मालाबार विद्रोहाची पूर्ण गोष्ट – “जिहाद” म्हणून भाजपा करतय का राजकारण?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची तय्यारी भाजपने आत्ताच सुरु केलीय अन यावेळी दक्षिणेतून मुसंडी मारण्याची भाजपची योजना आहे, केरळ राज्यावर त्याचं मुख्य लक्ष आहे. भाजपा अन संघ कधी कार्यकर्त्यांच्या हत्यांचे आरोप लाऊन तर कधी वामन-बळी वाद उभा करून तर कधी महिषासुर-देवी दुर्गा वाद उभा करून पी विजयान सरकारला खिंडीत गाठायचा भाजपचा प्रयत्न आहे. केरळ राज्यात भाजपची कमान पार्टी अध्यक्ष अमित शहा यांच्या हाती आहे, अन त्यांच्याच पुढाकारातून भाजपची केरळ ते जनरक्षा यात्रा चालू आहे. ९ ऑक्टोबरला हि यात्रा मलप्पुरम मध्ये पोचली त्यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष कम्मनम राजशेखरन यांनी १९२१ साली झालेल्या मलबार विद्रोह अर्थात मोपल्यांच्या बंडाची कटू आठवण करून दिली.

मोपल्यांच्या बंडाच्या वेळी मोठ्या प्रमाणात हिंदूंचे हत्याकांड झाले होते अन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा यावर बरच लिहलेल आहे. मला काय त्याचे ? अर्थात “मोपल्यांचे बंड” या पुस्तकात त्यांनी या बंडाबरोबरच हिंदू धर्मातील जातीय व्यवस्थेवर सडकून टीका केलीय.
गोष्ट आहे १९२१ ची, देशभरात खिलाफत चळवळ जोरात चालू होती, मालाबार च्या एरनद अन वल्लुवानद तालुक्यांमध्ये खिलाफत आंदोलनाला मुळापासून उखडण्यासाठी इंग्रजांची तारेवरची कसरत होत होती अन यात भरीस भर म्हणजे मालाबार क्षेत्रामध्ये मोपल्यांनी 1920 ई. में बंड सुरु केले. मोपला केरल हे मुळचे अरबस्तानचे इस्लाम धर्म मानणारी जमात व धर्मांतरित मल्याळम मुसलमान, मुख्यतः मोपले छोटे शेतकरी, कामगार व व्यापारी होते ते समाजाच्या गरीब अशा समुदायात मोडले जात सोबतच ते काजि और मौलववी लोकांना ते सहसा आंधळेपणाने मानत. याउलट मालबारमधले हिंदू उच्चवर्नीय असे नम्बूदरी अन नायर होते.

सुरवातीला खिलाफत चळवळी प्रमाणे मोपल्यांचा संघर्ष हा ब्रिटीश सत्तेविरुद्धच होता, अन याचा नेतृत्व अली मुसालीयार करत होता. दिवस होता १५ फेबृअररी १९२१ इंग्रजांनी पूर्ण इलाक्यात जमावबंदी लागू केली अन सोबतच नेत्यांच्या धरपकडी सुरु केल्या. याकूब हसन, यू. गोपाल मेनन, पी. मोइद्दीन कोया अन के. माधवन नायर यासारखे नेते जे आंदोलनाला योग्य दिशा देत होते ते पकडले गेले. अन आंदोलनाचे नेतृत्व मूर्ख स्थानीय नेत्यांकडे गेले. अन अचानक या आंदोलनाने एक वेगळ वळण घेतल, इंग्रजविरोधीचे आंदोलन जमीनदार विरोधी म्हणजे एका अर्थाने हिंदू विरोधी बनले. एकसंघ मोपल्यांनी हिंदुंवर हल्ले करायला सुरवात केली, देशाच्या हितासाठी उभे केलेले आंदोलन सांप्रदायिक बनले अन हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी ठिणगी पडली.
20 अगस्त 1921 को पोलिसांनी अर्नाड च्या खिलाफत आंदोलनाचे सेक्रेटरी वडाकेविट्टील मुहम्मद ला पकडण्याचा प्रयत्न केला पण 2000 मोपल्यांनी त्यांना अस करू नाही दिले. इंग्रजांनी याच उत्तर खिलाफत च्या लोकांना पडून अन तिरुरंगदी च्या मम्बरम मस्जिद ला जप्त करून दिले. जमावाने तिरुरंगदी अन सोबतच स्थानीय पोलीस ठाण्याला ला गराडा घातला, नंतर झालेल्या गोळीबारात बरेचसे मोप्ले मारले गेले. मोपल्यांच्या आंदोलनाने चांगलीच आग धरली होती त्यांनी पोलीस चौक्यांना पेटवायला … , सरकारी खजाने लुटायला…. अन सरकारी कागदपत्रे जाळायला सुरवात केली.

24 अगस्त 1921 ला कुंजअहमद हाजी ने अली मुसलियार च्या वतीने आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. यानंतर इंग्रज सरकारने मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा बिमोड केला.
या आंदोलनाचा अजून एक किस्सा फेमस आहे.
19 नोवेंबर 1921 ला 100 मोपल्यांना ट्रेन ने मालाबार मधून कोयंबटूर ला पाठवले जात होते त्यांना मालगाडी च्या बोगीत बंद केल होत. पाच तासाने जेव्हा दरवाजे उघडले तेव्हा एकही मोपला जिवंत राहिला नवता.
मोपला विद्रोहाच्या वेळी हजारों हिंदूंची कत्तल झाली होती अन हजारो धर्मांतरित झाले होते. यानंतर आर्य समाजाने मोठ्या प्रमाणावर बळजबरीने धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते. या आंदोलना नंतर आर्य समाजाचे स्वामी श्रद्धानंद यांची 23 दिसंबर 1926 त्यांच्याच आश्रमात गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
या हत्येचे अन मोपला बंडाचे ओरखडे अजूनही केरळच्या सामाजिक जीवनावर आहेत अन कदाचित याच कोरड्या जखमेवरची खपली काढून तिचे राजकीय भांडवल करण्याचा भाजप अन संघाचा प्रयत्न आहे.
(भारतात आज दलित विरुद्ध सवर्ण हा वाद जाणीवपूर्वक पसरवला जातोय, नवरात्रीत हा वाद सोशल मिडीयावर विकोपाला पोचलेला पहावयास मिळाला… रावणाची पूजा श्रीलंकेत हजारो वर्षापासून होते तसेच आपण प्रभू रामांना मानतो… तसेच काही लोक सेकडो वर्षापासून महिषासुराची पूजा करतात … दोन परस्पर विरोधी सभ्यता, विचार, एका ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत का …???)
-प्रतिक्रिया जरूर कळवा