारंजन अन असा कुणी हुकुमशहा जगाच्या कोपऱ्यात कुठेही अस्तित्वात नाही असे धरूनच आम्ही हा चित्रपट पहिला होता. पण न सत्य हे नेहमीच कल्पनेपेक्षाही जास्त रंजक असते !! काही दिवसांपूर्वी “द व्हायरल महाराष्ट्राच्या” टीम ला खऱ्या जगातला अल्लादिन सापडला.

Libiyan Dectetor – Muammar Gaddafi

तर सापडलेला हा हुकुमशहा राहायचा लिबिया नावाच्या देशात !! इजिप्तच्या अगदी ताटाला ताट अन आपल्या मराठमोळ्या भाषेत बोलायचं म्हणजे बांधाला-बांध टाकून बसलेला अन Mediterrian समुद्राच्या खालच्या अंगाला असलेला  हा उत्तर आफ्रिकेचा देश म्हणजे लिबिया. तर या लिबिया देशात मुअम्मर अल गद्दाफी(Muammar Al Gaddafi) नावाचा माणूस 15 जानेवारी 1970 रोजी लिबियाचा पंतप्रधान बनला.  

अरब स्प्रिंग मध्ये ज्या देशात सत्तांतरे झाली त्यातलाच लिबिया(Libiya) एक देश 2011 मध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे गद्दाफी गंभीर जखमी झाला होता अन रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

गद्दाफी(Muammar Gaddafi) हा एक क्रूर हुकुमशहा म्हणून प्रसिद्ध त्याच्या क्रूरपणाचे किस्से आजही जगात सांगितले जातात तो आपल्या नागरिकांना अत्यंत क्रूर अशी वागणूक द्यायचा. महिलांवर तर त्याची कायम वाईट नजर असायची अन पुरुषांपेक्षा जास्त विश्वास तो महिलांवर करायचा. त्याच्या personal बॉडीगार्डही तरुणी आणि महिलाच असायच्या. अनेक इंग्रजी वाहिन्यांच्या हवाल्याने सांगितले जाते कि त्याने 70 हजारावर महिला उपभोगल्या होत्या. गद्दाफीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयीच्या अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर आल्या. त्यातला स्रियाबद्दलचा दावा त्याचा एकेकाळचा नोकर फैसल याने केला होता. (अर्थात हे खुलासे त्याच्या मृत्युनंतर झाले)

Muammar Gaddafi Story Marathi

मुअम्मर गद्दाफी(Muammar Gaddafi) हा रंगेल, स्रीलंपट, अशी त्याची प्रतिमा सगळ्या जगात होती. तो अनेक अविवाहित महिलांना घेऊन जगभर फिरत असे. सुरक्षेच्या कारणामुळे तो महिला अंगरक्षक निवडताना तीन निकष लावत आहे. पहिला टी कुमारिका असावी दुसरा तिचे लग्न झालेले नसावे अन तिसरा म्हणजे तिने गद्दाफीसाठी जीवाची पर्वा न करता लढण्याची तयारी ठेवावी. गद्दाफी हजारो मुलींची चाचणी घ्यायचा. हा हुकुमशहा जेव्हा परदेश दौ-यावर जायचा तेव्हा आपल्याबरोबर ३० महिला बॉडीगार्ड, पाच विमाने, एक ऊंट आणि एक तंबूचा बरोबर घेऊन जायचा. अर्थातच या महिला बॉडीगार्ड्सबरोबर तो शारिरीक संबंध ठेवायचा.

आश्चर्याची बातमी अशी कि त्याचा मुलगाही या बॉडीगार्ड्सबरोबर संबंध ठेवायचा. फैसलने गद्दाफीच्या मृत्युनंतर सांगितले कि, गद्दाफी कोणत्याही कामापूर्वी महिलेशी संबंध ठेवायचा अन मग नंतरच त्या कामासाठी जायचा. अशी अनेक खळबळजनक माहिती त्याने दिली होती. विशेष म्हणजे या महिलांचा मोठ्या प्रमाणावर छळही गद्दाफी करायचा.

