पाथर्डीच्या, हजारो लोकांचे जीव वाचवणार्या ‘या’ मेजरवर श्रेयस तळपदे ची ‘ही’ वेब सिरिज येतेय

श्रेयस तळपदे आणि दीप्तीलेले हे लवकरच ईओआरटीव्हीच्या नवीन ‘द लास्ट फाईट’ या वेबसिरिजमध्ये दिसणार आहेत. ही सिरिज आपल्याला 9 एप्रिल पासून पाहायला मिळेले. हिन्दी आणि मराठी मध्ये बनलेली ही वेब सिरिज ही सीमारेषेवरील अनेक गोष्टींचा आढावा घेणार आहे आणि अत्यंत संघर्षपूर्ण आणि दैदीप्यमान विजयाची एक गाथा सांगणार आहे.
या वेब सिरिजमध्ये आपल्या हिरोंच्या अत्यंत भावनिक, संवेदनशील अशा बाजू देखील दाखवण्यात आल्या आहेत. या वेब सिरिजमध्ये श्रेयस तळपदे हा पाथर्डीचे सुपुत्र मेजर अतुल गर्जे यांची भूमिका सकरणार आहेत. मेजर अतुल गर्जे यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हजारो निष्पाप जीवांना वाचवले होते. ते त्यांच्या शेवटच्या फ्लाईटमध्ये को-पायलट भानू प्रताप यांच्याबरोबर होते.
श्रेयस तळपदे यावर बोलताना म्हणाला, ‘मला खूप गौरवांकीत वाटते कारण मी मेजर अतुल गर्जे यांची भूमिका द लास्ट फ्लाइट मध्ये करत आहे. ही वेब सिरिज त्यांच्या आयुष्यावर प्रेरित आहे आणि एक सत्य कथा आहे. हा एक रिमाइंडर आहे, की अनेक जणांनी त्यांचं प्रेम, आयुष्य सगळे काही त्यागले एका दैदीप्यमान संघर्षासाठी’. वेब सिरिजच्या सगळ्या टिम सोबत काम करताना खूप चांगले वाटले असेही श्रेयस पुढे सांगतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पांडे यांनी संगितले की, या वेब सिरिज मागचा हेतु तरणांना त्यांचे खरे हीरो कळावे आणि त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी हा आहे. ही शूर आणि धैर्यवान लोक कधीही मेली नाहीत त्यांचा वारसा आजही हजारो लोकांमध्ये आहे आणि अशा कधीही न सांगितलेल्या हिरोन्न दाखवणे हा हेतु आहे. वेब सिरिजच्या निर्मात्या या फाल्गुनी शाह या आहेत.
मेजर अतुल गर्जे हे अहमदनगर मधील निंबेनांदूर या गावाचे होते आणि त्यांचे सगळे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच झाले आणि त्यांतत त्यांनी सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि मग त्यानंतर एनडीए आणि आयएमए होत त्यांना रेजिमेंट ऑफ आर्टिलेरी मध्ये पोस्टिंग मिळाली. एका छोट्या गावातला मध्यमवर्गीय कुटुंबामधला हा मुलगा सैन्यामध्ये मोठा अधिकारी बनला होता. 2011 मध्ये वायु कौशल या युद्ध सर्वाच्या वेळी त्यांच्या विमानामध्ये बिघाड झाला आणि विमान हे नाशिक मधल्या राहत्या वस्त्यांवर पडण्याची वेळ आली.
मेजर गर्जे यांच्याकडे काही क्षणाचा वेळ होता, ते सुरक्षित खाली उतरु शकत होते पण त्यांनी हेलिकॉप्टर सोबत राहायचे ठरवले आणि एका मोकळ्या जागेवर हेलिकॉप्टर क्रॅश झाले. मेजर गर्जे हे गंभीर जखमी झाले, त्या भागामध्ये अनेक दारूगोळा साठवणूक केंद्रे होती आणि जर गर्जे यांनी काही चूक केली असती तर खूप मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होता. पण हजारो लोकांचा जीव वाचवताना मेजर अतुल गर्जे यांनी स्वत:चा जीव गमावला. त्यांना मरणोपरांत ‘सेना मेडल’ ने पुरस्कृत करण्यात आले.