Uncategorized

जर पृथ्वी सपाट असती तर…!!

मानवी संकृतीच्या उद्यापासून हजारो वर्ष अगदी कालपरवा पर्यंत माणूस हेच मानत होता कि पृथ्वी सपाट आहे. पण जसा-जसा काळ गेला संशोधकांनी हे शोधून काढलं कि इतर ग्रह-ताऱ्याप्रमाणे पृथ्वीसुद्धा गोलच आहे. पण कधीतरी तुमच्या डोक्यात हा प्रश्न निर्माण झालाच असेल कि … खरच पृथ्वी सपाट असती तर ??? चला आजच्या विज्ञानाच्या भाषांत एपिसोड मध्ये जाणून घेऊया काय झाल असत जर पृथ्वी Flat असती तर…

“व्ही.आय.पी मराठी युट्युब चेनलच्या सौजन्याने द व्हायरल महाराष्ट्र घेऊन आलाय अंतरिक्षाच जग तुमच्यासाठी..”

वस्तुतः गोल असणारी पृथ्वी सपाट असती तर…!!

आपल्याला हे माहितीच आहे कि सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच पृथ्वी स्वतःचीसुद्धा परिक्रमा करत असते, अन या परीक्रमेमुळेच दिवस अन रात्र होत असतात. आता तुम्हाला दिसणाऱ्या या भागाप्रमाणे जर पृथ्वी परिक्रमा करत असती तर दिवस अन रात्र निर्माण झालेच असते, पण समजा या object प्रमाणे पृथ्वीने परिक्रमा केली असती तर ….???

तर पृथ्वीच्या एका बाजूला नेहमी दिवस राहिला असता अन दुसऱ्या बाजूला नेहमी रात्र..!! सूर्याच्या उष्णतेमुळे एका बाजूला मोठमोठाले वाळवंट निर्माण झाले असते तर दुसऱ्या बाजूला अत्यंत थंड असा बर्फाळ प्रदेश. अशा परिस्थितीत जीवन अस्तित्वात असते का … अन जर असते तर कल्पना करा अशा परिस्थिती जीवन किती असह्य असते.

चला थोडा वेळ आपण असा विचार करू, कि पृथ्वी स्वतः भोवती अशी फिरली असती, अन यामुळे पृथ्वीवर नेमके आजच्यासारखेच दिवस अन रात्र निर्माण झाले असते.

तुम्हाला माहितीच आहे कोणत्याही पदार्थाचा गुरुत्वीय बिंदू हे त्याच्या गुरुत्वाकार्षानाच केंद असत. अन समजा पृथ्वी चपटी असती तर अशा परिस्थितीत पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य बरोबर मध्यभागी असता. अन त्यामुळे झाले असे असते कि…. पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुरुत्वीय बल असते. उदाहरणाने समजून घेऊया पृथ्वीच्या मध्यभागावरच्या भूभागावर सगळ काही ठीक असत पण जसजसे तुम्ही बाहेरच्या भागाकडे जाऊ लागाल तुम्हाला जास्त कष्ट पडू लागतील, जस काही तुम्ही एखाद्या डोंगरावर चढता आहात. पृथ्वीच्या केंद्रातले बल तुम्हाला त्याच्याकडे ओढेल, जेणेकरून तुम्हाला चालताना-फिरताना पृथ्वीच्या केंद्रापासूनच्या दूर अंतरावर जास्त कष्ट पडतील.

अन म्हणूनच पृथ्वीच्या केंद्राकापासून दूर बनलेली घर stable राहण्यासाठी अशा पद्धतीने बनलेली असतील, घर तितके दूर तितक ते मध्याकडे कललेल…!!

समजा काही कारणाने सध्या गोल असलेली पृथ्वी सपाट झाली तर …!! पृथ्वीच्या पोटातला उष्मा म्हणजेच लावा पृथ्वीच्या भूभागाच्या अत्यंत जवळ येयील, हजारो वर्ष पृथ्वी या आतल्या उष्मेमुळे जळत राहील, पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट नाश पावेल पण हजारो करोडो वर्षात पृथ्वी थंडही होईल. अन ज्या क्षणी पृथ्वीच्या आतली उष्णता संपेल त्या दिवशी पृथ्वीवरच जीवनही, काही संशोधकांच्या मते पृथ्वीचा थंड गोळा स्वताभोवती अन सूर्याभोवती फिरणे हळूहळू बंद करेल, अन विश्वात हरवून बसेल. कसा वाटला तुम्हाला आजचा लेख कमेंट करून नक्की कळवा, अन आवडला असला तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना दाखवायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button