देश अन राजकारण

संसदेमध्ये दिसतील हे सुंदर खासदार !! कुणी होत अभिनेत्री तर कुणी बँकर

 आताच लागलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप बहुमताने विजयी झाल आहे तर कॉंग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे. पण यावेळच्या निवडणुकांच विशेष म्हणजे यावेळी कधी नव्हे इतक्या महिला लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकांमध्ये कधी नव्हे तो महिलांचा खूप मोठा बोलबाला राहिला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक चर्चित लढती महिलांमध्ये झाल्या जसे कि बारामती मधली सुप्रियाताई सुळे विरुद्ध कांचन कुल लढत, बीडमधली प्रीतमताई मुंडे यांची निवडणुक तर राक्षाताई खडसे यांची निवडणूक.  देशभरातून ७८ महिला यावेळी निवडून लोकसभेवर गेल्या आहेत. महाराष्ट्रातूनही कधी नव्हे इतक्या ८ महिला यावेळी लोकसभेमध्ये दिसतील.

यावर्षी संसदेवर गेलेले अनेक खासदार हे अवघे ३०-३५ वर्षांचे आहेत अन अनेकजनांनी तर चित्रपटसृष्टीमधून राजकारणात पदार्पण केले आहे. आज आपण पाहणार आहोत राजकारणामधले सदाबहार चेहरे.

महाराष्ट्राच्या मातीतला सुगंध तुम्हाला व्हायरल महाराष्ट्रच्या लेखांमधून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमचे लेख कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा.

१. मिमी चक्रवर्ती

बंगाली चित्रपट आणी छोट्या पडद्यावरची अवघ्या ३० वर्षाची प्रसिद्ध अभिनेत्री मिमी तृणमूलच्या तिकिटावर जाधवपूरमधून लढली अन चक्क ३ लाख मतांनी निवडूनही आली. निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात तिचे अनेक फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले होते.

२. नुसरत जहा

बंगाली चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी २८ वर्षाची नुसरतसुद्धा बशीरघाट मतदारसंघातून तृनमुलच्या तिकिटावर लढली आणी तब्बल साडे तीन लाखाच्या लीडणे निवडून आली. चित्रपट क्षेत्रासोबत तो सोशल मिडीयावरसुद्धा खूप active असते.

३. महूआ मोइत्रा

४४ वर्षाच्या बँकर असलेल्या महूआ मित्रा TMC च्या तिकिटावर कृष्णनगर सीटवरून लढल्या अन अत्यंत काट्याच्या झालेल्या लढतीत 60हजार मतांनी निवडून आल्या. लंडनमध्ये भल्यामोठ्या पगाराची नोकरी सोडून मोइत्रा २००९ मध्ये भारतात परतल्या अन ओघानेच राजकारणात आल्या २०१६ मध्ये त्यांनी १९७२ पासून डाव्या पक्षांचा गड समजल्या जाणाऱ्या करीमपूर विधानसभेवर आश्चर्यकारक विजय मिळवला होता.

४. नवनीत कौर राणा.

अशाच एक दक्षिणात्य सिनेतारका महाराष्ट्रात एकमेव अपक्ष खासदार निवडून आल्या अन तेदेखील शिवसेनेचा विदर्भातला गड समजला जाणाऱ्या अशा अमरावतीतून. ३३ वर्षाच्या नवनीत कौर राणा यांनी अत्यंत संघर्षपूर्ण झालेल्या लढतीत ३७ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. नवनीत कौर राणा यांचे विवाह बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेला आहे त्याआधी त्या दक्षिणात्य सिनेश्रुष्टीत काम करत होत्या.

५. रिती पाठक

४१ वर्षाच्या रिती यांनी भाजपाकडून मध्यप्रदेशमधील सिद्धी येथून निवडणुक लढवली अन पावणेतीन लाखांपेक्षाही मतांनी टी जिंकली. त्यादेखील आपल्याला संसदेत पहावयास मिळतील.

६ हिमाद्री सिंग

३२ वर्षाच्या हिमाद्री यांनी भाजपच्या तिकीटवर मध्यप्रदेशमधील शह्डोल मधून निवडणूक लढवली अन तब्बल ४ लाखाच्या लीडने टी जिंकलीदेखील ! हिमाद्री यांचे नातेसंबंध गोड राजघराण्याशी आहेत. त्या कॉंग्रेसमध्येहोत्या पण निवडणुकीच्या आधी त्या भाजपात सामील झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button