‘या’ अभिनेत्रीसाठी वेडा होऊन प्रभूदेवाने आपल्या 16 वर्षाच्या सुखी संसारावर सोडले पाणी; तिनेच दिला धोका

सिनेसृष्टी म्हटली की झगमगाट, सगळे काही भव्य दिव्य आणि आभासी आणि मग अशा जगामध्ये पायाजवळच्या गोष्टी दिसायच्या बंद होतात आणि मग अनेक सेलिब्रिटीची आयुष्य अगदी चव्हाट्यावर येतात. बॉलीवूड तर या बाबतीत सगळ्यात पुढे, म्हणजे 2-3 लग्ने होणार्या लोकांचे प्रमाण बॉलीवूडमध्ये सर्वाधिक असायला पहिले. घरामध्ये बायको असताना बाहेर देखील तोंड मारणारे सिनेसृष्टीमध्ये फार जास्त आहेत.
आदित्य पांचोली घ्या, अथवा हृतिक रोशन नाहीतर मलायका अरोरा, सेफ अली खान घ्या जितक्या गोष्टी चघळाल तितक्या कमी पडतील इतके किस्से या ठिकाणी सापडतील. आजचा किस्सा देखील असाच पण मुळचा दक्षिणेचा असणारा पण बोलीवूडमध्ये देखील तितकाच यशस्वी झालेला नृत्यदिग्दर्शक म्हणजे प्रभूदेवा. प्रभूदेवाने बसवलेले नाच म्हणजे एक प्रकारची पर्वणीच. ‘मौन अरगाम’ या चित्रपटामधून त्याने पदार्पण केले होते. फक्त नशीब म्हणून प्रभूदेवाला हा चित्रपट मिळाला होता.
चित्रपटामध्ये त्याला अभिनेता म्हणून एक छोटी भूमिका मिळाली होती, प्रभूदेवाचे वडील चित्रपट व्यवसायाशी संबंधित होते आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलेले होते पण प्रभूदेवा यांची रुची ही डान्स मध्ये होती आणि त्याला त्या संबंधित काम मिळाले ते कमल हसणं यांच्या ‘वेगी विजा’ या चित्रपटामुळे. प्रभू देवाने पहिल्यांदा या चित्रपटच्या निमित्ताने नृत्यदिग्दर्शकाचे काम केले आणि मग त्याने पुन्हा कधी मागे वळून पहिलेच नाही. एका पाठीमागे एक असे सुपरहिट गाणे त्याने दिग्दर्शित केले. हिन्दी सिनेसृष्टीमध्ये केलेला ‘हमसे हे मुकाबला’ या चित्रपटामधली त्याने दिग्दर्शित केलेली गाणी खूप जास्त गाजली.
प्रभूदेवा याचे लता यांच्याशी लग्न झाले होते आणि त्यांना 3 मुळे देखील आहेत पण दुर्दैवाने त्यांच्या मोठ्या मुलाचे 2018 साली निधन झाले. पण संसार चालू असतानाच त्याने आणि अभिनेत्री नयनतारा यांचे सूत जुळले. पत्नी लता यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी प्रभूदेवाला चांगलेच धारेवर धरले, काही काळ गोष्टी थांबल्या देखील पण मात्र गोष्टी पुन्हा सुरू झाल्या आणि 2011 साली त्याने आपल्या सोन्याच्या संसारावर पानी सोडण्याचा निर्णय घेतला.
पोटगी म्हणून प्रभूदेवाने आपल्या पहिल्या बायकोला दहा लाख रुपये दिले आणि 25 कोटी रुपयांची संपत्ति देखील तिच्या नावावर केली आणि शेवटी 2012 मध्ये त्याने तिच्यासोबतच्या आपल्या नात्याला पूर्णविराम लावला. सुरवातीला प्रभूदेवा आणि नयनतारा हे लीव्ह इन मध्ये राहत होते पण नंतर मात्र दोघांनी लग्न केले. नयनतारा ही क्रिश्चन होती पण लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला पण शेवटी दोघांचे काही वर्षामधेच बिनसले आणि मग एकमेकांशी त्यांनी लग्न केले नाही आणि आता त्यांच्यात काहीही संबंध डेकखील नाहीये.