देवेंद्र फडणविसांचा फोटो पाहत एकनाथ खडसेंनी म्हटलेल्या गाण्याची चांगलीच चर्चा होतेय

सध्या झी मराठीवर एक कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. अगदी सुरवाती पासूनच ‘किचन कल्लाकर’ या कार्यक्रमाला लोकांनी डोक्यावर घेतले. अनेक कलाकारांची किचन मध्ये तारांबळ उडते आणि सोबत प्रशांत दामले आणि संकर्षण कर्हाडेसारखे कलाकार म्हटल्यावर कार्यक्रमाची गोष्टच वेगळी. सुरवातीला फक्त कलाकार येत असलेल्या या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहत अनेक राजकीय मंडळींनी देखील आता हजेरी लावायला सुरवात केली आहे.
किचन कलाकारमध्ये आतापर्यंत भाजपा नेत्या पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजपा नेत्या चित्रा वाघ, रूपाली ठोंबरे अशा अनेक राजकीय लोकांनी हजेरी लावलेली आहे. पण आता या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या राजकरणामधले दोन दिग्गज चेहरे दिसणार आहेत. एक चेहरा असा आहे जो सत्तेतल्या लोकांना झोप लागू देत नाही तर दूसरा विरोधी पक्षाला चैन लागू देत नाही.
राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच ‘किचन कल्लाकार’ मध्ये हजेरी लावली. हा कार्यक्रम तूफान असा झाला आहे हे त्याच्या ट्रेलरवरूनच लक्षात येत आहे. विडियोच्या सुरवातीलाच खडसे आणि सोमय्या यांनी ‘ये दोस्ती हम नही तोडेगे’ हे गाणे म्हटले. कार्यक्रमा मध्ये मग त्या दोघांना विविध फोटो दाखवले गेले आणि त्यावर जे गाणे सुचेल ते गाणे म्हणायला संगितले.
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधून विस्तव देखील जायला घाबरतो. एकमेकांना कोपरखळ्यामारण्यात तर दोघेही मागे पुढे पाहत नाहीत. देवेंद्र फडणविसांमुळे एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद गेले आणि त्यांच्या भाजपमधल्या राजकरणाला पूर्णविराम लागला त्यामुळे खडसे हे त्यांच्यावर नाराज हे असतात. तर कार्यक्रमामध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला गेला तेव्हा ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ हे गाणं नाथाभाऊंनी म्हटले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले किरीट सोमय्या सहित सगळे प्रेक्षक हसू लागतात.