Uncategorized

किती मोठे आहे विश्व ? अन किती लहान आपण

जेव्हा जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या लहानपणाची कल्पना येते. हे विश्व किती मोठे आहे हे केवळ कल्पनेनेचे पाहता येते. आजच्या विज्ञानाने मात्र या विश्वाची कल्पना केलीय. खूप दिवसानंतर गलेक्सी मराठी तुमच्यासाठी घेऊन आलय “संपूर्ण ब्रह्मांड”

नमस्कार मित्रांनो व्ही.आय.पी मराठीच्या सौजन्याने द व्हायरल महाराष्ट्र तुमच्यासाठी अंतरीक्षाची माहिती घेऊन आले आहे. लेख कसे वाटतात हे कमेंट मध्ये नक्की कळवत चला.

पृथ्वीचा परीघ जर आपण विषुववृत्तापासून मोजायला घेतला तर २४८७४ मैल अन उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरून मोजला तर २४८०७ मैल आहे. अन फक्त आपल्या सौरमालेचाच विचार केला तर आकाराच्या मानाने आपल्या पृथ्वीचा चौथा नंबर लागतो. आपल्याच सौरमालेतील नेपुचून, शनी आणि गुरु हे पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. अन जर आपण आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू म्हणजेच आपल्यापासून ९३००० मैल दूर असणाऱ्या सूर्याशी तुलना केली असता तर पृथ्वी अगदीच छोटी आहे.

सर्वसाधारणपणे सूर्य हा खूप मोठा तारा आहे, पण ज्ञात तार्यांच्या आकाराचा विचार केला असता तो अगदीच ठेंगू आहे. उदाहणार्थ अऱ्याकटस जो सूर्याच्या ५० लाख पट मोठा आहे. बिटरगुस जो अऱ्याकटसच्या ३०० पट मोठा आहे तर UV स्कुटनी जो विज्ञानाला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे तो साधारणपणे 500 कोटी सूर्यांना आरामात आपल्या आत सामावू शकतो.

आपण मिल्की-वे नावाच्या आकाशगंगेत राहतो, अन आपल्या या एका आकाशगंगेत साधारणपणे अब्जावधी तारे आहेत अन त्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या जवळपास तितक्याच सूर्यमाला. आपन आत्तापर्यंत जवळपास 500 सूर्यमाला शोधून काढल्या आहेत अन खूपशा सापडत आहेत. शास्रज्ञ सांगतात कि आपल्या सूर्याला स्वताचे orbit पूर्ण करण्यासाठी २० कोटी वर्ष लागतात. आपल्यापासून २५ लाख मैल दूर आहे आपली सगळ्यात जवळची शेजारीण आकाशगंगा “अन्ड्रोमेडा आकाशगंगा”. कालपरवापर्यंत जगातली सर्वात मोठी दुर्बीण असलेली हबल सुद्धा संपूर्ण विश्वाच अवघा कणमात्र भागच आपल्याला दाखवू शकते.

आकाशगंगांच्या नंतर येतो तो “कोस्मिक वेब” ज्याच्यामध्ये लाखो करोडो आकाशगंगा आहेत. अन समजा माणसाने कधी २२३ बिलियन प्रकाशवर्षे इतका लांब प्रवास केलाच तर आपल्याला एक कॉस्मिक ग्लो दिसेल अन ते असेल आपले ब्रह्मांड. पण थांबा, विश्व इथेच संपत नाहीये. कारण यानंतर तुम्हाला मिळतील इतर ब्रह्मांडे, विशेष म्हणजे या प्रत्येक ब्रह्मांडातले भौतिकी, रायासानाकी नियम आपल्यापेक्षा वेगळे असतील अन कदाचित तिथल्याच न्यूटन आईनस्टाईनच्या नियमांचं पालन करतील, आपल्या नाही.

आपण आतापर्यंत अनु इतकेही जग पाहिले नाही कि अनुभवले नाही. माणूस हा डबक्यातल्या बेडसारखा ज्याला फक्त स्वतःच्या डबक्यात अजून जीवन सापडले नाही. खर सांगायचं झाल तर स्वतःच डबकसुद्धा या बेडकाला अजून माहिती नाही. म्हणूनच विश्वात जीवन नसण्याची शक्यता जीवन असण्याच्या शक्यातेपेक्षा अगदीच कमी आहे. अर्थात हे जीवन आपल्याला अपेक्षित असेल असे नाही. कसा वाटला हा लेख आवडला असेल, तर आपल्या मित्रमंडळींना लगेच पाठवा.. अन हो चूकभूल झाली असेल तर सांगा… पुढच्या वेळी नक्की सुधारू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button