Uncategorized

प्रेमात पडला, पण घरच्यांनी केला विरोध; अल्लू अर्जुनच्या प्रेम विवाहाची गोष्ट

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील एक चांगले नाव म्हणजे अल्लू अर्जुन. अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी इतकाच भारतभर लोकप्रिय देखील आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाने तर त्याला संपूर्ण भारतभरामध्ये सुपरस्टार बनवले आहे. आज अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने आपण त्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टी जाणून घेऊया. पुष्पा या सिनेमाने 300 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आणि ओटीटी माध्यमांवर तर या चित्रपटाने इतिहास घडवला.

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण अल्लू अर्जुन आणि रामचरन हे भाऊ-भाऊ आहेत. चिरंजीवी हे रामचरण याचे वडील तर अल्लू अर्जुन याचे मामा आहेत. आणि अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद हे प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक होते. तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की, ‘आर्या’ मधल्या या प्रेमळ हिरोने आपल्या खर्‍या आयुष्यात देखील प्रेम विवाह केला आहे. स्नेहा रेड्डी हिच्याशी अल्लू अर्जुनचे लग्न झाले आहे. स्नेहा की एक व्यवसायिका आहे आणि तिचे वडील देखील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.

प्रेमाची सुरवात कशी झाली ? त्यावेळी अल्लू अमेरिकेमध्ये आपल्या एका मित्राच्या लग्नाला गेला होता. स्नेहा देखील तिथे हजर होती. ‘पाहताच ती सुंदरा, पोरगी काळजात घुसली असे काहीतरी झाले आणि तो तिच्या प्रेमात पडला. स्नेहाला माहिती होते की अल्लू एक अभिनेता आहे. हळूहळू एकमेकांनी दोघांना डेट करायला सुरवात केली आणि मग चांगले तावून पारखून घेतल्यावर दोघांनी लग्न करायचं निर्णय घेतला.

प्रेमात संघर्ष नसला तर मग काय अर्थ आहे ? अल्लू आणि स्नेहा यांच्या लग्नाला अल्लूच्या घरच्यांचा विरोध होता पण अल्लू आपल्या निर्णयावर ठाम होता आणि मग शेवटी त्याच्या निर्णयाचा सन्मान त्याच्या घरच्यांना करावा लागला आणि दोघांचे शुभमंगल चांगले थाटामाटामध्ये पार पडले. आज अल्लूचे सगळे व्यवहार आणि व्यावसायिक जबाबदार्‍या ही स्नेहाच सांभाळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button