Uncategorized
मुलगी घरी जन्माला आली; आनंदाच्या भरात वडिलांनी हेलिकॉप्टरने तिला घरी आणली

आपण अशा देशामध्ये राहतो जिथे बहुतांश लोकांना आपल्या पोटी मुलाने जन्म घ्यावा असे वाटते पण अशा सर्व लोकांना आजचा हा लेख एक चपराक लगावणार आहे कारण महाराष्ट्रामधल्या एका कुटुंबाने दाखवून दिले आहे की मुलीचा जन्म हा किती सौभाग्याचा क्षण असतो आणि या क्षणाला कशा पद्धतीने साजरे करायचे असते. या कुटुंबाने चक्क हेलीकोप्टरची व्यवस्था केली ज्या मधून ते आपल्या लेकीला घरी घेऊन येतील.
आमच्या कुटुंबामध्ये एकही मुलगी नवती आणि त्या मुळे आमच्या घरातल्या या मुलीचे आगमन आम्हाला अगदी स्पेशल असे करायचे होते. मुलीच्या आगमणासाठी आम्ही एक लाख रुपये किमतीची हेलीकोप्टर राईड अरेंज केली होती असे या मुलीचे बाबा विशाल झारेकर यांनी मिडियाला संगितले होते.
सोशल मीडियावर फिरणार्या या क्लिपमध्ये दिसत आहे की, एक माणूस बाळाला घेऊन हेलीकोप्टर कडे जात आहे आणि झरेकर यांच्या हातामध्ये देत आहे आणि त्यानंतर ते आपल्या गाडीमध्ये बसताना देखील दिसत आहेत. येणारे अनेक जन आनंदाने या मुलीकडे पाहताना दिसत आहेत. मुलीच्या स्वागतासाठी सगळे गाव जमा झाले होते.
झरेकर कुटुंबिय हे शेलगाव, पुणे येथील रहिवासी असून त्यांच्या मुलीचा जन्म हा पुण्यामधील भोसरी येथे झाला होता. आपल्या मुलीला घरी नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरने जवळपास 25 किलोमीटर इतका प्रवास केला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्येच राजस्थान मधील एका कुटुंबाने देखील आपल्या घरी जन्मलेल्या लक्ष्मीचे अशाच प्रकारे हेलिकॉप्टरमधून स्वागत केले होते. त्यावेळी संपूर्ण कुटुंबाने जवळपास 40 किलोमीटर इतका आकाशामध्ये प्रवास केला होता आणि सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.