Interesting

विमानात लग्न करण्याची हौस भोवली, त्या जोडप्यांवर होणार कारवाई

हौसेला मोल नसते, आणि आजकाल लोक जी हौस करतात ती सोशल मीडियावर व्हायरल होते. काही दिवसपूर्वी सोशल मीडियावर एक विडिओ आणि काही फोटो व्हायरल होत होते. यामध्ये एक नवीन लग्न झालेले जोडपे होते, ज्यांनी चक्क हवेत म्हणजे विमानात लग्न उरकले आहे.

पृथ्वीवर कोरोंना आहे आणि वरुण अनेक ठिकाणी लॉकडाउन. वरुण या लॉकडाउन मध्ये निमंत्रित लोकांचे नियम. काही वेळा 25 तर काही वेळा 50 इतकेच लोक लग्नाला येऊ शकतात असे नियम अनेकदा बदलत होते. पण या हवेतल्या लग्नाला चक्क 161 वर्‍हाडी उपस्थित होते.

तामिळनाडू मधील गौरपीलयाम या उद्योगपतीचा मुलगा आहे राकेश. तर या राकेशचे लग्न होते आणि त्यासाठी एक विमान बुक करण्यात आले होते. या विमानात दोन्हीकडील जवळचे नातेवाईक उपस्थित होते आणि या सर्वांची कोरोंना चाचणी देखील करण्यात आली होती. हा विवाह जवळपास दोन तास चालला.

हा विवाह सोशल मीडियावर तूफान व्हायरल ठरल. जसे यावर मीम आले तशीच टीकाही झाली. या मध्ये प्रामुख्यामे कोणी मास्क लावलेले दिसत नवते आणि लोक देखील 50 पेक्षा जास्त होते. या सगळ्याची दखल आता  घेतली गेली आहे आणि DGCA आता यावर कार्यवाही करणार आहे. यामधील लोकांसोबतच एयरपोर्ट आणि एयरलाइन यावर देखील कारवाई होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button