Uncategorized

अंतरिक्षातले ५ चित्र-विचित्र ग्रह

हे ब्रह्मांड विशाल आहे, इतक अतिविशाल कि माणसाच्या बुद्धीपलीकडच ..!! संशोधकांच्या मतानुसार पृथ्वीवर जितके मातीचे कन आहेत ना त्यापेक्षा १०००० पट ग्रह या ब्रह्मांडात आहेत. जितके विचित्र.. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी समुद्र अन भूतलावर आहेत तितकेच विचित्र अन वेगवेगळे ग्रह-तारे या ब्रह्मांडात आहेत. physics च्या नियम म्हणतात उडीद वड्या सारख्याआकाराचा ग्रहसुद्धा या ब्रह्मांडात अस्तित्वात असू शकतो.

आज आपण जाणून घेणार आहोत अशाच ५ चित्र-विचित्र ग्रहांबद्दल. तुम्हाला यामधील कोणता ग्रह आवडला हे सांगायला विसरू नका …

अंतरिक्षाच्या अन विज्ञानाच्या जगात तुमच स्वागत आहे, व्हायरल महाराष्ट्र तुमच्यासाठी यापुढे अंतरीक्षासंबंधीचे लेख व्ही.आय.पी. मराठी या युट्युब चेनल च्या सहयोगाने घेऊन येत आहे.

HD 188753AB

कल्पना करा, सकाळ सकाळ उठून तुम्ही फिरायला निघता … चालता चालता तुम्ही काय पाहता… तर तुमच्या ३-३ सावल्या पडलेल्या…!! चमकून तुम्ही आकाशात पाहता तर काय …!! ३-३ सूर्य आकाशात तळपताना दिसतायेत …काय भुताटकी झाली ही, असा विचार नक्की तुमच्या डोक्यात येणार.

अर्थात ही HD 188753AB या ग्रहावरची रोजचीच गोष्ट आहे. आतापर्यंत माणसाला सापडलेला हा एकमात्र ग्रह आहे जो ट्रिपल स्टार सिस्टम मध्ये स्थित आहे. म्हणजे जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसाच हा ग्रह चक्क त्याच्या ३ सुर्यांभोवती फिरतो. पृथ्वीपासून जवळपास १५० प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या या ग्रहावर गेले २७५ वर्ष रात्र झालेलीच नाहीये..!!

HD 189773B

आता एक असा ग्रह आहे, जिथे दिवस असो, रात्र असो.. दुपार असो वा पहाट.. इथे सदानकदा पाऊसच पडत असतो… पण हा पाऊस साधासुधा नाही बर का.. इथे काचेचा पाऊस पडत असतो. हा पाऊस इतका भयानक असतो कि समझा पृथ्वीवर अशा प्रकारचा पाऊस झाला तर त्या ठिकाणी एक माणूस किंवा घर सुद्धा शिल्लक राहणार नाही. या ग्रहाच नाव आहे HD 189773B अन इथे तब्बल ५४०० मैल/ प्रतितास म्हणजे आवाजाच्या वेगाच्या ७ पट अन आपल्याकडे अगदी जोरात वाहणाऱ्या हवेच्या २०० पट इतक्या वेगाने हवा वाहत असते. म्हणजे या वेगाने धावणारी एखादी गाडी तुमच्याकडे असती तर अवघ्या ५ तासात तुम्ही पृथ्वी पादाक्रांत केली असती. तिथल्या हवामानात सिलीकेट चे कन आहेत अन अतिउच्च तापमानामुळे त्याचं काचेत रुपांतर होत. अन याच काच असलेल्या हवामानामुळे लांबून पाहिलं असता हा ग्रह निळ्या रंगाचा दिसतो.

55CANCRI E

पुढचा जो ग्रह आहे, त्याबद्दल ऐकून कदाचित तुम्हाला तिथे जाण्याचा नक्की मोह होण्याची शक्यता आहे. कारण माहितीये का … या ग्रहाची एक थर संपूर्णपणे हिऱ्याचा बनलेला आहे. 55CANCRI E. पृथ्वीचा वरचा थर प्रामुख्यान granite व पाण्याने ने बनलेला आहे तर 55CANCRI E चा वरचा थर हा granite अन diamond ने बनलेला आहे. अत्यंत विपुल मात्रेने कार्बन असल्याकारणाने या ग्रहाचा वरचा थर हिऱ्याचा बनलेला आहे. पृथ्वीपेक्षा जवळपास दुपटीने मोठा या ग्रहाच तापमान २१०० डिग्री इतक भयानक आहे.

TRES 2B

पुढचा जो ग्रह आहे, तो आत्तापर्यंत शोधलेला सगळ्यात काळा ग्रह आहे ज्याच नाव TRES 2B हे आहे. हा इतका काळा आहे कारण यावर पडणारा ९९% प्रकाश हा शोषून घेतो, अन म्हणूनच या ग्रहावर अंधारच अंधार दिसून येतो. या ग्रहाच वातावरणच इतक वैशिष्ट्यपूर्ण आहे ज्यामुळे हा जवळपास सगळा प्रकाश शोषून घेतो, अर्थात न शोषल्या गेलेल्या १% प्रकाशामुळे याला पाहता येणे शक्य झाले. आपल्यापासून ७५० प्रकाशवर्ष दूर असणारा हा ग्रह ११०० डिग्री इतके आहे अन म्हणूनच हा काळसर लाल असा दिसतो.

GLIESE 581C

आपला पुढचा जो ग्रह आहे त्यावर कदाचित जीवन असण्याची सर्वाधिक संभावना आहे या ग्रहाचे नाव आहे GLIESE 581C. हा ग्रह एका लाल ताऱ्याची परिक्रमा करतो, पण विशेष म्हणजे हा स्वताभोवती फिरत नाही. अन म्हणूनच या ग्रहाची एक बाजू ताऱ्याच्या समोर तर दुसरी झाकलेली आहे. ताऱ्यासमोरची बाजू अत्यंत भयानक गरम तर विरोधातली बाजू बर्फासारखी थंड.. आता तुम्ही म्हणाल या दोन्ही बाजू तर जीवन निर्माण होण्याच्या अयोग्यातेच्या वाटतात, पण थांबा या डॉन बाजूंच्या मधला Transition Zone तो जीवनासाठी अत्यंत योग्य असा आहे. २००८ मध्ये संशोधकांनी या ग्रहाच्या दिशेने काही संदेश पाठवलेले आहेत ते पोहचायला १० ते १२ वर्ष लागतील. अन कदाचित तेथील संभावित जीवनाने उत्तर पाठवले तर येत्या १५ वर्षात आपल्याला पृथ्वीव्यतिरिक्त जीवनाचा शोध लागेल

वरीलपैकी कोणत्या ग्रहावर जायला तुम्हाला आवडेल कमेंटमध्ये जरूर सांगा… आणी तुमच्या मित्रमंडळीसोबत share करायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button