Uncategorized

दिल्लीवर भगवा फडकवणारा मराठा ! महादजी शिंदे

वर्ष होत १७६१… पानीपत मध्ये भयानक नरसंहार चालू होता. विश्वासरावांच्या मृत्यूनंतर युद्धाची दिशाच बदलून गेली होती…. काही क्षणापूर्वी जिंकणारे मराठे हरायला लागले होते. युद्धाच्या या धामधुमित ३०-३१ वर्षाचा घायाळ झालेला तरुण… वाचलेल्या सैनिकांना घेऊन परत निघाला होता.

पण हा पूर्णविराम नवता… त्याची माघार स्वल्पविराम होता… पूर्णविराम द्यायला तो नक्कीच परत येणार होता…. वाघाने चार पावलं मागे टाकली होती, ती दिल्लीश्वराच सावज टिपायला आजच्या लेखामध्ये आपण दिल्लीला महाराष्ट्रापुढे गुढघे टेकायला लावणाऱ्या महादजी शिंदे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत

हा लेख व्ही.आय.पी मराठी युट्युब चेनल च्या सहयोगाने ‘द व्हायरल महाराष्ट्र’ ने आणला आहे. तुम्ही हा लेख युट्युबवर विडीयोरूपातही पाहू शकता

पानिपतचा उत्तरार्ध

पानिपतच युद्ध महाराष्ट्रासाठी एखाद्या काळ्या रात्रीसारख होत… या एक युद्धाने विश्वासराव, सदाशिवभाऊ अन नानासाहेब अशी धडाडीची मानस पटलावरून बाजूला नेली. सोबतच रघुनाथराव नावाच्या कपटी माणसाचा खुनी खेळ सुरु झाला.

पण काळ्या रात्रीनंतर एक सुंदर पहाट होते. या सुंदर पहाटे माधवराव पेशवा, महादजी शिंदे अन नाना फड़नविस या तिघांनी मिलकर मराठा साम्राज्याला एका अशा उंचीवर नेऊन ठेवल… ज्याची कामना नेहमीच केली गेली होती.

शिंदे घराण्याचे जनकोजी शिंदे शेवटपर्यंत पानिपतात लढत राहिले… युद्धानंतर ७ वर्षांनी महादजी शिंदे घराण्याचे प्रमुख बनले. पानिपतानंतर उत्तर भारताच राजकारण विस्कळीत झाल हो. इकड टोपीवाल्या इंग्रजांनी प्लासीच युद्ध जिंकल होत… अन त्यानंतर बक्सरच्या युद्धानंतर तर त्यांनी बादशाहालाच वेठीस धरल होत.

पण टोपीकरांना दिल्ली अजून खूप दूर होती…. कारण बंगाल अन दिल्लीच्या मध्ये होत ग्वालेर… अन महादजी शिंदे.

महादजी शिंदे

१९७१ मध्ये महादजींनी दिल्लीश्वर बादशाहाला आपल्या अधीन केल… दिल्लीतल पान सुद्धा आता मराठ्यांच्या परवानगीशिवाय हलु शकत नवत. ज्या नाजीब अन रोहील्यांनी हिंदवी स्वराज्याच्याविरुद्ध डोकं उचललं होत. त्या सगळ्या सापांचा बंदोबस्त महादजींनी केला.

पण घरातच एक साप फुसफुसत होता… रघुनाथराव.!! रघुनाथरावांनी अनेकदा आपल विष स्वराज्यावर टाकल.. पण माधवराव पेशवे असेपर्यंत त्याच एक नाही चालल. 

पण माधवरावांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्यावर मात्र हद्दच झाली. रघुनाथरावाणे नारायणरावांवर मारेकरी घालवून हत्या केली. पण तरीही रघुनाथरावाला पेशवा बनवलं नाही तेव्हा तो इंग्रजांना घेऊन स्वराज्यावर चालून आला .

वडगावची लढाई

जानेवारी १७७९, वडगाव. मुंबईहून इंग्रजांनी आपली फौज स्वराज्यावर पाठवली… ४००० ब्रिटीश अन रघुनाथरावाची फौज पुण्याच्या दिशेने निघाले. या सगळ्यांना थांबवण्याची जबाबदारी महादजी शिंदे अन तुकोजी होळकर यांच्यावर होती. या दोघांनी इंग्रजांना हैराण करून सोडलं.

इंग्रजांच जीन इतक हराम झाल होत कि ते पाण्याला सुद्धा महाग झाले होते. ज्या ज्या विहिरीत ते पाणी प्यायला जात ते-ते पाणी विषारी असे.१२ जनवरी १७७९, च्या रात्री महादजी शिंदेंनी ब्रिटिशावर हल्ला करून त्यांना पुरात नामोहरम केल.

मराठी साम्राज्याचा उत्कर्ष

ही लढाईतर महादाजींच्या रणनीतीचा एक नमुना होती. युद्धात जितकी त्यांची तलवार तळपत असे तितकीच बुद्धी शांततेच्या काळात..!! त्यांनी हैदराबादच्या निजामाला हरवून उत्तरेशी त्याचा संबंध तोडून टाकला… तर धर्मांध टिपूला झोडपण्यासाठी त्याच निजामाला बरोबर घेतल.

उत्तर भारत असो वा दक्षिण कोणताही राजा स्वराज्याशी टक्कर घ्यायचा विचारसुद्धा करेनासा झाला होता. महादजी शिंदे आणी नाना फड़नवीस मराठा साम्राज्यातले दोन बहुमुल्य रत्न, दोघांमध्ये मतभेद होते पण मनभेद नवते अन म्हणूनच याच काळात दिल्लीवरही भगवा फडकत होता. कसा वाटला लेख कमेंटमध्ये नक्की सांगा, अन महाराष्ट्राचा स्वर्णिम इतिहास तुमच्या मित्रांसोबत सुद्धा share करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button