‘सुख म्हणजे…’ मधली शालिनी वाहिनी साकारणार ‘शेर शिवराज’ मध्ये ‘ही’ महत्वाची भूमिका

‘सुख म्हणजे नक्की काय असते’ ही स्टार प्रवाह वरील मालिका ही चांगलीच लोकप्रिय अशी मालिका आहे आणि या मालिकेमधील प्रत्येक कलाकार हा घराघरामध्ये पोचला आहे. ही मालिका चांगलीच लोकप्रिय अशी मालिका आहे आणि त्यामुळे पहिल्या काही लोकप्रिय मालिकांमध्ये असते. या मालिकेमध्ये एक लोकप्रिय पात्र आहे, ‘शालिनी वहिनी’ नावाचे. शलिनी वहिनी हे एक खलनायिकी पात्र आहे आणि अत्यंत नावडत्या पात्रांपैकी आहे. शलिनी ही भूमिका माधवी नेमकर या प्रसिद्ध अभिनेत्रीने साकारली आहे.
माधवी नेमकर हिचे सुख म्हणजे नक्की काय असते मधल्या भूमिकेसाठी चांगलेच कौतुक झाले आणि आता तुमची नावडती माधवी ही एका नव्या आणि वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. माधवी आता ‘शेर शिवराज’ या चित्रपटामध्ये एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. या आधी ‘पावनखिंड’ चित्रपटामध्ये तिने भूमिका साकारली होती.
माधवी नीमकर ‘शेर शिवराज’ या चित्रपटामधली अत्यंत महत्वाची अशी ‘मातोश्री सोयराबाई राणीसरकार’ ही भूमिका साकारणार आहे. ‘शेर शिवराज’च्या टीमने आणि माधवी नीमकरने आपला फर्स्ट लुक शेअर केला आहे. नाकामद्धे नथ, कापली चंद्रकोर, मराठमोळा साज अशा मराठी राजेशाही वेशामध्ये माधवी निमकर ही अत्यंत सुंदर अशी दिसत आहे. फोटो सोबत ‘सांभाळू आम्ही आऊसाहेबांना, थोरल्या राणीसाहेबांना, बाळराजेंना आणि सगळ्यांनाच….. शब्द आहे आमचा!‘ या अगदी मोजक्याच शब्दात कणखर अशा सोयराबाई राणीसरकारांचे व्यक्तीमत्त्व मांडण्यात आले आहे.
माधवी निमकर यांच्या फोटोवर कमेंटचा चांगलाच पाऊस पडत आहे आणि तिच्या वेशभूशेचे चांगले कौतुक देखील होत आहे. सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमधेच काम करणार्या अश्विनी कासर हिने देखील फोटोवर कमेंट केली आहे. लोकांनी तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माधवी नीमकर हिने आधी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ सिनेमात मातोश्री गौतमाई देशपांडे यांची भूमिका साकारली होती. यामध्ये छोटसं पण लक्ष वेधून घेणारं काम अभिनेत्रीने केलं होतं. आता तिची नवी भूमिका कशी असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.