किस्से प्रामाणिक अधिकार्यांचे – विश्वास नांगरे पाटिल

लहानपणीच्या गोष्टी किती जन लक्षात ठेवतात हा चर्चेचा विषय पण एका मुलाने वर्गातल्या राववलेल्या बाईंचे शब्द “पहिलवानाचा मुलगा तू, पुढे गुंडच होणार” हे शब्द मनावर कोरून घेतले अन स्वताच अवघ आयुष्याच बदलून टाकल. त्या मुलाच नाव “विश्वास नांगरे पाटील”.
खाकी वर्दीवरील उठत चाललेला जनतेचा विश्वास परत मिळवण्याचे काम करत आहेत विश्वास नांगरे पाटील. त्यांनी कोल्हापुरातून शिवाजी विद्यापीठातून १९९७ ला बी.ए पूर्ण केल. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज मध्ये सध्याचा दक्षिणेचा सुपरस्टार आर माधवन हि शिकत होता, दोघंही हुशार तितकेच लोकप्रियहि प्रत्येक ठिकाणी हजर, कॉलेजचा कोणताही कार्यक्रम या दोघांशिवाय होतच नसे. सुरवातीला काही काळ हे दोघे एकमेकांचे रूम पार्टनर हि होते.

नंतर जेव्हा कॉलेज च्या विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक जाहीर झाली साहजिकपणे सामना आर माधवन विरुद्ध असा झाला तेव्हा मराठमोळ्या विश्वासने दक्षिणात्य माधवनला चारी मुंड्या चीत केलं अन विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडूनही आला.
विश्वास नांगरे पाटील हे नाव घेतल कि समोर उभ राहतो २६/११ चा दहशतवादी हल्ला. ताज हॉटेलात दहशतवादी घुसल्याची माहिती त्यांना मिळाली अन क्षणाचाही विलंब न करता ते ताजकडे सरसावले. दहशतवादी ज्या मार्गाने आत घुसले त्या मार्गाने आत घुसण्याची हिम्मत नांगरे पाटील व त्यांच्या सहकार्यांनी दाखवली.

ताजच्या मोनिटर विभागात घुसून तेथील सीसीटीवी दृश्यांवरून वरिष्ठांना दहशतवाद्यांची माहिती पुरवली. “२६/११ च्या लढाईत मला माझ्या कुटुंबियांपेक्षा दहशतवाद्यांचा मुकाबला करणे जास्त महत्वाचे होते, मी मनाचा निर्धार केला अन पुढे सरसावलो”, अस विश्वास नांगरे पाटील सांगतात.
सामाजिक जाणीवेतून जगणारे अन असाच पूर्ण समाजानेही जागाव याबाबत आग्रही असलेले नांगरे पाटील निसर्गावरही भरभरून प्रेम करतात. अनेक उपक्रमातून आपल निसर्गाशी असलेल नात त्यांनी दाखवून दिलेलं आहे.
अंकुश धावडे या पारध्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचार्याच्या नावाने सुरु केलेली जिम्नाशियम, पोलिसांनाही सर्वसामान्यांप्रमाणे आनंद मिळावा म्हणून पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरु केलेली सहल योजना या त्यांच्या कर्तव्यापरायानतेचीच साक्ष देतात.

आज तरुणांमध्ये नांगरे पाटील नावच एक वलय निर्माण झालय, अन हजारो लाखो मुल त्यांची प्रेरणा घेऊन प्रशासकीय सेवेचा अभ्यास करतायेत. प्रत्येक तरुणाला आज नांगरे पाटील व्हावस वाटत. नक्कीच ती वेळ फार लांब नाही कि पोलीस दलात हजारो नांगरे पाटील दहशतवाद्यांसमोर भिंत बनून उभे असतील, हजारो तुकाराम मुंढे निधड्या छातीने भ्रष्टाचार्यांना सामोरे जातील अन तितकेच श्रीकर परदेशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत असतील.