… जेव्हा मोलकरणीच्या घरी ‘मध्यरात्री’ राजेश खन्ना पोचतात; काय आहे नक्की प्रकरण ?

राजेश खन्ना यांना हिन्दी चित्रपटसृष्टीमधले पहिले सुपरस्टार म्हटले जाते. राजेश खन्ना यांनी अनेक भूमिका केल्या आणि त्यामागच्या अनेक चेहर्यामध्ये ते जगले. लोकांनीही त्यांच्या या चेहर्यांना खूप प्रेम दिले. राजेश खन्ना यांना प्रेमाने काका असे म्हटले जायचे. राजेश खन्ना या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे देखील आहेत आणि ते महिलांमध्ये खूप जास्त लोकप्रिय होते. राजेश खन्ना हे एक उदार माणूस देखील होते आणि गरजू लोकांना मदत करायला ते नेहमी तयार असायचे.
एके दिवशी असेच राजेश खन्ना आपल्या मोलकरणीच्या घरी पोचले होते आणि तेही चक्क मध्यरात्री. चुकीचा समज करू नका, राजेश खन्ना त्या मोलकरणीला मदत करण्यासाठी तिच्या घरी पोचले होते.
राजेश खन्ना यांनी अभिनयामध्ये खूप छान करियर केले आणि मग त्यानंतर त्यांनी राजकरणामध्ये देखील प्रयत्न केला होता आणि त्यासाठी ते मुंबई सोडून दिल्ली मध्ये राहायला गेले होते. राजेश खन्ना तेव्हा दक्षिण दिल्ली मधल्या सर्वप्रिय विहारमध्ये राहायला होते आणि तिथे त्यांनी एका आलीशान फ्लॅट भाड्याने घेतलेला होता. दिल्लीच्या त्यांच्या या निवसामधला एक किस्सा त्यांचे जवळचे व्यक्ति भुपेश रसिन यांनी सांगितलं आहे. एका मध्यरात्री म्हणे राजेश खन्ना आपल्या मोलकरणीच्या घरी पोचले होते.
तर त्यावेळी राजेश खन्ना यांच्या घरी काम करणार्या मोलकरणीची बायपास सर्जरी झाली होती. या सर्जरी मुळे ती मोलकरणी पुढचे काही महीने तरी काम करू शकणार नवती. राजेश खन्ना यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांच्यातला चांगला माणूस जागा झाला आणि त्यांनी मध्यरात्री आपले मित्र भुपेशला फोन करून बोलवून घेतले. जिप्सी गाडीमधून मोलकरणीचे घर शोधत ते निघाले.
त्यांनी एका किराणा दुकानदाराला फोन करून सहा महिन्यांचा किराणा काढून ठेवायला सांगितला होता. एका कुर्ता पजामा घातलेले राजेश खन्ना लोधी कॉलनी जवळच्या झोपडपट्टीमध्ये त्या मोलकरणीच्या घरी पोचले आणि त्यांनी ते सगळे सामान तिच्यापर्यंत पोचवले. राजेश खन्ना यांनी आपल्या अनेक जवळच्या कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नाची जबाबदारी देखील आपल्या अंगावर घेतली होती आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीही पैशाचा विचार केला नाही.