Uncategorized

गुजरातमध्ये सापडला पाण्याखालील किल्ला !! मराठी राजाने बांधला होता

गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील उकई धरणाची जलपातळी ६४ फूट कमी झाल्यामुळे पाण्यात एक किल्ल्यासारखे दिसणारे अवशेष दिसायला लागले आहेत. उच्चल जवळील उकाई धरणाचा पाणीसाठा २८५ फुटांपेक्षा जास्त कमी झाला आहे. अन यामुळेच या किल्ल्यासदृश्य अवशेषांचे दर्शन कधी नव्हे ते होत आहे.

सांगण्यात येत कि १७२९ ते १७६२ च्या दरम्यान याच भागात एक किल्ला बांधण्यात आला होता. गुजरातचे तत्कालीन राजे गायकवाड यांना जलसंधारण अन दारुगोळा व शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी एका किल्ल्याची गरज होती. अन बहुदा यासाठीच या किल्ल्याची बांधणी करण्यात आली.

पहिल्यांदाच दिसला का धरणातला किल्ला ?

नाही, यापूर्वीही एकदा हा किल्ला दिसला होता. जवळपास २०-२२ वर्षांपूर्वी १९९७ मध्येसुद्धा दुष्काळामुळे उकाई जलाशयाचे पाणी १० टक्क्यांपेक्षा खाली गेले होते त्यावेळी हा किल्ला पायावयास मिळाला होता. आजसुद्धा दुष्काळामुळे उकाई जलाशयात ५७२ TMC इतकेच पाणी शिल्लक आहे जे जलाशयाच्या क्षमतेच्या अवघे ८% आहे.

कुठे आहे हा किल्ला?

सुरात जिल्यात उत्चलजवळ जामील नावाच एक गाव आहे. या गावापासून जवळपास ३KM अंतरावर हा ढांचा आहे. लोकांच्या सांगण्यानुसार गायकवाड घराण्याच्या काळात या किल्ल्याचा उपयोग ब्रिटीश अन गायकवाड याचे पोलीस करत असत. जेव्हा व्हायरल महाराष्ट्रची टीम तिथे गेली तेव्हा लोकल माणसाने सांगितले कि. १९७२ पर्यंत हा किल्ला अगदी व्यवस्थीत होता पण जेव्हा १९७२ ला उकाई धरण बांधले गेले तेव्हापासून अगदी क्वचितच हा किल्ला पहावयास मिळाला आहे. उकाई धरणाच्या जलाशयामुळे हा किल्ला जवळपास 80 फुट पाण्याखाली दाबला गेला.

कसा आहे किल्ला ?

या किल्ल्यावर स्वतःचा असा एक तोपखाना आहे अन ३ उभ्या तोफा आहेत. या किल्ल्याचा आवर हा 200 मीटर इतका आहे तर उंचीला हा तब्बल ७० फुटांहूनही मोठा आहे. गेल्या आठवड्यापासून हा किल्ला पाहायला मिळतोय.

शशी कुमार (जिल्हा वन अधिकारी) यांनी सांगितले कि “हा किल्ला सोनगढच्या एका टेकडीवर बांधला गेला होता अन जलसंधारानासाठी या किल्ल्यामध्ये अनेक वाव किंवा विहिरीसुद्धा आहेत. आज पाणी कमी झाल्यामुळे दोन तोफा अन tomb पाहायला मिळतो. या किल्ल्याचा acurate आकार कुणालाच माहिती नाहीये पण १९७२ मध्ये या आसपास शेती होती”. स्थानिक सांगतात सोनगडचा किल्ला गायकवाडांनी बांधला होता त्याची उंची 112 मीटर इतकी होती. गाईकवाडांनी दोस्वडा अन उत्चल इथेही किल्ले बांधलेले आहेत.

इतिहासकार सांगतात पण archeological department कड अशा कोणत्याही किल्ल्याच्या नोंदी नाहीत. कदाचित सोनगढ किल्ल्यासोबातच हा किल्लाही बांधला गेलेला असू शकतो.

उकई धरणाची जल साठवणूक क्षमता ३४५ फूट आहे; परंतु मंगळवारी संध्याकाळी धरणाची जलपातळी २८१.१० फूट होती. जलपातळी २७० फुटांवर आल्यावर धरणाचे सर्व दरवाजे बंद केले जातील. तसेच सिंचन व पिण्याचे पाणीही रोखण्यात येईल अस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. व्हायरल महाराष्ट्रच्या अशाच माहितीपर लेखांसाठी नेहमी वाचत रहा ‘व्हायरल महाराष्ट्र’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button