Uncategorized
सोनू सुद ‘शिर्डी’ मध्ये बनवतोय चक्क ऊसाचा रस ! ग्राहकांना स्वत:च्या हाताचा रस पाजतोय अभिनेता

कोरोंना काळामध्ये अनेक लोकांच्या मदतीला धावून जाणारा अभिनेता म्हणजे सोनू सुद. सोनू हा नेहमीच आपल्या चांगल्या कामांमुळे चर्चेमध्ये असतो. कोरोंनामध्ये त्याने अनेक लोकांना त्यांच्या गावी आणि घरी पोचवण्यात मोलाचे काम केले होते. अनेकांना त्याने आर्थिक मदत देखील केली होती आणि या कामामुळे तो चांगलाच प्रकाशझोतामध्ये देखील आला होता.
सोनू हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो आणि नुकतीच त्याने शिर्डी येथे देखील भेट दिली आहे. शिर्डीला गेलेला असताना त्याने साईकृष्ण नावच्या एका दुकानाला भेट दिली, इथे चहा.. ऊसाच रस असे काही मिळत असते. सोनूने मग एक विडिओ बनवला आणि दुकानाची माहिती देत असताना त्याने चक्क लोकांना ऊसाचा रस स्वत: बनवून देखील दिला.
सोनूने शेअर केलेल्या या विडियो मध्ये त्याची रस देताना आणि सगळे काही करत असतानाची मजेदार कोमेण्ट्री देखील ऐकायला मिळते आहे. विडिओमध्ये अनेक लोक त्याच्या आजूबाजूला गर्दी करताना दिसत आहेत तेव्हा सोनू सर्वांना ऊसाचा रस देखील बनवायला शिकवत आहे. तो म्हणतो की, ‘हे साईकृष्ण दुकान म्हणजे एखाद्या शोरूम सारखे आहे. इथे चहा पण मिळतो’ सोणू ग्राहकांना तुम्हाला काय पाहजे विचारतो आणि जेव्हा ग्राहक ऊसचा रस मागते तेव्हा तो ऊसाचा रस बनवायला देखील सुरवात करतो.
सोणूच्या या विडिओवर लोकांच्या कौतुकाच्या थापा पडल्या नसत्या तर नवल ! त्याने हा विडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय, कोणाला उसाचा रस हवाय? एका ग्लासवर एक ग्लास रस फ्री. #supportsmallbusiness #shirdi.असं लिहित सोनूनं छोट्या व्यवसायांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. ‘फतेह’ आणि ‘पृथ्वीराज’ हे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.