सुयश टिळकच्या बायकोने भर-रस्त्यात केले असे काही ! अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

मराठी सिनेसृष्टीमधले एक प्रसिद्ध नाव आणि अनेक तरुणींच्या गळ्यामधला ताईत म्हणजे सुयश टिळक ! सुयशला एक गुणी अभिनेता म्हणून मराठी चित्रसृष्टी ओळखते. काही महिन्यापूर्वीच सुयश टिळक यांचे काही दिवसापूर्वी आयूषी भावे हिच्यासोबत लग्न झाले होते. आयूषी देखील एक खूप चांगली अभिनेत्री आणि नर्तिका आहे. सोशल मीडियावर आयूषी चांगलीच सक्रिय असते.
नुकताच आयूषीने एक विडिओ शेअर केला आहे यामध्ये ती चक्क रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. आयूषी भावे ही इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते तिने सध्या केलेला विडिओ हा चांगलाच व्हायरल देखील झालेला आहे. ‘चल छय्या छय्या’ या गाण्यावर आयूषी थीरकताना दिसत आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधला अभिनेता सिधार्थ खिरीड हा देखील दिसत आहे.
डोंबिवली मधल्या एका रस्त्यावर हे दोघे नाचताना पाहायला मिळत आहे. दोघांचा हा नाच चांगलाच चर्चेमध्ये आहे. सिधार्थ आणि आयूषी लवकरच एका वेब सिरीज मध्ये झळकनार आहेत आणि त्याच वेबसिरिजच्या शूटिंग साथी दोघे एकत्र आले होते आणि या प्रसंगी दोघांनी हा रील विडिओ बनवला आणि इंस्टाग्रामवर शेअर केला.
या विडिओवर सुयशने देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे, सुयशने कमेंट करताना एमोजीचा वापर केला आणि आग आणि हृदय अशा इमोजी वापरत प्रतिक्रिया दिली आहे. आयूषीचा हा विडिओ इनस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि सुयश सोबत अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.