निर्मला सीतारमण – JNU विद्यार्थी नेता ते भारताच्या पहिल्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री

तमिळनाडुत एक शहर आहे तिरुचिनापल्ली, मंदिरांनी भरलेल्या या शहराला इंग्रज शोर्ट मधे “त्रिची” अस म्हणायचे, मंदिरंसोबतच त्रिची अजून एका गोष्टीसाठी देशभरात ओळखले जाते ते म्हणजे … शिक्षण …!!!. अशा या शहरात एक मुलीने १९७६ साली शितालस्वामी रामास्वामी कॉलेज मध्ये अर्थशास्र विषय घेऊन पदवीसाठी अडमिशन घेतल… १९७८ साली तीला JNU(डाव्या विचारांचं माहेरघर अन देशविरोधी घोषणांमुळे देशात बदनाम झालेलं)मध्ये प्रवेश मिळाला. अन तिथेच JNU मधे त्या मुलीला आपला जोडीदार गवसला… गोदेकाठच्या एका मुलाच्या ती प्रेमात पडली अन पुढे त्याचं लग्न झाल.
चित्रपटात शोभेल अशी हि गोष्ट आहे भारताच्या नव्या संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या निर्मला सीतारमण यांची.

गोष्ट त्याकाळची आहे जेव्हा JNU मध्ये डाव्या विचारांच्या “स्टूडेंट फेडरेशन ऑफ़ इंडियाच”(हे SFI कन्हैय्या कुमारच संघटन ASFI आहे) पूर्ण प्रभुत्व होत. प्रकाश करात अन सीताराम येचुरी JNU चे विद्यार्थी नेता म्हणून देशाच्या ओळखीचे झाले होते, सोवियत रशिया भक्कमपणे आपले पाय रोवून उभा होता अन जवळपास ५५% जगावर लाल बावटा राज्य करत होता. अन समाजवाद आजसारखा सासुरवाशी झाला नवता.
निर्मला ज्यावेळी JNU मध्ये गेली तेव्हा बनारस हिंदू विश्ववद्यालयाचा एका विद्यार्थ्यालाही JNU मध्ये अडमिशन मिळाल अन आपल्या वलयाने या “आनंद कुमार”ने आपले सोबती उभे केले… गांधीवादी, डावे, समाजवादी सगळ्या विचारांची लोक एका छत्रीखाली आली. हे संघटन डाव्यांची जितकी निंदा करायचं तितकीच निंदा rss अन भाजप ची करायचं थोडक्यात सांगायचं झालं तर कोणताही आतीवादाला यांचा विरोध होता तो डावा असो वा उजवा. तीरुचीनापल्लीवरून आलेली निर्मला या “फ्री थिंकर” संघटनेची सक्रीय सदस्य बनली.

याच वातावरणात निर्मला यांची पराकला प्रभाकर यांच्यासोबत झाली, प्रभाकर यांची आई आंध्रप्रदेशात आमदार होती तर वडील सुरवातीच्या काळात कमुनिस्ट होते जे नंतर कॉंग्रेस मध्ये गेले व १९८० उजाडेपर्यंत तब्बल ५ वेळा आंध्रप्रदेशात मंत्री बनले होते. प्रभाकर यांनी एनएसयूआई (कॉंग्रेस विद्यार्थी संघटन) जॉईन केल अन प्रकाश करात यांच्या विरोधात JNU अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली अन हरले.
संसारात एकसूर मात्र राजकारणात वेगळी वाटा
एका बाजूला प्रभाकर यांनी JNU च्या राजकारणात उडी घेतली होती तर दुसऱ्या बाजूला निर्मला “फ्री थिंकर्स” मध्ये सक्रियपणे काम तर करत होती पण निवडणुका वैगारेंपासून ती ४ हाथ लांबच होती. तेव्हापासून आजपर्यंत हि जोडी एका पक्षात कधीच नाही दिसली याला अपवाद प्रभाकर यांनी काही दिवसांसाठी का होईना भाजपा प्रवेश केला होता. JNU नंतर दोघांनी लग्न केल व प्रभाकर “लंडन स्कूल ऑफ एकॉनोमिक्स” मध्ये गेले निर्मलाही सोबत होतीच.
१९९१ ला दोघेही भारतात परतले, १९९४ मध्ये प्रभाकर यांनी त्यांच्या वडिलांच्या सीटवरून निवडणूक लढवली पण बापाची विरासत त्यांना सांभाळता आली नाही अन ते निवडणुकीत पडले. १९९५ मध्ये त्यांनी भाजपा प्रवेश केला.
आपल्या लेखाच्या नायिकेचा अजून राजकारणात डेबुट व्हायला थोडा वेळ होता, तेव्हा निर्मला सीतारामन गरीब मुलांसाठी शाळा चालवत समाजसेवेची काही कामे करत होत्या.
अटल बिहारी यांचा कार्यकाळ अन राजकारणात उडी-
१९९९ साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सत्तेत आले तेव्हा भाजपने निर्मला सीतारामन यांच्या समाजसेवेची पावती त्यांना राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्या बनवून दिली. निर्मला सीतारमण व भाजप जवळीकेची ही सुरवात होती. निर्मला सीतारमण आत संघाच्या ‘स्वदेशी जागरण मंच’ या संघटनेसोबतही जोडल्या गेल्या.

