मनोरंजन

तेजश्री प्रधान ठरली सर्वाधिक आकर्षक महिला

आपण आकर्षक असावे आणि लोकांनी आपल्याला आकर्षक म्हणावे असे कुणाला नाही वाटत ? आजच्या या लेखामध्ये आपण हेच पाहणार आहोत की महाराष्ट्रामधली सर्वात आकर्षक महिला कोण  पहा कोण कितव्या नंबरवर महाराष्ट्रातील टीव्हीवर येणार्‍या सर्वाधिक आकर्षक महिलांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आता या यादील कुणी कशी बाजी मारली ते आजच्या व्हायरल महाराष्ट्र च्या लेखात वाचा. तुमची आवडती नटी कोणती आणि तुम्ही कुणाला सर्वाधिक आकर्षक समजता हेदेखील कमेंट मध्ये जरूर कळवा.

तुमची आमची आणि सर्वांची आवडती शूभ्रा म्हणजेच तेजश्री प्रधान महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक अभिनेत्री ठरली आहे. आज मराठी टीव्ही विश्वामधील ती सर्वात आकर्षक स्त्री आहे. दुसर्‍या नंबर वर पल्लवी पाटील ही नटी आहे. तिने ट्रिपल सीट, बॉयज 2 या सिनेमामध्ये आणि जिगरबाज या मालिकेमध्ये काम केले आहे.

देवमाणूस मालिकेमधील एसीपी दिव्या म्हणजेच आपल्या हॉटलुक साठी प्रसिद्ध असणारी नेहा खान या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. शिकारी या चित्रपटातून तिने पदार्पण केले. यानंतर अशीच भूमिका तिने ‘काळे धंदे’ या वेब सिरिजमध्ये साकारली आहे. जाडूबाई जोरात आणि माझ्या नवर्‍याची बायको आणि येऊ काशी कशी मी नांदायला या मालिकेतील मोमो म्हणजे अभिनेत्री मीरा जगन्नाथ या यादीत चौथ्या नंबरावर आहे. अभिनेत्री नयना मुके ही या यादीत पाचव्या नंबर वर आहे. तिने गणपती बाप्पा मोरया या मालिकेमध्ये लक्ष्मीदेवीची भूमिका साकारली होती.

माझ्या नवर्‍याची बायको मधून शांनायच्या रूपात सगळ्यांच्या घरात पोचलेली रसिका सुनील ही या यादीत सहाव्या नंबरवर आहे. नवीन हिरोईन सायली मुंडले ही या यादीत सातव्या नंबर वर आहे. स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा, साजणा या मालिकेत काम करणारी पुजा बिरारी ही आठव्या नंबरवर आहे. माझा होशील ना मधील सई म्हणजे गौतमी देशपांडे ही नवव्या नंबरवर आहे. बिग बॉस मधील रूपाली भोसले ही या यादीत दहाव्या नंबरवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button