Interesting

Police अटक करायला आले तर माहिती असावे असे 10 नियम ! हे कळू नाहीत असच पोलिसांना वाटत

आयुष्यात आपला कधी ना कधी पोलिसांशी संबंध येतोच. गुन्हा केलेला असो वा नसो पण जेव्हा एखाद्या प्रकरणाशी तुमचा संबंध येतो तेव्हा मात्र भल्या-भल्यांची फाटून हातात येते. आज मी तुम्हाला असे काही नियम सांगणार आहे… जे जाणून घेणे अशावेळी तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकेल

“व्हायरल महाराष्ट्रचे लेख जर तुम्हाला आवडला तर share करायला विसरू नका. अन आम्हाला नेहमी वाचत रहा.”

वॉरंटशिवायही होऊ शकते अटक पण विशिष्ट गुन्ह्यांसाठी.

तुम्हाला माहितीये का पोलीस तुम्हाला वोरंटशिवाय सुद्धा arrest करू शकतात ? हो मी सिरीयस आहे..! ज्या गुन्हयाची शिक्षा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे यासाठी पोलीस तुम्हाला बिना वोरंटसुद्धा अटक करू शकतात… रेप, sexual harrasment, खून हे असे काही गुन्हे आहेत ज्याकरिता पोलीस तुम्हाला बिना वोरंट सुद्धा अटक करू शकते.

पण समजा तुम्ही एखादा छोटा-मोठा गुन्हा केला आहे, ज्याची कायद्याने ठरवलेली शिक्षा ही ३ वर्षापेक्षा कमी आहे तर मात्र पोलीस तुम्हाला बिना वोरंट अटक करू शकत नाहीत. उदाहरण चोरीच्या गुन्ह्यासाठी अटक करायची असेल तर मात्र पोलिसांकडे वोरंट हवाच !

१२ तासात घरी माहिती कळवावी लागते

तुम्हाला माहिती आहे का ?? पोलिसांना १२ तासाच्या आत तुमच्या घरच्यांना सांगायचे असते कि तुम्हाला अटक केली आहे.

सोबतच २४ तासांमध्ये पोलिसांना गुन्हेगारांना कोर्टात सादर करावे लागते. अन जर तुम्हाला पोलिसांनी २४ तासात कोर्टात हजर नाही केले तर तो पोलीसाने तुम्हाला illegally अटक केलीय अन अशा पोलिसांच्या विरोधात कारवाई होऊ शकते.

Inspection Memo!!!

तुम्हाला माहिती आहे का ? एक rule असाही आहे ज्याद्वारे हे माहिती करून घेतले जाऊ शकते कि पोलिसांनी कोठडीत तुमच्यासोबत Tourcher केले आहे कि नाही.

Inspection Memo!!! सोप्प्या शब्दात सांगायचं तर एक कागद असतो ज्यावर तुमच्या शरीराला झालेल्या जखमांचा तपशील असतो. जेव्हा तुम्हाला अटक होते तेव्हा एक प्रकारचे medical केले जाते अन तुमच्या शरीरावर कुठे जखम आहे का ? कुठे मार लागलेला आहे का ? अस सगळकाही या Inspection Memo मध्ये लिहिले जाते.

महिलेला अटक

एखाद्या महिलेला फक्त महिला पोलिसाच अटक करू शकतात.. अजून एक महत्वाची बाब एका महिलेला सूर्यास्तानंतर किंवा सुर्योदयापूर्वी अटक केले नाही जाऊ शकत… अर्थात याला काही अपवादसुद्धा आहेत, कारण जेव्हा अधिकाऱ्याकडे कोर्टाची परवानगी असेल तर मात्र एखाद्या महिलेला सूर्यास्तानंतर सुद्धा अशी अटक होऊ शकते.

Arrest Memo

एखादा अधिकारी तुम्हाला अटक करायला आला तर त्याच नाव अन पद हे त्याच्या uniform वर स्पष्टपणे दिसले पाहिजे अन तसे नसेल तर तुम्हाला त्याला जाब विचारण्याचा पुरेपूर हक्क आहे.

जेव्हा एखादा पोलीस अधिकारी तुम्हाला अटक करायला येतो तेव्हा त्याला एक Arrest Memo नावाचा कागद तयार करावा लागतो. यावर तुमचे नाव, अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व पद, अटक ज्याठिकाणी झाली ते ठिकाण, वेळ, तुमच्याकडे काय काय होत म्हणजे मोबाईल, पाकीट, पैसे, घड्याळ इत्यादींचा तपशील हे लिहावे लागते. या arrest मेमोवर एका साक्षीदाराची सही लागते, जो तिथे उपस्थित असेल… जर असा कागद पोलिसांनी बनवला नसेल तर कदाचित तुम्हाला illegally पकडले जातंय….

अटकेच कारण सांगाव लागेल

तुम्हाला अटक करताना अधिकाऱ्याला हे सांगावे लागेल कि तुम्हाला का अटक केली जातेय. कारण कायद्याच्या कचाट्यात अनेकदा निरपराधी लोकसुद्धा सापडले जाण्याचा धोका असतो अन म्हणूनच कायद्याने त्यांना हे जाणून घेण्याचा अधिकार दिला आहे कि त्यांना का अटक होतेय.

तुम्हाला कधी अटक झाली तर तुम्हाला तुमच्या वकिलाला बोलावण्याचा अधिकार आहे.

कायदे समजले म्हणजे काही तुम्ही वकील होत नाहीत, अन नेहमी वकिलाचा सल्ला घेणे हे सर्वात महत्वाचे पण कधी वेळेवर तुम्हाला वकील नाही मिळाला तर या सगळ्या गोष्टी लक्षात असाव्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button