किस्से

तुकाराम मुंढे – किस्से प्रामाणिकपणाचे.

लोककल्याणासाठी व प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा एक  माणूस ज्याला हे माहितीये आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय पण त्याला हेही माहितीये कि दिशा त्याचीच योग्य आहे.  काही प्रमानिकपानाचे किस्से आपल्या १२ वर्षांच्या सेवाकाळात तब्बल ९ वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागनारे अधिकारी तुकाराम मुंढे. आज त्यांच्या जीवनातले काही किस्से पाहुया जे खूप कमी जणांना माहित आहेत.

किस्सा  पहिला 

प्रसंग आहे ते मुंढे सोलापूरला जिल्हाधिकारी असतानाचा तारीख २५ जुलै २०११ रोजी सायंकाळी साडेचार वाजता बीड-अंबड-जालना रस्त्यावर अंबड शहराजवळ पोलिस आणि सरकारी अधिकारी यांच्या समोर जवळपास पाच साडेपाच  हजारांचा प्रक्षुब्ध जमाव होता. तिथ एका भरधाव ट्रकने ठोकल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता, तेथील स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. पण जमाव तिथून  प्रेत हलवून देत नवता. वातावरण प्रचंड तणावपूर्ण  झाले होते. जमावाच  म्हणणे होते की या अपघात आणि मृत्यूला जबाबदार चालक आहे त्याला आमच्या ताब्यात द्या. जमाव त्या चालाकासोबत काय करणार होता हे सांगायची गरज नाही …

ज्या अधिका-यांना या जमावाने गराडा घातला होता त्यात होते सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकारम मुंढे . त्यांनी जमावाला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला, पण रागावलेला जमाव ऐकण्याच्या परीस्थित नवता जववातून दगड फेकण्यास सुरूवात झाली. यावेळी स्वत जिल्हा पोलिस प्रमुख तेथे हजर होते सोबत १० जणांचे धडक कृती दल होते पण जमाव इतका मोठा होता कि इतकी लहान फोर्स स्थिती हाताळू शकणार नव्हती ते जास्त कुमक मिळावी म्हणून वात बघत होते. त्यात काही तास लागणार होते. संध्याकाळचे सहा वाजले तरी जमाव ऐकेना धडक जवांनानी लाठीचार्ज केला तरी जमावान त्याला दाद दिली  नाही. हवेत गोळीबार करावा तरी त्यात यश येत नव्हते. आता हे नक्की झाले होते की जमाव सरकारी अधिका-यांवर चाल करणार होते.  मुंढे म्हणाले की , “मला असे वाटत होत कि  हा जमाव आमची हत्या करेल”. त्यावेळी सारे अधिकारी घाबरून काय करावे या संभ्रमात होते, मुंढे त्यांच्या सहका-यांना म्हणाले, “मी जिल्हा दंडाधिकारी आहे जे होईल त्याची जबाबदारी मी घेतो तुम्ही गोळीबार करा” धडक दलाने गोळीबार सुरू केला आणि तासाभरात जमाव पळून गेला, सारे काही पूर्ववत झाले. त्यानंतर राज्याचे पोलिस प्रमुख आणि काही मंत्री यांनी घटना स्थळी भेट देवून लोकांचे सांत्वन केले, जखमींना रूग्णालयात उपचार करण्यात आले. मुंढे यांनी या घटनेचा अहवाल सरकारला पाठवला जो विधीमंडळात सादर करण्यात आला.

किस्सा दुसरा

सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या तीरी असलेल्या पंढरपूर  तीर्थक्षेत्री जून- जुलैच्या महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मोठ्या प्रमाणात भाविक वारकरी पंढरीच्या वारीला जातात. अशाच एका वारीच्या प्रसंगी २०१२ साली एका ट्रक खाली मोठ्या प्रमाणात भाविक चिरडले गेले, वारकर्यांच्या मृत्यूमुळे स्थानिक लोक हळहळले अशाच एका जमावाने त्यांच्या शवासहीत रास्ता रोको केला आणि मागणी केली की जिल्हाधिकारी यांनी त्यांना भेटावे. मुंढे तातडीने त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोवर त्यांचे धार्मिक प्रमुख सांगत नाहीत तोवर प्रेतांना तेथून दूर करण्यास गर्दीने नकार दिला. हळूहळू गर्दी वाढत जावून हजाराच्या वर माणसे तेथे जमली होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्थानिक वारकरी नेत्यांशी चर्चा झाली त्यात त्यांनी मागणी केली की प्रशासनाने ट्रक चालकाला त्यांच्या ताब्यात द्यावे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा राज्यच पावसाळी अधिवेशन नुकताच सुरु झळ होत आणि तो  दिवस राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. जिल्ह्याचे सारे प्रमुख अधिकारी मुंढे यांच्यासह तेथे हजर होते. मुंढे यांनी दोषीवर कठोर कारवाईचा इशारा दिल्यावर मात्र लोकांनी प्रेत हलविण्याची तयारी दर्शवली पण जेव्हा  ही प्रेते रुग्णालयात नेण्याचे काम सुरु झाले तेव्हा जमावाने दगडफेक सुरु केली. त्यात पाच सहा पोलिस शिपायांना इजा झाली.

