दिव्या भारतीचा मृत्यू अपघात कि खून ?

मुंबई पोलिस सांगतात दिव्या भारती चा मृत्यू हा एक एक्सिडेंट आहे. ही घटना 5 एप्रिल 1993 रोजी वर्सोवा, अंधेरी वेस्ट मुंबई मधल्या तुलसी अपार्टमेंटच्या पाचवी मजल्यावरच्या एका अपार्टमेंट मध्ये झाली. अपार्टमेंटमधल्या लिविंग रूमच्या खिडकीतून दिव्या रात्री जवळपास 11.30 च्या दरम्यान खाली पडली तिला जवळच्या दवाखान्यात नेले गेले पण तिथेच तिचा मृत्यू झाला.
सगळ्या घटना अन सहसंबंध
ओम प्रकाश भारती आणि मीता भारती यांची मुलगी दिव्या भारती ९वी नंतर शाळा सोडली. शाळा सोडली तेव्हा टी मॉडलिंग करत होती. अन अचानक गोविंदाचे भाऊ किर्ती कुमारांनी त्यांना हेरोइन म्हणून लाँच करण्याचे ठरविले होते पण गोष्ट जमून नाही आली अन मग दिव्या तेलगु मधल्या बबली राजा चित्रपटात वेंकटेश यांची हिरोइन बनली. चित्रपट तुफान गाजला अन हिंदी मध्ये तीच लॉन्च झाल राजीव राय यांचा चित्रपट विश्वत्मा ही तिची पहली हिंदी फिल्म. त्यानंतर दिव्या ने धडाधड अनेक हिंदी आणि तेलुगू चित्रपटांचा धडाका लावला. दिव्या कुटुंबासोबत राहत असली तरी तीच तिच्या वडिलांसोबत जास्त पटत नवत. तिच्या आईबद्दल खुपदा माध्यमांणी अशा बातम्या दिल्या की ती पत्ते अन जुगाराची व्यसनी होती. फक्त लहान भाऊ कुणाल तेव्हडा दिव्याच्या जवळचा.
एक दिवस ती फिल्मसिटीत ‘शोला आणि शबनम’ शूटिंग करत होती. गोविंदा चित्रपटाचा हिरो होता तेव्हा गोविंदाचा मित्र साजिद तिथ आला. दिव्या आणि साजिद यांची ही पहिली भेट !! या भेटीच रुपांतर प्रेमात झालं. दिव्याचे वडील ओम प्रकाश याविरुद्ध होते पण तरीही या दोघांनी त्यांना न जुमानता लग्न केल. लाग्नासोबातच बाप-लेकीतल बोलन बंद झाल. पर माहेरचा खर्च तरीही दिव्याच उचलत होती.
लग्नानंतर जोडपं वर्सोवातल्या तुळसी अपार्टमेंटमध्ये राहायला लागले. सुरुवातीला साजिद आणि दिव्या ने काही आठवडे आपल लग्न जगापासून लपविल. तेव्हा मुंबई सांप्रदायिक तणावात होते त्यात साजिद मुसलमान तर दिव्या हिंदू. या लग्नाने दिव्याचे करियर संपले असते या भीतीने दोघांनी लग्न लपविले.
आता गोष्ट त्या दिवसाची ज्या दिवशी हे सगळ झाल. 4 एप्रिलला दिव्या एका फिल्मच शूटिंग करून परत आली तिला दुसऱ्या दिवशी हैदराबादला जायच होत. या दरम्यान त्यांना एक ब्रोकर भेटला अन त्याने तिला एका फ्लॅट बद्दल सांगितले. दिव्याला खूप दिवसांपासून एक घर खरेदी करायचं होत. पण त्यादिवशी शुटींगच्या ताणाने पाय दुखत असल्याने तिन हैदराबाद ला ५ ला नाही तर ६ तारखेला जायचं ठरवलं.
त्याच दिवशी दिव्या भाऊ कुणाल आणि ब्रोकरसह वांद्र्यामधल्या नेपच्यून अपार्टमेंटमध्ये घर पाहायला गेले. एक 4 बेडरूम फ्लॅट त्यांना पसंतही पडला अन त्याच डील त्यांनी फाइनल केल, कॅश मध्ये पेमेंट सगळ झाल. दिव्या त्या दिवशी खूप आनंदी होती साजिदला एका फिल्मसाठी मॉरिशसला जायचं होत. अन तो परत आल्यानंतर दोघ वांद्र्याला शिफ्ट होणार आहे अस त्यांनी ठरवलं. तिथून दिव्या माहेरला आली पण त्यानंतर तेव्हड्यात तिला फोन आला कि फैशन डिझायनर नीता लुल्ला दिव्या चा ड्रेस final करायला येत आहे. दिव्या लगेच स्वतःच्या घरी पोहचली. रात्री जवळपास 10 वाजता नीता अन तिचा नवरा सायकट्रिस्ट डॉ. श्याम दिव्याकडे पोचले तेव्हा घरी दिव्या अन तिची मोलकरीण अमृता होती. काहीवेळ तिघांनी खाणेपिणे केले त्यांनी थोड ड्रिंकसुद्धा केल.
बोलता बोलता दिव्या लिविंग रूम की खिडकीच्या बाजूला गेली. खिडकी उघडी होती अन तिला ग्रीलसुद्धा नवते. दिव्या खिडकीवर चढली अन बाहेरच्या बाजूला पाय टाकून बसली. खिडकीच्या बाहेर सुमारे एक फुट की पट्टी होती. दिव्याच्या मित्रांच्या मते ती नेहमीच असे बसत असे. तिथे बसून येणारी मोकळी हवा तिला खूप आवडत असे.
यावेळी अमृता चकना तयार करत होती. अन पोलिसांना दिलेल्या statement नुसार नीता अन श्याम टीवी पाहत होते. खिडकीवर बसलेली दिव्या लिविंग रूमकडे वळली आपले हाथ तिने खिडकीच्या कडांना धरण्यासाठी पुढे केले अन अचानक तिचा हात खिडकीवरून सटकला…. ती खाली पडली !! हे सगळ काही सेकंदात झाल. श्याम, नीता अन अमृता पळत खाली पोचले तेव्हा दिव्या शेवटचे श्वास घेत होती. तिला दवाखान्यात नेले पण काही उपयोग झाला नाही.
दोन दिवसांनी हिंदू रीति रिवाजानुसार अंतिम संस्कार केले गेले. नवरीच्या लाल शालूमध्ये लपेटलेल्या दिव्याची शेवटची छायाचित्र अजूनही लोक विसरलेले नाहीत.
घटनास्थल वर उपस्थित नीता लुल्ला, त्यांचे पती डॉ. श्याम, दिव्या के पति साजिद, पालक ओम आणि मीता, भाई कुणाल यांची चौकशी झाली नोकरीन अमृताही घटनेच्या वेळी उपस्थित होती. पण अवघ्या काही महिन्यात अमृताचा हार्ट attack ने मृत्यू झाला.
असा प्रश्न देखील उठला की साजिद त्या वेळी कोठे होते याचे समाधानकारक उत्तर काही मिळाल नाही. लोक सांगतात दिव्या अन साजिदचे भांडण चालू होते. काही वडिलांशी झालेल्या भांडणाचा दाखला देतात तर काही आईच्या जुगाराचा.