२००६ मध्ये त्यांनी आधिकारिक पणे भाजप जॉईन केल, त्यांना भाजपची आंध्र प्रदेशमध्ये प्रवक्ता बनवण्यात आल. २००८ मध्ये प्रभाकर भाजप सोडून चिरंजीवी यांच्या “प्रजा राज्यम” पक्षात गेले. २०१० पर्यंत आंध्रप्रदेशात निर्मला सीतारमण यांनी आपल कर्तृत्व पक्षाला दाखवून दिली होती म्हणून त्यांना रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वात बनलेल्या एक टीम च सदस्य बनवण्यात आल.
राष्ट्रीय राजकारणात पदार्पण
२०१० मध्ये त्या पहिल्यांदा राष्ट्रीय चेनल वर आल्या, JNU मध्ये केलेला अभ्यास त्यांच्या इथे कामी आला. टीवीवरच्या वादविवादात त्या पूर्ण तयारीनिशी उतरत अन तथ्य अन विस्ताराने आपली गोष्ट शांतपणे पटवून सांगत, त्यांना स्मृती इराणी यांच्याप्रमाणे रागावताना कधी कुणी पाहिले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींच्या वेळीही त्यांनी नरेंद्र मोदींना भक्कमपणे पाठबळ दिल.
२०१४ वर्ष निर्मला आणि त्यांचे पती प्रभाकर यांना सुदैवी ठरलं, भाजप सरकार आल अन निर्मला सीतारमन यांना वाणिज्य और उद्योग मंत्रालयातल्या राज्यमंत्री बनल्या तर आंध्र मध्ये तेलगु देसम सत्तेत आली अन प्रभाकर यांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कम्यूनिकेशन एडवाइज़र म्हणून बोलावलं, ये पदही राज्यात कॅबिनेट मंत्रिपदाच्या समतुल्य आहे.
आज निर्मला संरक्षण मंत्री आहेत, त्या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाची दुसरी महिला झाल्या आहेत. JNU मधल्या टपऱ्यावर चहाच्या फुरक्यासोबत “चाय पे चर्चा” करणारा हा जोडा आज देशातल्या काही सगळ्यात ताकदवान नवरा-बायको मधले एक आहेत.
का मिळाल प्रमोशन-
२०१८ मध्ये आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मध्ये निवडणुका आहेत, निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन वेंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती बनवून मोदी-शाह यांनी एक राजकीय परिपक्व निर्णय घेतला, पण वेंकय्या नायडूंच्या उपराष्ट्रपती पदामुळे दक्षिण भारतात भाजपला म्हणाव्या अशा उंचीचा नेता उरला नाही. निर्मला या तमिळनाडूच्या आहेत आंध्र ची त्या वैवाहिक संबंधांनी बांधल्या गेलेल्या आहेत. दक्षिणेच्या राजकारणात त्या कुणालाही नकोशा नाहीयेत अथवा त्या कोणत्याही प्रकरणात अडकलेल्या नाहीत ज्यामुळे त्यांच्यावर चिखलफेक होईल.