स्थिती जवळपास हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसत होती, जमाव पाच हजारांच्या पुढे गेला होता. इतर अधिकारी त्यांना दूर जायला सांगत असताना मुंढे त्या जमावाच्या दिशेने गेले पण जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नवता जमावाने हल्ला केला.  कोणताही समाज फारकाळ अश्या प्रकारे दबावाखाली ते राहू शकत नाही आणि गर्दीचा जाच सहन करू शकत नाहीत.फारकाळ अशी स्थिती राहिल्यास स्थिती स्पोटक बनू शकते जशी कालपरवा हरयाणा मध्ये झाली.  थोडासा विचार करून मुंढे यांनी आदेश दिला “ गोळीबार करा” त्यामुळे सारे चक्रावले. धडक कृती दलाने जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाची वाट पाहिली. मुंढे म्हणाले की ते जिल्हाधिकारी म्हणून जे काही होईल त्याला ते स्वत जबाबदार आहेत. त्यानंतर मिनिटाभरात जमाव पांगला. या गोळीबारात तीन जण दगावले, सात वाजेपर्यंत सारे काही सुरळीत झाले. मंत्री साडे आठ वाजता घटनास्थळी आले, त्यांच्या मागोमाग औरंगाबादहून जिल्हा पोलिस महानिरिक्षक आणि उपमुख्यमंत्री देखील पोहोचले. मुंढे आणि त्यांच्या सहकारी अधिका-यांनी दुस-या दिवशी पहाटे पाचला घटनेचा अहवाल सादर केला आणि सरकारला पाठवला कारण अधिवेशन सुरू होते. मुंढे याप्रसंगी म्हणतात की, “ही दुसरी सत्वपरिक्षा घेणारी वेळ होती ज्यावेळी मला सामान्य लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश द्यावे लागले. लाखो वारकरींच्या सोईसाठी मला असे करण्याशिवाय पर्यायच नव्हता अधिकार्याला भावनांपेक्षा वस्तुस्थिती कडे जास्त लक्ष द्याव लागत. कारण प्रत्येक जमावात हिंसक प्रवृत्ती असतात सुरु झालेली छोटीशी गोष्ट मोठ्या हिंसाचारात कधी बदलेल हे सांगता येत नाही लाखो. या घटनेच्या दोन बाजू आहेत, काही लोक मला दोषी मानतही असतील पण प्रत्यक्ष घटनेवेळी मात्र अशावेळी त्यांना दोन अंगाने पाहता येत नाहीत एकतर तुम्ही हो असता किंवा नाही अधिकार्याला मधला मार्ग नसतो घटनेच्या वेळी  ट्रक चालक मुस्लिम होता, समाजिकदृष्ट्या तणाव होता, दुसरी गोष्ट अशी कि स्थानिक पोलिसांच्या बाबतीत लोकांत असंतोष होता आणि काही काळाबाजार करणारे लोक जे माझ्या विरोधात होते त्यांना स्थिती खराब करायची होती.” हे फारच सोपे होते की माघार घेवून प्रकरण मार्गी लागले असते. पण मग कायदा अन सुव्यवस्था कशासाठी आहे ? अशा वेळी धेर्य आणि संयमाची सत्वपरिक्षा असते.” ते म्हणाले.

बारा वर्षे नऊ बदल्या

त्यावेळी मुंढे यांना वाईट वाटते ज्यावेळी काही महिन्यात त्यांची बदली होते, मात्र ते यावर विश्वास ठेवतात की, ते आणखी काही काळ राहीले तर चांगला बदल घडवू शकतात. ते म्हणतात, “ वर्षभरात मी व्यवस्था बदलू शकतो मात्र तिला स्थिर करू शकत नाही. मला काही वेळा वाईट वाटते की मला इथून तिथे बदलण्यात येते. मात्र मला माहिती आहे की मी योग्य तेच करत आहे. मला विश्वास आहे की प्रत्येक जागी मला जास्त वेळ मिळाला तर मी  अधिक प्रभावीपणे काम करेन.”

ते म्हणतात की अनेक लोक त्यांच्यासोबत जात नाहीत कारण त्याचा वेग जास्त असतो. ते सारे काही प्राधान्यावर ठेवतात. पुणे परिवहनमध्ये ते आयटीएम, भांडार, शिस्त, इंधन व्यवस्थापन आणि भविष्याच्या योजना या सा-यावर एकाचवेळी काम करत आहेत. ते म्हणतात, “ हे शक्य आहे कारण माझ्या कारकिर्दीत मी चुका केल्या असतील तरी मला माहिती आहे की माझा  हेतू प्रामाणिक आणि पारदर्शी आहे. येथे काही लोकांना माझ्या कामाचा त्रास होणारच. आणि काही शक्तिवान लोकांचे नुकसान देखील होवू शकते. त्यांना माझ्या बद्दल आकस असेल, कारण माझ्या कार्यपध्दतीने त्यांना हानी होते आहे. जर त्यांना माझ्या कामात काहीच चुका काढता आल्या नाहीत तर ते म्हणतात की मी उध्दट आहे, कारण मी त्यांचे ऐकून घेत नाही. हा इतकाच आरोप माझ्या बारा वर्षाच्या सेवेदरम्यान माझ्यावर झाला आहे, आणि काहीच नाही.”

जर त्यांना पुणे परिवहन मध्ये अधिक काळ मिळाला किमान दोन वर्ष त्यांना आशा आहे ते ही सेवा सक्षम करतील आणि सुरळीत देखील. ते पुढे म्हणाले की, “ मला नाही वाटत तेवढा वेळ मला दिला जाईल. माझा प्रयत्न हाच असेल की जे काही द्यायचे ते मी आहे तोवर मला देता यावे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button