आणि अक्षया बसली हार्दिकच्या मांडीवर; साखरपुड्याचा आगळा वेगळा सोहळा

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे अंजली मॅडम आणि राणादा यांची जोडी अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी आज मंगळवारी (ता. ३) साखरपुडा उरकून घेतला आहे. मालिकेने निरोप घेतल्यानंतरही दोघे नेहमीच लोकांच्या आठवणी मध्ये होते आणि नेहमीच चर्चेत होते. काही वेळापूर्वीच त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अक्षया आणि हार्दिक महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचले होते. त्यांची जोडी प्रत्येकाला पसंत होती. ते लोकांच्या हृदयावर राज्य करीत होते. त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. मालिका संपल्यानंतर देखील ते नेहमी चर्चेत होते. इंस्टाग्रामवर अक्षया आपल्या वेगवेगळ्या फोटोंची नेहमीच सरबरत करत असयची आणि आता तिने शेअर केलेल्या फोटोमुळे अनेक चर्चांना उधाण आलेले आहे कारण दोघेंचा साखरपुडा पार पडल्याचे हे फोटो आहेत.
अक्षया आणि हार्दिक यांनी नुकतेच काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळाला होता. फोटोंमधील दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांना आवडली होती. आता त्यांनी साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. हार्दिक जोशीने साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केला आहे. त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये अक्षया (Akshaya Deodhar) ही हार्दिकच्या मांडीवर बसताना आणि रिंग घालताना पाहायला मिळत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरील हास्य बरेचकाही सांगून जाते. मालिकेत साकारलेली जोडी आज प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्री अक्षया देवधरने फोटो शेअर करताना अहाSS फायनली Engaged असे शब्द टाकलेत. कदाचित रिल लाईफमध्ये जे काही घडले ते रिअल लाईफमध्येही घडेल यावर तिचा विश्वास नसावा. अक्षया देवधर व हार्दिक जोशी यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते. मालिकेतील त्यांची नावही तितकीच गाजली होती. ‘पाठक बाई आणि राणा दा’ अशी नाव त्यांची होती.