Uncategorized

दारूच्या नशेत चक्क दोन पुरुषांनी केले लग्न ! भानावर आल्यावर …

पिले पिले ओ मेरे राजा ! दारू तुमच्याकडून काय नाही करवून घेऊ शकत ? आता एक बातमी अशीच आहे जी ऐकून तुम्हाला नक्की धक्का बेसल. दारूच्या नशेत म्हने दोन तरुणांनी एकमेकांशी लग्न केले आहे. हा विचित्र प्रकार घडला आहे तो तेलंगणा मध्ये. तेलंगणामध्ये संगारेड्डी नावाचा जिल्हा आहे, या संगारेड्डीमधील जोगीपेट गावातल्या एका 21 वर्षीय तरुणाने मेडक जिल्ह्यातल्या चंदूर गावाच्या 22 वर्षीय तरूणाशी लग्न केले आहे. हे लग्न दारूच्या नशेमध्ये केले आहे.

डुमापलापेट गावाच्या एका ताडीच्या दुकानात दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती आणि मग त्यांची चांगली दोस्ती झाली. दोघे अनेकदा पिण्यासाठी भेटत. असेच एकदा ते पिले आणि मग गेल्या महिन्यात त्यांनी लग्न देखील उरकून घेतले. गेल्या महिन्यामध्ये जोगिनाथ गुत्ता इथल्या एका मंदीरामध्ये त्यांनी लग्न उरकून घेतले त्यावेळी दोघे अत्यंत पिलेल्या अवस्थेमध्ये होते.

चंदूर येथल्या रिक्शा चालवनार्‍या मुलाने जोपिपेटच्या तरुणाच्या गळ्यामध्ये चक्क थाळी बांधत लग्न केले. लग्न करताना दोघे अत्यंत पिलेल्या अवस्थेमध्ये होते. बरे लग्न करून देखील हे प्रकरण मिटले नाही. गेल्या आठवड्यामध्ये जोगीपेटच्या तरुणाने दुसर्‍याचे घर गाठले. हा मुलगा बेरोजगार आहे आणि मग त्याने झालेल्या लग्नाची माहिती रिक्शा चालवणार्‍या मुलाच्या आई वडिलांना दिली. आपले लग्न झाले आहे आणि आपल्याला घरामध्ये घ्या, अशी त्याची विनंती होती.

रिक्षाचालक मुलगा अनई त्याचे आई वडील मात्र त्याला घरात घ्यायला तयार नवते. रिक्शावाल्याने लग्नाला नकार दिला नाही पण संगितले की आम्ही दारू प्यायला भेटत होतो. त्या मुलाने त्याला घरात घेत नाहीत हे पाहून चक्क पोलिस स्थानक गाठले आणि रीतसर तक्रार देखील दीली पण काही वेळानंतर ही तक्रार त्याने मागे देखील घेतली. पोलिसांनी संगितले की, दोन्ही मुलांच्या आई वडिलांना या गोष्टीबद्दल भीती वाटत होती आणि दोन्ही कुटुंबांनी एकमेकांशी चर्चा केली आणि प्रकरण मिटवून घेतले.

TOI च्या बातमीनुसार जोगीपेठच्या मुलाने जर आपल्याला 1 लाख रुपये दिले तरच तो रिक्शा चालक मुलासोबत राहण्याची मागणी करणार नाही असे संगितले होते पण त्याला 10 हजार रुपये देऊन हे सगळे प्रकरण मिटवून घेण्यात आले असल्याचे देखील बातमीमध्ये संगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button