मनोरंजन

“स्रीलिंग-पुल्लिंग” मधील बोल्ड सायली कोण आहे ?

अनेक नवनवीन अन तितकेच बोल्ड असे चेहरे सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहेत. अशाच अनेक फ्रेश चेहऱ्यांमधील एक म्हणजे सायली पाटील. सध्या युट्युब वर धुमाकूळ घालत असलेल्या web-सिरीज स्रीलिंग पुलिंगने तर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री.

सायलीचा (Sayli Patil) जन्म ठाण्यात 6 ऑगस्ट १९९३ ला झाला अन तिथेच तिने शालेय अन महाविद्यालयीन शिक्षण घेतले मग मात्र ती विद्यालंकार इन्सिटीट्यूय ऑफ टेक्नॉलॉजी (VIT), वडाळा मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींग करायला लागली. जर अभिनयात आले नसते तर नक्की एक चांगली  इंजिनीअर म्हणून आयटी कंपनीत कामाला असते, अस सायली एक interview मध्ये म्हणाली होती.

शाळा, कॉलेजमध्ये कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा चाळीचा गणपती उत्सव असो सगळीकडे सायली ही असणारच सोबतच होणाऱ्या स्पर्धांमधून नृत्य आणि अभिनय करत आली. या सगळ्या मुळे तिला पुढील वाटचालीत मदत झाली आणि तिचा आत्मविश्वास वाढला.

पहिल्यांदा म. टा. ने घेतलेल्या ‘श्रावण क्विन’  स्पर्धेत सायली दुसऱ्या क्रमांकाने निवडून आली होती. सायलीला अभिनया बरोबरच नृत्याची भयानक आवड आहे. तिने भरत नाट्यमचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर तिला अवघड असे कथ्थक आणि इतर नृत्याचे प्रकारही तिला लीलया जमतात.

छोट्या पडद्यावर तीच पदार्पण झाल ते महेश कोठारे यांच्या बॅनर खाली तयार झालेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या कलर्स मराठीच्या मालिकेतून !! पहिल्यांदा ती एक अभिनेत्री म्हणून घराघरात पोचली. पहिल्याच मालिकेत तिला मध्यवर्ती भूमिका मिळाली,  गणपती बाप्पाची आई माता पार्वती ही भूमिका तिने खूप चांगली वठवली. तिची पहिली कमाई २४ हजार रुपये असल्याचे ती सांगते.

या मालिकेनंतर सायली, कलर्स मराठी वाहिनीवरीलच ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतून प्रेक्षकांना पुन्हा दिसली. इथे जुई (मृणाल दुसानिस) ने मालिका काही खाजगी कारणाने सोडली होते त्यामुळे ही मालिका सायली पाटीलच्या पदरात पडली अन तिने संधीचा फायदा करून घेतला. सहसा मधेच प्रवेश झालेल्या कलाकारांना प्रेक्षक स्वीकारत नाही तरीही मध्ये प्रवेश झाला तरी तिने मालिका चांगली पेलली आणि आज ती जुई म्हणून ती प्रेक्षकांना लक्षात आहे.

दोन वर्ष अन दोन मराठी सिरीयल आता तिला मोठ्या पडद्यावर यायचं होत अन ती संधी तिला मिळालीसुद्धा २०१८ मध्ये आलेल्या ‘Boyz 2’ मध्ये तिन चित्रा नावाच्या मुलीचे काम केले आहे.

थोडक्यात biography

आवडती हिरोईन – माधुरी दीक्षित, आलिया भट. आवडता हिरो – रणबीर कपूर, सलमान खान. आवडता चित्रपट – ‘हम आपके है कोन’ आवडता रंग – लाल. आवडता पदार्थ – कोणताही गोड पदार्थ

सायलीचं single कि रेलेशनमध्ये ?

सायली पाटील (Sayali Patil) अविवाहित असून ती अजूनतरी कोणत्याच relationship मध्ये नाही. आपल्याला सध्या फक्त आणी फक्त कामावरच लक्ष केंद्रित करायचे असल्याचे ती आवर्जून सांगते. पडद्यावर दिसणाऱ्या तिच्या भूमिकेत ती जशी असते अगदी त्याच्या उलट ती खऱ्या आयुष्यात हसरी, आजूबाजूचे वातावरण खुलवणारी आणि मनमोकळी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे.

 ‘स्त्रीलिंगी पुल्लिंगी’ हि वेब सिरीज सायलीच्या बोल्ड अभिनयाने खूप गाजतेय एका बिनधास्त मैत्रिणीचा जो रोल तिने केला आहे जो प्रेक्षकांना तुफान आवडलेला आहे. सायलीच्या पुढच्या कार्यकीर्दीला व्हायरल महाराष्ट्रच्या शुभकामना, लेखाविषयी कमेंट करून अभिप्राय द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button