सोन्याचा जर आणि हीरे असलेली ‘ही’ पैठणी असणार तरी कशी, आदेश बांदेकरांनी संगितले अजून ‘एक’ वैशिष्ट्य

महाराष्ट्रामधल्या महिलांमध्ये ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने आदेश बांदेकर यांना घराघरात नेले आणि गेली 17 वर्षे हा कार्यक्रम आपली लोकप्रियता टिकवूनच नव्हे तर लोकप्रियता वाढवत आहे. आजपर्यंत या कार्यक्रमाने हजारो कुटुंबे लोकांसमोर आणली आणि हजारो सुनांचा सन्मान देखील केला. आता होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नवीन पर्व लवकरच येत आहे. ‘महामिनिस्टर’ नावाने येणारा हा कार्यक्रम खर्च भव्य असाच असणार आहे.
महामिनिस्टर या कार्यक्रमामध्ये विजेत्या वहिनींना तब्बल 11 लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. महाराष्ट्रातील हजारो महिलांना ही पैठणी नेमकी काशी असणार आणि यावरचे नक्षीकाम आणि अनेक गोष्टींच्या विषयी प्रश्न पडलेले आहेत. विशेष म्हणजे स्वत: आदेश बांदेकर देखील ही पैठणी बघणूयासाठी खूप उत्सुक आहेत.
या कार्यक्रमाची सुरवात नाशिक पासून होणार आहे आणि 11 एप्रिलपासून हा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाशिक मध्ये या कार्यक्रमाला तूफान प्रतिसाद मिळाला आणि नाशिकमधल्या 11 वहिन्यांची महमिनिस्टरसाठी निवड देखील करण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी अनेक वहिनींनी महमिनिस्टर आणि 11 लाखांच्या पैठणीवर आगळे वेगळे उखाणे देखील घेतले.
यावेळी बोलताना आदेश बांदेकर हे म्हणाले की, ’11 लाखांची पैठणी नेमकी असेल काशी याची सगळ्याप्रमाणे मला देखील उत्सुकता आहे.’ ही पैठणी नाशिक जिल्यामधल्या येवला येथून खरेदी करण्यात येणार आहे आणि या निमित्ताने येवला येथील पैठणी उद्योगाची मार्केटिंग होऊन त्याला देखील बळ मिळणार आहे. या ११ लाखांच्या पैठणीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही पैठणी चक्क अपंग कारगिरांनी बनवली आहे. महाराष्ट्र महावस्त्र असलेल्या या पैठणीवर सोन्याची जर आणि हिरे असणार आहे. मात्र तरीही यावर नक्षीकाम करणारे कारागीर हे खास आणि प्रतिभावान आहेत, असेही आदेश बांदेकरांनी म्हटले.