Uncategorized

आता या महिला अधिकाऱ्याचे निवडणुकीतले फोटो होताहेत व्हायरल !

लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्पात आल्या असून शेवटचा टप्पा १९मे ला पूर्ण होणार आहे. पाचव्या अन सहाव्या टप्प्यात एका महिला अधिकाऱ्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

पिवळ्या साडीतली एक महिला EVM मशीनसोबत असतानाचे फोटो सोशल मिडीयावर भलतेच व्हायरल झाले. आता यानंतर मध्य प्रदेशची राजधानी भोपाल येथील निळ्या कपड्यातल्या महिलेचे फोटोसुद्धा चांगलेच व्हायरल होऊ राहिले आहेत. EVM मशीन हातात असतानाचे मतदान केंद्रावरचे फोटो सगळीकडेच चर्चेचा विषय आहे.

भोपाळ येथे मतदानाच्या आधल्या दिवशी लाल परेड ग्राउंडमध्ये पोलिंग पार्टींना पाठवले होते. निवडणूकीच सामान घेऊन निघालेल्या अन निळ्या रंगाचा ड्रेस घातलेल्या महिलेचे नाव योगेश्वरी गोईते अस आहे. भोपाळच्या एक बँकेत त्या काम करतात. मतदानादरम्यान त्यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. निवडणुकीसाठी त्यांची पोस्टिंग भोपाळजवळील गोविंदपुरा आयटीआय बुथवर होती.

याआधी चर्चेत आली होती पिवळ्या साडीतील महिला

पाचव्या टप्प्या दरम्यान पिवळ्या रंगाची साडी घातलेल्या एका महिला अधिकाऱ्याचे फोटो खूप व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे ही महिला सोशल मिडीयावर सेलिब्रिटी बनली आहे. सोशल मीडियामुळे एक रात्रीत स्टार झालेल्या या महिलेचे नाव रीना द्विवेदी आहे अन त्या लखनोमधल्या PWD विभागात assistent engineer म्हणून काम करतात. निवडणुकीसाठी त्यांची ड्युटी नगराम बूथवर होती. अन येथूनच काढलेले त्यांचे फोटो व्हायरल झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button