Uncategorized

बॉलीवूड घाबरले ! ‘बीस्ट’ आणि ‘KGF’ मुळे शहीद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ पुढे ढकलला

दक्षिण भारतीय चित्रपटांचे वादळ संपूर्ण भारतभर सिनेमागृहांमध्ये घुसले आहे आणि त्याच्यापुढे बॉलीवूडच्या चित्रपटांची अक्षरश: वाताहत होत आहे. आरआरआरच्या आणि त्या आधी काश्मिरी फाइल्सच्या वादळामध्ये अक्षय कुमारचा बच्चन पांडे कुठे उडाला कळले देखील नाही, आता आपल्या चित्रपटाची वाताहत तशी होऊ नये म्हणून शहीद कपूर काळजी घेत आहे.

शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ लवकरच रिलीज होणार होता पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलन्यात आली आहे. चित्रपट अजून एका आठवड्याने पुढे गेला आहे. एका रिपोर्टनुसार यशचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ आणि विजयचा ‘बीस्ट’ हे दोन मोठे दाक्षिणात्य चित्रपट येत आहेत आणि म्हणुयांच जर्सीचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येते. जर्सी मध्ये शाही कपूरसोबत मृणाल ठाकूर या मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘जर्सी’ ची प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्याची माहिती दिली. प्रदर्शन आता एक आठवड्याने पुढे गेली आहे आणि आता 22 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे द्केहिल त्यांनी संगितले आहे. हा चित्रपट सर्वात आधी 28 ऑगस्ट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोंनामुळे सगळेच बिघडले. 5 नोवेंबर 2021 ही दुसरी तारीख देखील कोरोंनाच्या दुसर्‍या लाटेमुळे पुढे ढकलले गेले.

निरमात अमान गिल यांनी सांगितली आणि ते म्हणाले, एक संघ म्हणून आम्ही जर्सी मध्ये आमचे रक्त आटवले आहे आणि आमचा चित्रपट तुम्हा सर्वांपर्यंत यावा ही आमची इच्छा आहे आणि आता जर्सी 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. जर्सी हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. चित्रपटाला गौतम तिन्ननुरी यांनी लिहले आणि दिग्दर्शित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button