साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा, ‘KGF’ मधल्या ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचे निधन..

KGF 2 हा चित्रपट संपूर्ण भारत आणि जगभरामध्ये धुमाकूळ घालत असतानाच दक्षिण चित्रपटसृष्टी आणि केजीएफ टिम कडून एक दू:खद बातमी समोर आली आहे. ‘KGF चॅप्टर 2’ मधील एक चांगल्या आणि प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांना नेमका कोणता आजार होता हे अजून तरी समोर आलेले नाही परंतु ते खूप दिवसापासून आजारी असल्याचे सांगण्यात येते.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधल्या या अभिनेत्याचे नाव आहे मोहन जुनेजा. मोहन जुनेजा हे गेली अनेक वर्षे आजारी होते आणि त्यांचावर उपचार चालू होते आणि उपचारादरम्यानच आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
मोहन जुनेजा हे मूळचे कॉमेडी कलाकार आणि त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. एक विनोदवीर म्हणून त्यांनी आपल्या करियरची सुरवात केली होती आणि आपल्या अभिनयाने आणि दर्जेदार विनोदाच्या टायमिंगने त्यांनी सर्वांना खळखळून हसवले आहे पण त्यांच्या जाण्याने मात्र अनेक कलाकार आपले अश्रु आवारू शकले नाहीत.
मिडिया रिपोर्टच्या अनुसार जुनेजा हे अनेक दिवसांपासूनच आजारी होते आणि बेंगलोर येथे उपचार घेत होते. आज सकाळी 7 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मोहन जुनेजा यांनी ‘केजीएफ चॅप्टर 2’मधून सर्वांचं मन जिंकलं आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी पत्रकार आनंद यांच्या खबरीची भूमिका साकारली होती. त्यांनी फक्त तामिळच नव्हे तर तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी तब्बल 100 हुन अधिक चित्रपटांमध्र्य काम केलं आहे. अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याला ‘चेतला’ या चित्रपटातून चांगली ओळख मिळाली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं आजही कौतुक केलं जातं.