Uncategorized

‘वीर दौडले सात’ या चित्रपटामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांची भूमिका सकरणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध नाव म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकर लवकरच एका ऐतीहासिक चित्रपटच्या माध्यमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आणि त्याच मुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत त्यांनी एका चित्रपटची घोषणा केली आणि तीही त्यांच्या आगळ्या-वेगळ्या स्टाइल ने. चित्रपटाची गोष्ट ही महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या पार्श्वभूमीवर असणार आहे.

या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे आणि कथा ही सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे. चित्रपटामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांची भूमिका नक्की कोण सकरणार याकडे सगळ्यांचे लक्षं लागलेले होते. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘मराठी बिग बॉस 2’ फेम शिव ठाकरे याने संगितले होते की, ‘वीर दौडले सात’ या चित्रपटामध्ये तो एका महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. शिव हा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या सोबतच्या सहा मावळयामध्ये असणारे हे स्पष्टच आहे.

महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. “छत्रपतींचा आदेश वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर दौडले सात”, असे म्हणत त्यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आणि त्यांनी केलेल्या २४ फेब्रुवारी १६७४ रोजीच्या पराक्रमावर आधारित आहे. या दिवशी सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देत नेसरी खिंड पावन केली. नेसरी खिंडीमधील ही सगळी लढाई या चित्रपटात दाखवली जाणार आहे.

तडफदार सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटातील मुख्य भूमिकेत स्वत: महेश मांजरेकर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र इतर कोणत्याही कलाकाराचा चेहरा अद्याप स्पष्ट झालेला नाही. तसेच यात इतर सहा शिलेदार कोण याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि बहलोल खान कोण असणार ? याबद्दल देखील उत्सुकता चांगलीच तानळी गेलेली आहे पण याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे. विशेष म्हणजे सध्या छत्रपती शिवरायांवर निर्मिती होत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये या चित्रपटाचीही भर पडणार आहे. या आधी महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button