Uncategorized

ए आर रहमान यांच्या मुलीने गपचून उरकून घेतले लग्न; कोण आहे रहमान यांचा जावई ?

जगप्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान हे आपल्या अत्यंत साध्या राहणीसाठी ओळखले जातात आणि आपल्याला फक्त आपल्या कामासाठी ओळखले जावे हा त्यांचा आग्रह असतो आणि म्हणूनच की काय त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना रहमान कधी दिसत नाहीत. आपल्या खाजगी आयुष्याबद्दलच्या फार कमी पोस्ट ते सोशल मीडियावर करतात. आज आता त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे ते चर्चेमध्ये आलेले आहेत.

ए आर रहमान यांच्या मुलीचे नुकरेच लग्न पार पडले आहे आणि रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या आनंद व्यक्त केला आहे. रहमान यांनी लग्नाचा एक फोटोदेखील शेअर केला आहे ज्यावर चाहत्यांनी त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. रहमान यांची मुलगी खदीजा रहमान हिने रियासद्दीन शेख मुहम्मद याच्याशी लग्न केले आहे.

खदीजा आणि रियासद्दीन यांच्या लग्नाचा फोटो साध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वडील ए आर रहमान यांनीच हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, रहमान यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘देव या जोडप्याला आशीर्वाद देईल..तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद.’ संगीतकाराने काही तासापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर जवळजवळ ३ लाखांपर्यंत लाईक्स मिळाले आहेत. या जोडप्याचे जवळचे नातेवाईक आणि चाहते कमेंट करून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत.

या फोटोमध्ये खतिजा रहमान एका सुंदर पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात दिसत आहे. रियासदीन शेख मोहम्मद यानेही खतिजासोबत आपला आऊटफिट मॅच केला आहे. पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तो हॅन्ड्सम दिसत आहे. एआर रहमानचे चाहते पोस्टवर दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

खतिजा रहमानने 29 डिसेंबरला रियासदीन शेख मोहम्मदसोबत साखरपुडा उरकला होता. 29 डिसेंबर हा तिचा वाढदिवसही होता.त्यानंतर खतिजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. खतिजाने लिहिलं होतं की, ‘सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने, रियासदीन शेख मोहम्मदसोबत माझा साखरपुडा झाला हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. तो एक उद्योजक आणि ऑडिओ इंजिनिअर आहे. माझ्या वाढदिवशी २९ डिसेंबरला जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. फारच कमी लोकांना माहिती असेल की, एआर रहमान यांची मुलगी खतिजाने तामिळ चित्रपटांसाठी काही गाणी गायली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button