किस्से

“गरिबांना फुकट शिकविण्यासाठी IAS सोडले” गोष्ट UN-Academy ची

स्पर्धा परीक्षेचा अन मुख्यतः UPSC चा अभ्यास करणाऱ्या बहुतेक सर्वांना माहिती असेल कि Un-Academy काय आहे अन रोमन सैनी कोण आहेत. ज्यांना माहिती नसेल त्यांनी युट्युबवर फक्त Un-Academy नावाने सर्च करा.

शाळेत मित्रांसोबत मिळून बनवली नवीन संकल्पना

रोमन नावाचा मुलगा अन त्याचा मित्र गौरव गुंजाल जेव्हा ट्यूशन ला जात असत. तेव्हा वेगवेगळ्या प्रश्न त्यांच्या डोक्यात घुमत असत त्यातलाच एक प्रश्न म्हणजे की का प्रत्येक विद्यार्थ्यांला चांगले ट्युशन का नाही मिळू शकत…?? अन यासाठी आपल्याला काही करता येयील का ??? मग त्यांनी एक अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला, एक अशी अकॅडेमी जिथे सर्वांना शिक्षण फुकटात मिळेल…!!! दोघांनी अनअकॅडमी ची सुरुवात युट्युब चेनल पासून केली इथे त्यांनी आता पर्यंत 10 लाखांहून अधिक व्हिडीओ प्रसारित केले आहेत. ज्यातून 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. आता पर्यंत 25 शिक्षक त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत.

4 मित्रांनी मिळून चालू केली अन अकॅडमी

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण रोमन सैनी हे UPSC मध्ये अख्ख्या भारतात १८वे आले होते अन मध्यप्रदेशात प्रशासकीय अधिकारी म्हणून कामही करत होते. पण स्वप्नाच्या मागे धावणाऱ्या रोमनने हि अकॅडमी सुरू करण्यासाठी आयएएस ची नोकरी सोडून दिली तर गौरव एक मोठ्या कंपनीत कामाला होता त्याने आपल्या ऑनलाईन रियल इस्टेट कंपनी फ्लॅटचॅट च्या सीईओपदाचा त्याग केला. या दोघांनी त्यांचे मित्र हेमेश आणि सचिन गुप्ता यांनी मिळून अन अकॅडमी सुरू केली. अन नावाने त्यांनी वेब प्लॅटफॉर्म तयार केला आहे. लवकरच अन अकॅडमी चे स्मार्टफोन ऍप लाँच केले जाणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक जण स्वतः अभ्यासाचे व्हिडीओ बनवण्यास सक्षम बनेल. या व्हिडीओच्या व्युज वर शिक्षकांची लोकप्रियता ठरवली जाणार आहे. हे व्हिडिओ आणि ऍप सर्वांसाठी मोफत असणार आहे.

रोमन सैनी कोण आहे ??

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी एम्स सारख्या प्रतिष्ठित मेडिकल संस्थेच्या प्रवेश परीक्षेत यश संपादित केले. मेडिकल चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा ही पास केली. पण स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नवते त्यांनी 2 वर्षांनी आयएएस ची नोकरी सोडून दिली. आता ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेतात. ते सध्या सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतात. रोमन यांनी त्यांच्या आयुष्यात ते करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कामात यश संपादित केले आहे. आयुष्यात त्याला जे मनापासून आवडायचं तेच ते करायचे, हेच त्याच्या यशाचे कारण आहे. त्याचं देशातील प्रत्येक तरुणांचं भविष्य उज्वल करण्याचं स्वप्न आहे. आपल्या याच स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी रोमन याने आयएएस ची नोकरीही सोडली आहे. आता रोमन त्यांचा पूर्ण वेळ शिक्षणातील नवीन स्टार्टअप अकॅडमीला देणार आहेत.

