Uncategorized

हे ईश्वरचंद्र विद्यासागर कोण होते दादा

अगदी काल परवाच बंगालमध्ये भाजप आणी TMC च्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली अन त्या दरम्यान ईश्वरचांद विद्यासागर यांची मूर्ती तुटली. मूर्ती कोणी तोडली याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. पण या दुर्दैवी घटनेच्या वेळी या महान समाज सुधारकाविषयी माहिती देण्याचे ‘द व्हायरल महाराष्ट्र’ ने ठरवले आहे.

भारतीय प्रबोधनाच्या काळात बंगालच्या ज्या मोजक्या लोकांनी समाजसुधारणा सुरु केल्या त्यातले एक ईश्वरचंद्र ! विद्यासागर ह्यांची पुरोगामी समाजसुधारक म्हणून ओळख आहे. महाराष्ट्रात जेव्हा महात्मा ज्योतीराव फुले समाजसुधारणा करत होते अगदी तशाच प्रमाणात बंगालमध्ये ब्राह्मो समाज अन ईश्वरचंद्र करत होते. मुलींच्या शाळांची सुरूवात असो, किंवा विधवांचा पुनर्विवाह अशा विविध समाजसुधारणा करण्याचे धाडस त्यांनी त्या काळात केले.

ममता बॅनर्जी यांनी बदलला प्रोफाइल फोटो.

कोलकाता हिंसाचारानंतर विद्यासागर यांचे नाव सध्या माध्यमांतून प्रसिद्धीच्या झोतात येत आहे अन त्यातल्या त्यात निवडणुका चालू आहेत. तेव्हा ईश्वरचंद्र यांचा वारसा अन त्या ओघाने मिळणारी मते कोणाला नको आहेत?  विद्यासागरांचा पुतळा फोडल्यानंतर संतप्त झालेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अन TMC च्या तमाम कॅडरणे फेसबुक आणि ट्विटरवरील ‘डीपी’ (छायाचित्र) बदलून त्याजागी विदयासागर यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्यार प्रेरणेतून सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्त्री शिक्षणाची मोठीच कोंडी फुले दाम्पत्याने फोडली आणि तेव्हापासून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पश्चिम बंगालमधील विद्यान, दार्शनिक विद्यासागर म्हणजेच ईश्वरचंद्र बंदोपाध्याय हे स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांच्यार प्रयत्नांमुळेच कोलकाता आणि परिसरात मुलींच्या शाळा सुरू झाल्या. कोलकाता आणि हावडा यांना जोडणाऱ्या पुलाला विदयासागर यांचे नाव देण्यात आले आहे.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल थोडस..!!

२६ सप्टेंबर, १८२० ला चंद्र विद्यासागर हे थाकुरदास अन भगवतीदेवी यांच्या पोटी जन्माला आले. पुढे चालून त्यांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळविले. कलकत्याच्या फोर्ट विलियम कॉलेजचे प्रिन्सिपॉलही होते. बंगाली भाषेच्या पुनरुत्थानात त्यांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांची बुद्धिमत्ता फक्त संस्कृतपुरतीच मर्यादित नवती तर ते अनेक विषयात पारंगत होते पण संकृत्वर त्यांचे विशेष प्रेम. त्यांनी बंगाली भाषेतील लिखाणाचे सुलभीकरण करण्यास हातभार लावला तसेच बंगाली लिपीचेही सुलभीकरण केले.

एक दार्शनिक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, अनुवादक, मुद्रक, प्रकाशक अशा अनेक भूमिका त्यांनी त्यांच्या जीवनात अविरतपणे निभावल्या. तो काळ असा होता कि स्रियांची स्थिती फार खराब होते त्यात विधवांची स्तिती तर अत्यंत बिकट..!! सतीप्रथा अजूनही चालू होती, समाज धर्माच्या बाबतीत कुणाचाही ऐकून घेत नसे. या प्रतिकूल काळात त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला अन इतकेच नव्हे तर आपल्या एकुलत्या पुत्राचा विवाह त्यांनी एका विधवेसोबत लावला होता. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” ही म्हण अगदी तंतोतंत लागावी असे त्यांचे व्यक्तिमत्व. त्यांच्याच प्रयत्नाने १८५६ मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पारित झाला. अगदी महाराष्ट्र्तही त्यांचे अनुयायी होते अन महाराष्ट्रातही त्यांच्या प्रेरणेने विधवा विवाह झाले.

विदयासागर यांना सुधारणांच्या संदर्भात राजा राममोहन राय यांचे अन अर्थाने ब्राह्मो समाजाचे उत्तराधिकारी समजले जाते. १८५६ ते १८६० या काळात त्यांनी २५ विधवांचे पुनर्विवाह लावले. तर मुली व महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बैठुने शाळांची स्थापना केली. तसेच एकूण ३५ शाळा सुरू केल्या. एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.

जसे दादोबा तर्खडकरांनी मराठीच्या बाबतीत काम केल तीच व्याकरण लिहल अगदी त्याचप्रकारे बंगाली भाषेला सरळ आणि सोपी बनविण्यात तिचे पुरूत्थान करण्यात विद्यासागर यांचा मोठा हातभार आहे. त्यांनी बंगाली वर्णमालेला सरळ आणि सोप्या पद्धतीने तयार केले. बांग्ला भाषा शिकण्यासाठी त्यांनी शेकडो शाळा स्थापन केल्या, त्यात रात्रशाळांचाही समावेश होता. त्यांनी संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठीही प्रयत्न केले. आपल्या शैक्षणिक काळात ते एक बुद्धीमान विद्यार्थी होते. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना “ज्ञानाचा सागर” असे संबोधले होते. वयाच्या ७० व्या वर्षी १८९१ मध्ये त्यांचे निधन झाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button