Libiya Map

क्रूर हुकूमशहा म्हणून ओळखला जाणारा गद्दाफी एकेकाळी एका महिलेवर मनापासून प्रेम करायचा. गद्दाफींच्या घरात बंडखोराच्या हाती लागलेल्या त्याच्या खासगी फोटो अल्बम मधले फोटो हे त्याच प्रेम व्यक्त करायला पुरेसे आहेत. इतक्या मोठ्या हुकुमशहाने हा अल्बम स्वतः आपल्या प्रेयसीसाठी तयार केला होता म्हणे.

Muammar Gaddafi Love Story

अन गद्दाफीला कोण आवडायचे हे तर अजून धक्केदायक आहे…. कोंडालिसा रायीस ..!!! या अल्बममध्ये जॉर्ज बुश यांच्या जवळच्या सहकारी आणि परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांचे फोटो होते. कर्नल गद्दाफी हे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांचे चाहते होते अन अर्थातच त्यांनी हे कधी लपवूनही ठेवले नवते याबाबत २००७ साली त्यांनी अल झजीरा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही सांगितले होते.

“या आफ्रिकी वंशाच्या महिलेचा मी चाहता आहे… त्यांचा मी सम्मान करतो, असे गद्दाफी म्हणाले होते.”

Muammar Gaddafi and Womens

लिबियाचे हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी याची राजवट क्रूर हे सर्व जगालाच माहिती आहेत. पण आपले सैनिक आपल्यासारखेच क्रूर व्हावेत, शूरांसारखे लढावे म्हणून तो जबरदस्तीने त्यांना कुत्र्यांचे मांस खायला घालायचा. तसेच त्यांच्या मधला स्वाभिमान मारण्यासाठी तो त्यांना मेलेल्या कुत्र्यांचे तोंड चाटायला लावायचा.

प्रत्येक लीबियान सैनिकाला यातून जावेच लागायचे, म्हणूनच कि काय गेली ४० वर्षे त्याने शासन केले… तेही क्रूरपणे ..!!! गद्दाफीचे या मागचे असे गणित होते की, सैनिकांना रक्तपात करताना कोणतीही किळस वाटू नये. तसेच मांस खाल्याने सैनिकांत रग निर्माण होऊन क्रूरता येते असे तो म्हणायचा.

गद्दाफीचे नाव एक क्रूरकर्मा शासनकर्ता म्हणूनच घेतले जाते. मात्र, या हुकूमशाहने आजपर्यंत जगातील कोणत्याही हुकूमशाहला शक्य झाले नाही असा अद्भुत करिश्मा केला होता.

Libiya and Muammar Gaddafi

लिबियाच्या वाळवंटात कृत्रिम नदीद्वारे गोड पाण्याचा प्रवाह वाहता करून गद्दाफीने जगातील आठवे आश्चर्य निर्माण केले होते. मात्र, नाटो फौजांचा गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यात हे आठवे आश्चर्य उद्ध्वस्त झाले. सोबतच गद्दाफीने लिबियाच्या वाळवंटातील जनतेची तहान भागविण्यासाठी पाइप जोडून 2820 किलोमीटर लांबीचे नेटवर्क तयार केले त्यामध्ये न्यूबियन सँडस्टोन अ‍ॅक्विफर सिस्टिम फोसीलद्वारे पिण्याचे पाणी येत होते. हे जगातील सर्वात मोठे पाइपचे भूमिगत नेटवर्क होते. या नेटवर्कमध्ये 1300 हून अधिक विहिरी होत्या. या विहिरींपैकी काही विहिरी 500 मीटरपेक्षाही जास्त खोल होत्या.

Libiyan Infrastructure

लिबियाचा दिवंगत हुकूमशाह गद्दाफीने या कृत्रिम नदीला जगातील आठवे आश्चर्य संबोधले होते. ही कृत्रिम नदीच त्रिपोली(लीबियाची राजधानी), बेनगाजी आणि सिर्तसह लिबियाच्या अनेक शहरांना पाणीपुरवठा करीत होती. सप्टेंबर 1996 मध्ये सुरू झालेली ही कृत्रिम नदी आता बंद झाली आहे. नाटो फौजांनी केलेला गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यांमध्ये ही नदी नष्ट झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button