Uncategorized

लाखोंची मदत; मध्यरात्री रस्त्यावर धावणार्‍या प्रदीपला आईच्या उपचारासाठी मिळाला ‘इतक्या’ लाखांचा चेक

दिवसभर नोकरी, संध्याकाळी घरी जाऊन स्वयंपाक बनवणे आणि नोकरी सुटल्यानंतर आपले आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या घरापर्यन्त तब्बल 10 किलोमीटर धावत जाणे असा दिनक्रम प्रदीप मेहराचा होता. मध्यरात्री असाच आपले काम संपवून घरी पळत जात असतानाचा त्याचा विडिओ व्हारायल झाला आणि त्याचे खूप कौतुक झाले आणि अनेकांनी त्याच्यापुढे मदतीचा हात पुढे केला.

प्रदीप मेहरा ज्या प्रकारे आपल्या स्वप्नासाठी झपाटलेला होता हे पाहून अनेकांनी त्याला आर्थिक मदत देखील देऊ केली होती. ‘मिडनाइट रनर’ या नावाने तो जगभरामध्ये प्रसिद्ध झाला. आता त्याला नुकतीच ‘शोपर्स स्टॉप’ ने मदत देऊ केली आहे. शोपर्स स्टॉपने प्रदीप ला तब्बल अडीच लाख रुपयांची मदत केली आहे. प्रदीपने या पैशामधून त्याच्या आईचे उपचार आणि स्वत:चे स्वप्न पूर्ण करावे यासाठी ही मदत देण्यात आली आहे.

प्रदीपची आई बिना देवी, या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे. त्यांना टीबी आणि आताड्याचा विकार आहे आणि याच साठी त्यांच्यावर उपचार चालू आहेत. प्रदीप हा त्याच्या मोठ्या भावासोबत नोयडा येथे राहतो आणि दिवसभर तो मॅकडॉनल्डमध्ये काम करतो आणि मध्यरात्री नोकरी संपल्यावर 10 किलोमीटर दूरवरच्या आपल्या घरी तो धावत पोचतो.

प्रदीपचे भारतीय सैन्यामध्ये दाखल होण्याचे स्वप्न आहे, त्याने आपली बारावी पूर्ण केली आहे आणि तो या स्वप्नामागे धावत आएह. आनंद महिंद्रा, हरभजन सिंह, केविन पिटरसन आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यासह लाखो लोकांनी त्याचे कौतुक केले होते.

प्रदीपचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास एल. यथिराजन यांनी प्रदीपची भेट घेतली. त्यांनी प्रदीपला पुढील अभ्यास आणि करिअर समुपदेशनाबद्दल सांगितले. यासोबतच त्याच्या आईच्या उपचाराचा रिपोर्टही मागवला होता. याशिवाय पुरोगामी समाजवादी पक्षाचे युवाजन सभेचे नेते अमित जानी यांनी प्रदीपच्या आईच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी प्रदीपला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर चाचणी उत्तीर्ण करण्यात मदत करण्यासाठी कुमाऊँ रेजिमेंटचे कर्नल, पूर्व आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल राणा कलिता यांच्याशी संवाद साधला. तसेच, पंजाबमधील मिनर्व्हा येथील फुटबॉल क्लबचे संचालक रणजीत बजाज यांनी मेहराला मोहाली अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button