रोमनची आई एक गृहिणी तर वडील हे इंजिनीअर आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाला देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे दिसतं तेवढे सोपं नव्हतं. रोमन हा तुमच्या आमच्या सारखाच अन या तरुणांचे नेतृत्व करतात जे खडतर मेहनतीतून यश संपादित करतात. रोमन कदाचित डॉक्टरी पेशात असला असता किंवा आयएएस अधिकारी, त्याच्या आतल्या समाजसुधारकाने समाजातील प्रत्येक घटकाला मदत देण्याचा प्रयत्न केलाच असता.

शाळेत होते सर्वसामान्य विद्यार्थी, शिक्षणाची बिल्कुल नव्हती आवड

रोमन यांचं यश पाहून आपल्याला असे वाटेल की हा असामान्य बुद्धिमत्तेचा मुलगा आहे अन किमान शाळेत तो टॉपर विद्यार्थी असणारच. पण अस नाहीये , रोमन शाळेत अत्यंत सामन्य विद्यार्थी होते, आणि मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांना शिक्षणाची बिल्कुल आवड नव्हती. त्यांच्या घरातील परिस्थिती ही खूप काही चांगली नव्हती, त्यांनी आपल्या घरातील परिस्थितीचा शिक्षणावर थोडा ही परिणाम होऊ दिला नाही.

16 व्या वर्षी डॉक्टरीला प्रवेश, 22 व्या वर्षी आयएएस झालेले रोमन आता आहेत एक यशस्वी उद्योजक

मित्रांची वाढदिवस पार्टी असो वा कोणी नातेवाईकांचा लग्न समारंभ, रोमन नेहमी या गोष्टीपासून दूर राहत असत म्हणून रोमन यांचे वडील त्यांच्यावर जरा नाराज असायचे. रोमन स्वताच्याच दुनियेत रमायचा अन त्यातच त्याला आनंद मिळत असे. त्यानी आपल्या आयुष्यात त्यांना आवश्यक वाटणाऱ्या गोष्टीनाच स्थान दिले. व अनावश्यक वाटणाऱ्या गोष्टींमध्ये रोमन यांनी कधीही आपला वेळ वाया घातला नाही. याच कारणामुळे त्यांनी निर्भेळ यश संपादित केले व ते आता लोकांच्या कामास येण्यासाठी पात्र ठरत आहेत.

नवीन गोष्टी शिकण्यासाठी रोमन यांना नाही वाटत लाज

शाळेत जेव्हा शिक्षक शिकवायचे तेव्हा रोमन यांना शाळेतून पळून जाण्याची इच्छा होत असे. त्यांना वाटायचे की शाळेत चांगले मार्क्स मिळवणेच सर्वकाही नाहीये. फक्त नावाला परीक्षा पास होण्यातच ते सहमत असायचे. बायोलॉजी मध्ये मजा येत असे म्हणून रोमन यांनी ची परीक्षा दिली. मनापासून अभ्यास केला आणि त्यांनी यश ही संपादन केले. सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाण्याचे कारणही तेच होते, त्यांना त्या विषयाची आवड होती. लहानपणापासूनच रोमन यांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी कोणतीही लाज वाटत नसे.

YouTube वर हिट आहेत रोमन

रोमन यांच्या व्हीडीओ आणि भाषणांना सोशल नेटवर्किंग साईट्सवर सध्या लाखो व्युज मिळतात. या व्हिडीओ आणि भाषणात ते विद्यार्थ्यांना अशा गोष्टी शिवततात ज्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात भरारी घेण्यासाठी उपयोगी ठरतील. या वेबसाईटच्या माध्यमातून रोमन देशभरातील यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. मार्गदर्शनाचे अनेक व्हिडीओ रोमन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमध्ये रोमन विद्यार्थ्यांना अनेक विषयांचे मार्गदर्शन करतात व त्यांच्या प्रश्नाचे उत्तरही देत असतात. रोमन याना कधी वेळ मिळाला तर ते या परीक्षार्थींना भेटत ही असतात.

हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे फेसबुक पेज “व्हायरल महाराष्ट्र” ला लाईक करायला विसरू नका…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button