Uncategorized

Beast Box Office : थलापती विजयच्या Beast ने यशच्या ‘KGF 2’ पुढे…

नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित बिस्ट या चित्रपटातील हबीबी नावाचं गाणं गेल्या काही दिवसांपासून चांगलेच ट्रेडिंग आहे. या गाण्यावरुण आजकाल सर्वाधिक रिल्स देखील तयार होत आहेत. लॉक डाऊनच्या काळात सर्वाधिक हिट झालेला थलापती विजयचा या दाक्षिणात्य सुपरस्टारचा ‘मास्टर’ हा चित्रपट होता. ‘मास्टर’ चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

सध्या मात्र बॉक्स ऑफिसवर यशचा चित्रपट ‘केजीएफ 2’ आणि थलापती विजयचा ‘बिस्ट’ हे दोन चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहेत. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे आणि बिस्ट आणि केजीएफ2 मध्ये चांगलीच कात्याची टक्कर दिसून येत आहे. पण केजीएफचा मोठा झटका बिस्टला बसणार असल्याचे यापूर्वी अनेकांनी विजयच्या बिस्टला केजीएफ मात देणार असे म्हटले होते. आता आकडेवारीतून केजीएफ उजवा ठरताना दिसत आहे.

केजीएफचे वादळ हे आता बॉक्स ऑफिसवर गोंधळ घालताना दिसत आहे त्या तुलनेत बिस्ट हा वावटळ ठरला आहे हे मात्र नक्की. चार दिवसांपूर्वी दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आणि पहिल्या दिवसापासूनच केजीएफ च आघाडीवर आहे. टॉलीवूडमध्ये विजय आणि यश यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र यशचा 2018 मध्ये प्रदर्शित झालेला केजीएफ 1 नंतर चॅप्टर 2 हा चित्रपट चार वर्षानंतर चाहत्यांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता अधिक होती. बिस्टच्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

थिएटरमध्ये केजीएफ पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. त्या तुलनेत बिस्टला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी आहे. आकडेवारी सांगायची झाल्यास, शनिवारी बिस्टनं दहा ते बारा कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे केजीएफनं 18 ते 20 कोटींची कमाई करत वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विजयच्या बिस्टनं गेल्या तीन दिवसांमध्ये 70 कोटींची कमाई केली आहे. त्यात आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकात देखील बिस्टला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे. तर याच तीन दिवसांत KGF 2 ने तब्बल 143 कोटींचा व्यवसाय केल्याचे दिसून आले आहे. सन पिक्चर्सच्या वतीनं बिस्टची निर्मिती करण्यात आली असून त्याचे दिग्दर्शनं नेल्सन यांनी केले आहे. हा चित्रपट एका रॉ एजंटवर आधारित आहे. त्यात प्रमुख भूमिका थलापती विजयनं साकारली असून प्रमुख अभिनेत्री म्हणून पुजा हेगडेनं दमदार अभिनय केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button