गोवा विमानतळावर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगाला हात लावत गैरवर्तन; नवरा मध्ये पडला तर त्याला शिवीगाळ

अभिनेत्री आयेशा टाकीया आठवते का ? आयेशा टाकीया आता पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आहे कारण आयेशा आणि तिचा नवरा जेव्हा गोव्याला गेले तेव्हा गोवा विमानतळावर त्यांच्यासोबत गैरवर्तन झाले. जेव्हा आयेशा आणि तिचा नवरा त्यांच्या मुळसोबत गोव्यावरुण परतत होते तेव्हा त्यांच्यासोबत हा लज्जास्पद प्रकार घडला. फरहान आजमी या तिच्या नवर्याने या विषयी एक पोस्ट करत त्यांच्यासोबत नक्की काय घडले हे संगितले आहे.
गोवा विमानतळावरच्या दोन वरिष्ठ अधिकारण्यांनी फरहान सोबत बोलताना अत्यंत खालच्या पातळीवरील अश्लील भाषेचा उपयोग केला आणि पत्नी आयेशा हिच्या अंगाला देखील हात लावला. फरहाण याने ट्विट करत या विषयी माहिती दिली आहे. त्याचे पासपोर्टवरील नाव वाचल्यावर त्याला त्याच्या कुटुंबापासून वेगळे करून त्याची चौकशी करण्यात आली आणि बायकोला आणि मुलाला दुसरीकडे नेऊन चौकशी करण्यात आली/
फरहाण याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या अधिकार्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. आयेशा आपल्या मुला आणि पतीसोबत गोव्यामध्ये सुट्ट्या घालवायला गेली होती आणि त्यावेळी त्यांच्यासोबत हा सगळा प्रकार झाला. फरहाण याने या प्रकारात गुंतलेले अधिकारी यांची नावे आणि फोटो देखील शेअर केले आहेत आणि अधिकारी खूप चुकीचे वागले असे म्हटले आहे.
‘एका पुरुष अधिकार्याने माझ्या बायकोच्या म्हणजे आयेशाच्या अंगाला हात लावला आणि तिला माझ्यापासून दूर नेले. मी जेव्हा त्यांना तिच्यापासून लांब राहण्याचा इशारा केला… ती एक स्त्री आहे, अंतर ठेऊन बोला असे त्यांना मी संगितले तेव्हा त्यांनी माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. इतक करूनच हे अधिकारी थांबले नाहीत तर अत्यंत खालच्या थराला जाऊन ते बोलत होते’
फरहाणच्या या ट्विटनंतर गोवा विमानतळाकडून त्यांची माफी मागण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी करून संबंधित लोकांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील दिले आहे. आयेशा टाकीया ही प्रसिद्ध अभिनेत्री लग्न झाल्यानंतर संसारामध्ये व्यस्त आहे आणि सध्या कोणत्याही चित्रपटामध्ये ती काम करत नाहीये.