Uncategorized

काळे मांस अन काळी अंडी देणारी आयुर्वेदिक कोंबडी “कडकनाथ” …!!

तुम्हाला माहितीये का एका कोंबडीमागं मिळतात तब्बल 5,000 रुपये अन एका अंड्याचा भाव आहे तब्बल ६० ते 75 रुपये… आम्ही के काही काही कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या कोंबडीचा भाव सांगत नाहीयेत, तर हा भाव मिळतोय ‘कडकनाथ’ जातीच्या कोंबडीला. मूळ मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील अन प्रामुख्याने धार व झाबूआ जिल्ह्यात पहायला मिळणारी ही कोंबडीची जात आता महाराष्ट्राच्या मातीत रुजायला लागलीय. अन तीच मार्केटींगही आता धडाक्यान होताना दिसतंय. थोडस फिरायचा शौक असेल तर अनेक धाब्यांवर कडकनाथ चिकन मिळेल, अस लिहलेल दिसायला मिळालच असेल …!! आता हा कडकनाथ काय प्रकार आहे हे बहुदा तुमच्या लक्षात आलाच असेल. आजही बऱ्याच-जणांना ‘कडकनाथ’ ही काय भानगड, असा प्रश्न पडतो.

आपण जाणून घेऊया… जर आमचा लेख आवडला तर “द व्हायरल महाराष्ट्र” च्या पेजला जरूर LIKE करा अन या लेखाला share करा

कादाक्नाथ म्हणजे मध्य प्रदेशातलं कोंबडीचं वाण …!!! मध्य प्रदेशातल्या झांबुआ जिल्ह्यातील हे मूळ वाण… मध्य प्रदेशातल्या आदिवासी भागात पर्यटनासाठी वारंवार जाणाऱ्यालासुद्धा याची माहिती नसायची. कारण एकच आज स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे होऊनही आदिवासी संस्कृती तशी फारशी उजेडात आलेलीच नाहीच. याच लपलेल्या संस्कृतीचा ‘कडकनाथ’ वाण…!!! तर हा झाला शोधाचा भाग.
या कोंबडीच्या मांसाचा रंग लालसर, काळा असतो म्हणून काहीजणांनी हिचं ‘कालामासी’ असंही नामकरण केलाय. मांस काळं असलं तरी चवीला जबरदस्त रुचकर असं हे चिकन आहे. आज आरोग्यदायी ‘कडकनाथ’ला जगभरातून मागणी येतेय साधारणपणे नराचं वजन दीड ते दोन किलो भरतं आणि मादीचं वजन साधारण सव्वा किलोपर्यंत भरतं. इतर कोणत्याही मांसामधल्या
कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणापेक्षा कडकनाथच्या मांसात ते प्रमाण 32 टक्क्यांनी कमी असतं. त्यामुळंच त्याला जगभरातून मागणी वाढत आहे. शिवाय या कोंबडीच्या मांसात 20 टक्के प्रथिनं जास्त असल्याचेही निष्कर्ष पुढे आले आहेत. अनेक जुनाट आजारांवरही या कोंबडीच्या मांसामुळं चांगला फायदा होतो, असं अनेक रुग्ण सांगतात. अर्थात, या सगळ्या अनुभवसापेक्ष प्रतिक्रिया असल्या तरी,
कडकनाथचा बोलबाला चांगलाच वाढतोय.

देखभालीसाठीही कमी खर्च एकदा लस दिल्यानंतर ठराविक वेळी स्वच्छता आणि पाण्याची सोय असेल, तर दुसरा कुठलाही खर्च या कोंबड्यांच्या देखभालीसाठी येत नाही. शिवाय शेतातील टाकाऊ पदार्थ, उरलेलं, खराब झालेलं धान्य, असं कुठलंही खाद्य या कोंबड्यांना चालतं. शिवाय त्यांची प्रतिकारशक्तीही चांगली आहे. कडकनाथच्या अंड्यांचा वापर डाएट अंडी म्हणूनही केला जातो. या कडकनाथाने शेतकऱ्यांना उत्पन्नाचं चांगलं माध्यम दिलाय …अशी ही कडकनाथ कोंबडी.

प्रामुख्यान सांगण्यात येतंय कि कडकनाथ कोंबडी एक आयुर्वेदिक आहे, तिच्या मांसामध्ये व अंड्यांमध्ये पुढील प्रमाने गुणधर्म आहेत

ARKive image GES061451 – Emu


कडकनाथ “कोंबडी” चे त्वच्या, मांस, हाडे काळे आहे.
1) कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.
2) कोड फुटलेले कमी होते.
3) अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.
4) याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.
5) दमा ,अस्तमा,टीबी,या आजारावरही गुणकारी.
6) प्रोटीन आणी लोह चे प्रमान 25-70% .
7) अंडी डायट अंडी म्हणूनही खाल्ली जातात.
8) मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.
9) विस्मयकारी औषधी गुणधर्म.
10) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.

11)बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत केले.
12) ” कडकनाथच्या ” हाडांमध्ये (मेल्यानिन) नावाचे द्रव्य (पिगमेंट) अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात. यालाच (फायब्रोमेलॅनोसिस) असेही म्हनतात.
13) या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%) ” लॅबीलीक ” एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे प्रमाण कमी होते.परिणामी ( अटॅक ) येत नाही.
14) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.
15) प्रथीनांचे प्रमान 25% असते.
16) मांसामध्ये ( कोलेस्टोराॅलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(32 मिलीग्रॅम) प्रती 100 ग्रॅम ऐवढे आहे.
17) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग, दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार (ल्युकोडर्मा ), पांढरे डाग, ह्रदयाचे विकार, कमी होतात असा दावा (अन्न परीक्षण केंद्र बंगळूर ) यांनी केला आहे.
18) मानवी शरीरास वाढीस आवश्यक असलेले (अॅमिनो ) एॅसीड-बी-1, बी-2, बी-6,
बी-12, सी व ई, जीवनसत्वे, कॅल्शीयम, फाॅस्परस, आयर्न, इत्यादी घटक पुरविले जातात.
19) पुरूषांना पुरूषत्व वृध्दींगत करण्यासाठी ,तसेच शुक्रजंतूची वाढ करण्याच्या प्रक्रियेला याच्या नियमीत खाण्याने प्रोत्साहन मिळते.
20) स्त्रियांच्या पाळीत नियमीतता येण्यास याच्या खाण्यने मदत होते.
21) कडकनाथ कोंबडीच्या मांस व आंडी खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमान कमी होते.

22) तसेच मधुमेह म्हनजेच( बी पी ) साखरेचा आजारही बरा होतो.
23) Osteomalacia, Womens Sterilty, Problems, Headaches, Renal, (Kidney), Problems Good For (High BP Heart) ….. इत्यादी सर्व आजारांवर ही कोंबडी व आंडी गुणकारी आहेत.

Related Articles

2 Comments

 1. Hello

  YOU NEED HELP TO BUILD SEO BACKLINKS FOR: viralmaharashtra.com ?

  I just checked out your website, and wanted to find out if you need help for SEO Link Building ?
  With SEO Backlinks you will grow in Google Searches and increase Traffic to your websites,
  which will lead to a higher number of customers and much more sales for you. 

  If You Are Interested,
  We offer FREE SEO AUDIT through we will check your site and create a customized SEO plan & strategy for your site.

  CLAIM FREE SEO AUDIT=>  https://zeep.ly/BDQFp

  Thanks, SEObyAxy
  Please do not reply directly to this email!

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button